![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका मालामाल, वर्षभरात कमवला 1.4 लाख कोटी रुपयाहून अधिक नफा
भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसाठी (Public sector Banks) एक दिलासादायक बातमी आहे. गेल्या वर्षभराच्या काळात सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी मोठ्या प्रमाणात नफा (Profit) मिळवला आहे.
Public sector Banks : भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसाठी (Public sector Banks) एक दिलासादायक बातमी आहे. गेल्या वर्षभराच्या काळात सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी मोठ्या प्रमाणात नफा (Profit) मिळवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी मागील वर्षभरात 1.4 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त नफा मिळवला आहे. यावरुन सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची स्थिती चांगली असल्याचे समजते.
12 पैकी 11 बँकांच्या नफ्यात मोठी वाढ
अलिकडच्या काळात सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा नफा वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. 2022-23 मध्ये एकूण नफा हा 1,04,649 कोटी रुपयांचा मिळाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार गेल्या वर्षभरात सार्वजनिक क्षेत्रातील 12 बँकांपैकी 11 बँकांच्या नफ्यात वाढ झालीय. केवळ एकाच बँकेच्या नफ्यात वाढ झाली नसल्याची माहिती मिळाली आहे. यावरुन सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची स्थिती चांगली असल्याचे दिसत आहे. मागील वर्षभरातील वाढ ही 35 टक्क्यांची आहे.
नफा मिळवण्यात स्टेट बँक इंडिया आघाडीवर
2023-24 या आर्थिक वर्षात मिळवलेल्या नफ्यात स्टेट बँक इंडिया ही बँक सर्वात आघाडीवर आहे. 1,41,203 कोटी रुपयांच्या नफ्यात स्टेट बँक इंडियाचा वाटा हा 40 टक्क्यांहून अधिक आहे. SBI ने 22 टक्के अधिक नफा मिळवल्याची माहिती मिळाली आहे. हा नफा 61,077 कोटी रुपये होता.
कोणत्या बँकेच्या नफ्यात किती झाली वाढ?
दिल्लीच्या पंजाब नॅशनल बँकेचा निव्वळ नफा 228 टक्क्यांनी वाढून 8245 कोटी रुपये झाला आहे.
युनियन बँक ऑफ इंडियाच्या नफ्यात 62 टक्क्यांची वाढ झालीय. एकूण नफा हा 13,649 कोटी रुपये झाली आहे.
सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा नफा 61 टक्क्यांच्या वाढीसह 2,549 कोटी रुपये झाला आहे.
बँक ऑफ इंडियाच्या नफ्यात 57 टक्क्यांची वाढ झाली आहे. बँकेनं 6,318 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे.
बँक ऑफ महाराष्ट्रच्या नफ्यात 56 टक्क्यांची वाढ झालीय. या बँकेनं 4055 कोटी रुपयांचा नफा मिळवलाय.
चेन्नईच्या इंडिया बँकेने 53 टक्क्यांच्या वाढीसह 8,063 कोटी रुपयांचा नफा मिळवलाय.
बँक ऑफ बडोदाने आणि कॅनरा बँकेनं देखील 10,000 कोटींहून अधिक नफा मिळवला आहे.
कोणत्या बँकेच्या नफ्यात झाली घट
मिळालेल्या माहितीनुसार, 12 पैकी 11 बँकांच्या नफ्यात वाढ झालीय. तर एका बँकेच्या नफ्यात घट झालीय. पंजाब आणि सिंध बँकेचा वार्षिक निव्वळ नफा 55 टक्क्यांनी घसरला आहे. या बँकेचा नफा 595 कोटी रुपयांवर आला आहे. या बँकेच्या नफ्यात मोठी घट झालीय.
महत्वाच्या बातम्या:
मोठी बातमी : DHFL बँक गैरव्यवहार प्रकरणी धीरज वाधवान यांना CBI कडून अटक, 34 हजार कोटींचा गैरव्यवहार
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)