जगातील सर्वात श्रीमंत महिला कोण? नेमकी किती आहे संपत्ती? फोर्ब्सकडून यादी जाहीर
तुम्हाला जगातील सर्वात श्रीमंत महिलेबद्दल माहिती आहे का? फोर्ब्सने जगातील सर्वात श्रीमंत महिला कोण याबाबतची माहिती देखील दिलीय. जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
Forbes Richest Women : दरवर्षी फोर्ब्स (Forbes) जगातील सर्वात श्रीमंत (Richest in the world) असणाऱ्या व्यक्तिंची यादी जाहीर करते. यावर्षी देखील फोर्ब्सकडून ही यादी जाहीर करण्यात आलीय. यानुसार उद्योजक बर्नार्ड अरनॉल्ट (Bernard Arnault) हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. पण तुम्हाला जगातील सर्वात श्रीमंत महिलेबद्दल माहिती आहे का? फोर्ब्सने जगातील सर्वात श्रीमंत महिला कोण याबाबतची माहिती देखील दिलीय. जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
मेयर्स यांच्याकडं 99.5 अब्ज डॉलरची संपत्ती
फोर्ब्सने दिलेल्या माहितीनुसार, फ्रेंकोइस बेटनकोर्ट मेयर्स (Françoise Bettencourt Meyers) या जगातील सर्वात श्रीमंत महिला आहेत. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तिंमध्ये त्यांचा 15 वा क्रमांक लागतो. फ्रँकोइस बेटेनकोर्ट मेयर्स या लॉरियल कॉस्मेटिक ब्रँडचा व्यवसाय सांभाळत आहेत. फ्रँकोइस बेटेनकोर्ट मेयर्स यांच्याकडे प्रचंड संपत्ती आहे. फोर्ब्सने दिलेल्या माहितीनुसार मेयर्स यांच्याकडं 99.5 अब्ज डॉलरची संपत्ती आहे.
संपत्तीच्या बाबतीत कोणत्या क्रमांकावर कोणती महिला?
फ्रेंकोइस बेटनकोर्ट मेयर्स यांच्यानंतर ॲलिस वॉल्टन या जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या श्रीमंत व्यक्ती आहेत. ॲलिस यांची एकूण संपत्ती ही 72.3 अब्ज डॉलर आहे. तर कोच इंडस्ट्रीजच्या ज्युलिया कोच यांचा जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या श्रीमंत महिला म्हणून नंबर लागतो. त्यांची एकूण संपत्ती ही 64.3 अब्ज डॉलर आहे. तर जॅकलिन मार्स या जगाती चौथ्या क्रमांकाच्या श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांची एकूण संपत्ती ही 38.5 अब्ज डॉलर आहे. तर उद्योजक जेफ बेझोस यांच्या पत्नी पत्नी मॅकेन्झी स्कॉट या जगातील पाचव्या क्रमांकाच्या श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांची एकूण संपत्ती ही 35.6 अब्ज डॉलर्स आहे.
भारतातील सर्वात श्रीमंत महिला कोण?
जगातील सर्वात श्रीमंत महिला फ्रेंकोइस बेटनकोर्ट मेयर्स याबाबत माहिती मिळाली, मात्र, तुम्हाला भारतातील सर्वात श्रीमंत महिला कोण? याबाबतची माहिती आहे का? तर जिंदाल ग्रुपच्या सावित्री जिंदाल या भारतातील सर्वात श्रीमंत महिला आहेत. त्यांच्याकडे एकूण संपत्ती ही 33.5 अब्ज डॉलर्स आहे. जगातील सर्वात श्रीमंत महिलांच्या यादीत जिंदाल यांचा हावा क्रमांक लागतो. फोर्ब्सने 2781 जणांचा जगातील सर्वात श्रीमंत महिलांच्या यादीत समावेश केलाय. यामध्ये 369 महिलांचा समावेश आहे. यानुसार जगातील सर्वात श्रीमंतांपैकी 13.3 टक्के या महिला आहेत. सर्व महिलांची एकूण संपत्ती ही 1.8 ट्रिलियन डॉलर आहे.
महत्वाच्या बातम्या: