50,000 रुपये पगार असल्यास दरमहा किती बचत करावी? जाणून घ्या श्रीमंत होण्याचं सूत्र
बचतीसाठी पगारवाढीची प्रतीक्षा कधीच संपत नाही. तुमची जर इच्छाच असेल तर तुम्ही तुमच्या आहे त्या पगारातून देखील बचत करू शकता.
Monthly Saving : जसा पगार (Payment) वाढत गेला तसाच खर्चही वाढत गेला. त्यामुळेच बचत काही झाली, असं बऱ्याच लोकांचं मत असतं. यामध्येच बरीच वर्षे निघून जातात. तर असे काही लोक असे म्हणतात की, पुढच्या वर्षी पगार थोडा वाढला की, बचत करु. पण बचत काही होत नाही. बचतीसाठी पगारवाढीची प्रतीक्षा कधीच संपत नाही. तुमची जर इच्छाच असेल तर तुम्ही तुमच्या आहे त्या पगारातून देखील बचत करू शकता. त्यासाठी फक्त इच्छाशक्ती आणि उत्तम नियोजन आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहोत की बचत कशी आणि किती करावी.
20 हजार रुपये पगार असलेल्या लोकांसाठी हा फॉर्म्युला
तुमचा पगार दरमहा 20,000 रुपये असला तरी तुम्ही हे देखील वाचवू शकता. सूत्र असे आहे की, पगार येताच, बचतीसाठी राखून ठेवलेली रक्कम दुसऱ्या खात्यात हस्तांतरित करा. जर दुसरे खाते नसेल, तर तुम्ही बचतीसाठी राखून ठेवलेल्या रकमेला कधीही हात लावणार नाही, असा निर्णय घ्या. जर तुम्ही बचत करण्याबाबत गंभीर नसाल तर सुरुवातीला तुमच्या पगाराच्या फक्त 10 टक्के बचत करा. म्हणजेच पहिल्या 6 महिन्यांसाठी दरमहा 2000 रुपये वाचवा.
50,000 रुपये पगार असल्यास किती पैशांची बचत करावी
आजच्या काळात, बहुतेक लोकांचा पगार सुमारे 50,000 रुपये आहे. जर तुमचा पगार सुमारे 50 हजार रुपये असेल तर तुम्ही दरमहा किती पैसे वाचवायचे आणि ते कुठे गुंतवायचे ते जाणून घ्या, जेणेकरून भविष्यात तो एक मोठा फंड बनू शकेल आणि अडचणीच्या वेळी त्याचा उपयोग होईल. जर तुम्ही विवाहित असाल, आणि दोन मुले असतील. तरी तुम्ही 50,000 रुपयामधील किती रुपये वाचवणं गरजेचं आहे. सामान्यत: खासगी नोकऱ्या करणाऱ्या लोकांनी दरमहा त्यांच्या पगारातील सुमारे 30 टक्के बचत करावी. दरमहा 15,000 रुपये वाचवले जावेत, असा नियम आहे. जर तुमचा पगार दरमहा 50 हजार रुपये असेल आणि तुम्ही दरमहा 15 हजार रुपयांची बचत करत नसाल, तर तुम्ही तुमचे गुंतवणुकीचे लक्ष्य गाठू शकणार नाही, तुम्हाला याचा त्वरित विचार करणे आवश्यक आहे.
सुरुवातीला 10 बचत करा
जर तुम्ही बचत करायला सुरुवात करत असाल, तर 10 टक्क्यांपासून सुरुवात करा. परंतु तुम्ही 30 टक्के मासिक बचत होईपर्यंत दर 6 महिन्यांनी ती वाढवत रहा. तुम्हाला सुरुवातीला अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल, तुमचा खर्च भरून निघणार नाही कारण तुमचा संपूर्ण पगार खर्च करण्याची सवय तुम्हाला आधीच लागली आहे. पण 6 महिन्यांत तुम्ही तुमची सवय स्वतः बदलू शकता. सर्व प्रथम खर्चाची यादी तयार करा. आधी जे आवश्यक आहे त्याला जागा द्या, मग त्या खर्चाचा विचार करा. ज्यावर कात्री वापरली जाऊ शकते. म्हणजे वजावट करता येते.
आनावश्यक खऱ्च टाळा
जर तुम्हाला महिन्यातून 4 वेळा बाहेर खाण्याची सवय असेल तर ती महिन्यातून 2 वेळा कमी करा. याशिवाय अनावश्यक खर्चांची यादी तयार करा, जे तुम्ही दर महिन्याला अनावश्यकपणे खर्च करता. प्रत्येक व्यक्ती आपल्या पगारातील 10 टक्के अनावश्यक खर्च करतो. याशिवाय ऑनलाइनच्या या युगात तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असल्यास त्याचा वापर मर्यादित करा. तुमच्याकडे अनेक क्रेडिट कार्डे बनलेली असतील तर त्यातील काही ताबडतोब बंद करा. याशिवाय ऑनलाइन शॉपिंग टाळा. जेव्हा तुम्ही खरेदीसाठी बाहेर जाल तेव्हा घराबाहेर पडण्यापूर्वी यादी तयार करा. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचा पगार मिळताच, ऑफर्समुळे किंवा अनावश्यकपणे तुमच्या उपयोगाच्या नसलेल्या वस्तू खरेदी करू नका. या पद्धतीमुळे तुम्ही दरमहा तुमच्या पगारातील 30 टक्के बचत करू शकता.
बचतीची रक्कम योग्य ठिकाणी गुंतवा
बचतीची रक्कम योग्य ठिकाणी गुंतवण्याची गरज समजावून घ्या. या सूत्राने 50 हजार रुपये पगार असलेली व्यक्ती वार्षिक 1.80 लाख रुपये वाचवू शकते. जेव्हा तुम्ही दर महिन्याला 15,000 रुपये वाचवता, तेव्हा त्यातील 5,000 रुपये आपत्कालीन निधी म्हणून ठेवा. तुम्ही म्युच्युअल फंडात दरमहा 5 रुपयांची एसआयपी करू शकता. याशिवाय उरलेले 5 हजार रुपये आवर्ती ठेव किंवा गोल्ड बाँडमध्ये गुंतवता येतील. जेव्हा पगार वाढतो तेव्हा त्यानुसार गुंतवणुकीची रक्कम वाढवत राहा. 10 वर्षे या फॉर्म्युल्यासह बचत आणि गुंतवणूक करत राहिल्यास भविष्यात तुम्हाला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागणार नाही. अडचणीच्या काळातही हा फंड मोठी मदत होईल.
महत्त्वाच्या बातम्या: