एक्स्प्लोर

EVM मशीन तयार करणाऱ्या कंपनीचा नाद खुळा, पाच वर्षांपूर्वी पैसे गुंतवणारे आज झाले मालामाल!

ईव्हीएम तयार करण्याची जबाबदारी भारतात दोन कंपन्यांवर आहे. यातील एका कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 700 टक्क्यांपेक्षा अधिक रिटर्न्स दिले आहेत.

मुंबई :  सध्या सगळीकडे निवडणुकीचे (Loksabha Election) वातावरण आहे. या निवडणुकीत विजयी होण्यासाठी वेगवेगळ्या पक्षाचे नेते जोमात प्रचार करत आहेत. यावेळी जनता भाजपला नाकारणार आहे, असा दावा विरोधक करतात. तर आम्हीच पुन्हा एकदा सत्तेत येऊ असे सत्ताधारी भाजपकडून (BJP) सांगितले जाते. दरम्यान, एकीकडे निवडणुकीची धूम चालू असताना विरोधक कधी-कधी ईव्हीएमलाही (EVM) विरोध करताना दिसतात. पण ही ईव्हीएमची मशीन कोण तयार करतं? या कंपन्या कोणत्या आहेत? ईव्हीएम तयार करून या कंपन्यांनी आतापर्यंत किती पैसे कमवले आहेत? याची तुम्हाला कल्पना आहे का? 

दोन कंपन्यांवर ईव्हीएम तयार करण्याची जबाबदारी

ईव्हीएम तयार करण्याची जबाबदारी ही दोन कंपन्यांवर आहे. या दोन्ही कंपन्या सरकारच्याच मालकीच्या आहेत. इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स असे या दोन्ही कंपन्यांची नावे आहेत. यातील भारत इलेक्ट्रॉनिक्स ही कंपनी भारतीय शेअर बाजारावर सूचिबद्ध आहे. या कंपनीच्या एका शेअरचे मूल्य हे  236.50 रुपये आहे. पाच वर्षांपूर्वी या कंपनीत ज्या लोकांनी पैसे गुंतवलेले आहेत, त्यांनी आज चांगलेच पैसे कमवलेले आहेत. '

कंपनीने दिले 702 टक्के रिटर्न्स

पाच वर्षांपूर्वी म्हणजेच 2019 साली लोकसभेची निवडणूक झाली होती. त्यावेळी भारत इलेक्ट्रॉनिक्स या कंपनीच्या एका शेअरचे मूल्य हे अवघे 29.38 रुपये होते. 2023 सालाच्या सुरुवातीला या कंपनीच्या शेअरमध्ये चांगलीच तेजी पाहायला मिळाली. गेल्या पाच वर्षांत या कंपनीने साधारण 702 टक्के रिटर्न्स दिले आहेत. खास गोष्ट म्हणजे गेल्या पाच वर्षांत या कंपनीच्या शेअरच्या मूल्यात सातत्याने वाढ झाल्याचेच पाहायला मिळालेले आहे.  या दोन कंपन्या संपूर्ण भारतात ईव्हीएम मशीन्स पुरवतात. यासह परदेशातही या कंपन्यांकडून ईव्हीएम मशीन्सची निर्यात केली जाते.  

1982 सालापासून ईव्हीएम मशीनची चर्चा

तसं पाहायचं झालं तर ईव्हीएम मशीनचा इतिहास जुना आहे. 1982 सालापासून निवडणुकीतील धांदल कमी व्हावी यासाठी ईव्हीएम मशीनसारख्या यंत्रणेवर विचार केला जातत होता. या साली केरळमधील परावूर या विधानसभा जागेसाठी पहिल्यांदा ईव्हीएम मशीनचे ट्रायल घेण्यात आले. 

2004 साली लोकसभा निवडणुकीसाठी ईव्हीएम मशीन

ईव्हीएममध्ये कालांतराने अनेक सुधारणा होत गेल्या. त्यांनातर 2001 साली तमिळनाडू, केरळ, पुद्दूचेरी, पश्चिम बंगाल या राज्यांत विधानसभा निवडणुकीवेळी ईव्हीएम मशीनचा वापर करण्यात आला. याआधी 1998 सालीदेखील लोकसभा निवडणुकीसाठी काही बुथ्सवर ईव्हीएम मशीन लावण्यात आली होती. 2004 साली पहिल्यांदाचा संपूर्ण लोकसभा निवडणूक ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून घेण्यात आली. 2019 सालच्या लोकसभा निवडणुकीत प्रत्येक जागेसाठी ईव्हीएम मशीनसह व्हीव्हीपॅट मशीनही लावण्यात आली.  

हेही वाचा :

तुम्ही गुंतवलेल्या पैशांचं LIC नेमकं करते तरी काय? उत्तर वाचून विश्वास बसणार नाही!

पीएफ खात्यातून पैसे काढत असाल तर आधी बदललेला 'हा' नियम वाचा, होऊ शकतो मोठा फायदा!

SIP च्या माध्यमातून तुम्हीही होऊ शकता करोडपती! फक्त 'या' सूत्राचं पालन करा!

प्रज्वल ढगे हे 'एबीपी माझा ऑनलाईन'टीममध्ये 'कॉपी एडिटर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकारण, मनोरंजन, क्रीडाविषयक बातम्यांमध्ये विशेष रस आहे. त्यांनी याआधी 'लोकसत्ता', 'टीव्ही ९ मराठी' या माध्यमांत काम केलेले आहे.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

ऊसाला 5 हजार 500 रुपयांचा दर मिळावा, अन्यथा ऊस तोडू देणार नाही, राजू शेट्टींचा एल्गार, नेमक्या काय आहेत मागण्या?
ऊसाला 5 हजार 500 रुपयांचा दर मिळावा, अन्यथा ऊस तोडू देणार नाही, राजू शेट्टींचा एल्गार, नेमक्या काय आहेत मागण्या?
Home Loan : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो रेट वाढवला, ऑक्टोबरमध्ये सर्वात कमी व्याज दरावर गृहकर्ज कोणती बँक देते?  
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो रेट वाढवला, ऑक्टोबरमध्ये सर्वात कमी व्याज दरावर गृहकर्ज कोणती बँक देते?  
RBI :रुपया सावरण्यासाठी आरबीआयचा मोठा निर्णय, थेट डॉलर विक्री करणार, नियम कठोर करण्याचा निर्णय
रुपया सावरण्यासाठी आरबीआयचा मोठा निर्णय, थेट डॉलर विक्री करणार, नियम कठोर करण्याचा निर्णय
लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार, त्याआधी करावं लागणार 'हे' महत्वाचं काम, अन्यथा लाभापासून राहालं वंचित
लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार, त्याआधी करावं लागणार 'हे' महत्वाचं काम, अन्यथा लाभापासून राहालं वंचित

व्हिडीओ

Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
Embed widget