सोने-चांदी पुन्हा महागले, जाणून घ्या एका तोळं सोन्यासाठी किती हजार मोजावे लागणार?
गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीचा दर सातत्याने वाढतो आहे. आजदेखील सोन्याचा भाव पुन्हा एकदा वाढला आता सोन्याचा दर 75 हजार रुपये प्रती तोळा एवढा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Gold Silver Price 13 Sep: सध्या सोने आणि चांदीच्या दरात चांगलीच वाड होताना दिसत आहे. आज पुन्हा एकदा सोने आणि चांदी अशा दोन्ही मौल्यवान धातूचा भाव वाढला. आज सोन्याचा भाव प्रती 10 ग्रॅममागे 1144 रुपयांनी वाढला. तर दुसरीकडे एकाच दिवसात चांदी 2607 रुपयांनी महागली. आज (13 सप्टेंबर) 24 कॅरेट सोने 72945 रुपये प्रती 10 ग्रॅम रुपयांवर पोहोचले आहे. गुरुवारी हाच भाव 71801 रुपये प्रती 10 ग्रॅम होता. दुसरीकडे सोन्यासोबतच चांदीचा भावदेखील प्रती किलो 85795 रुपयांवर पोहोचला आहे.
आज सोन्याचा भाव किती?
आज 23 कॅरेट सोन्याचा भाव 1139 रुपयांनी महाग होऊन 72653 रुपये प्रती 10 ग्रामवर पोहोचला. तर 22 कॅरेट सोन्याचा भाव हा प्रती 10 ग्रॅम 66818 रुपयांवर पोहोचला. 18 कॅरेट सोन्याचा भाव 858 रुपयांनी वाढला. 18 कॅरेट प्रती 10 ग्रॅम सोन्याचा भाव 54709 रुपये झाला आहे. तर 14 कॅरेट सोन्याचा भाव 669 रुपयांनी वाढून 42673 रुपये प्रती 10 ग्रॅमवर पोहोचला आहे.
सोने-चांदीचा दर कोण ठरवतं?
सोने-चांदीचा दर आयबीजेए द्वारे ठरवला जातो. या दरावर जीएसटी आणि घडणावळीचे शुल्क आकारले जात नाही. त्यामुळेच तुमच्या शहरात सोन्याचा दर हा 1000 ते 2000 रुपयांनी कमी-अधिक असू शकतो.
जीएसटीसह सोने-चांदीचा दर किती? (Gold And Silver Rate Today)
24 कॅरेट सोन्याचा दर हा 2188 रुपयांच्या जीएसटीसह 75133 रुपये प्रती 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. तर 23 कॅरेट सोन्याचा दर जीएसटीसह 74832 रुपयांवर पोहोचला आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर हा 3 टक्के जीएसटीसह (2004 रुपये) 68822 रुपयांवर पोहोचला आहे. 18 कॅरेट सोन्याचा दर हा 1641 रुपयांच्या जीएसटीसह 56350 रुपयांवर पोहोचला आहे. जीएसटी मिळून एक किलो चांदीचा दर हा 88368 रुपयांवर पोहोचला आहे.
हेही वाचा :
5 रेकॉर्डतोड आयपीओ! गुंतवणूकदारांचे पैसे थेट दुप्पट केले; तुमच्या पोर्टफोलिओत आहेत का?
'या' पाच पेनी स्टॉक्सची हवा! अनेकांना दिले दमदार रिटर्न्स, तुम्हीही होणार का मालामाल?