पीएफ खात्यातून पैसे काढत असाल तर आधी बदललेला 'हा' नियम वाचा, होऊ शकतो मोठा फायदा!
ईपीएफओने आपल्या नियमांत बदल केला आहे. या बदललेल्या नियमानुसार कर्मचाऱ्यांना एका लाख रुपयांपर्यंत आपत्कालीन निधी काढता येणार आहे.
मुंबई : नोकरदारांचे भविष्य सुकर व्हावे म्हणून सरकारने ईपीएफओची (EPFO) सुविधा दिलेली आहे. ईपीएफओ अंतर्गत नोकरदारांचे प्रतिमहिना एक निश्चित रक्कम कापली जाते. हीच कापलेली रक्कम निवृत्तीनंतर ठरवण्यात आलेल्या व्याजासह परत नोकरदारांना निवृत्तीवेतनाच्या रुपात परत केली जाते. याच निधीचा नोकरीदरम्यान वेगवेगळ्या कारणांसाठी उपयोग करता येतो. दरम्यान, याबाबतच्या नियमांत आता सरकारने बदल केला आहे. नव्या नियमानुसार आता आधी ठरवण्यात आलेल्या रकमेपेक्षा दुप्पट रक्कम नोकरदारांना काढता येणार आहे.
16 एप्रिल रोजी नवे सर्क्युलर
EPFO ने आपल्या वैद्यकीय निधीसाठीच्या अॅडव्हान्स विथड्रॉलच्या नियमांत बदल केला आहे. अगोदर नोकरदाला जास्तीत जास्त 50,000 रुपयांचा क्लेम करता येत होता. आता हेच प्रमाण एक लाखांपर्यंत वाढवण्यात आले आहे. ईपीएफओने यासंदर्भात 16 एप्रिल रोजी जारी केले आहे. याच सर्क्युलरमध्ये या नव्या नियमाबाबत माहिती देण्यात आली आहे.
आंशिक रक्कम काढण्यासाठी फॉर्म 31
EPFO ने फॉर्म 31 च्या पॅरा 68J अंतर्गत पीएफमधून आंशिक पैसे काढण्याची मर्यादा दुप्पट केली आहे. ईपीएफच्या फॉर्म 31 अंतर्गत निवृत्तीवेतनासाठी तुम्ही जमा करत असलेल्या रकमेतून आंशिक रक्कम काढता येते. खर खरेदी, लग्न, वैद्यकीय उपचार अशा कामांसाठी पीएफ खात्यातून आंशिक रक्कम काढता येते
कधी काढता येणार एक लाख रुपये?
फॉर्म 31 मधील 68J पॅरानुसार नोकरदारांना आपल्या पीएफ खात्यातून आशिक रक्कम काढता येते. या फॉर्मअंतर्गत आधी फक्त 50,000 रुपये काढता यायचे. मात्र आता हीच रक्कम 1 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. ईपीएफओनुसार आरोग्यविषयक आणीबाणीच्या काळातच हे एख लाख रुपये काढता येतील. खुद्द कर्मचारी किंवा कर्मचाऱ्याचे कुटुंबीय रुग्णालयात भरती असतील, तेव्हा ही रक्कम काढता येईल. त्यासाठी कर्मचारी शासकीय रुग्णालय किंवा नियमांत बसणाऱ्या रुग्णालयात दाखल असणे गरजेचे आहे. रुग्ण एखाद्या खासगी रुग्णालयात दाखल असेल तर त्याची चौकशी केली जाईल. त्यानंतर पीएफमधील 1 लाख रुपये काढता येतील.
हेही वाचा :
एलॉन मस्क भारतात येणार, कोट्यवधींची गुंतवणूक करणार? अवकाश संशोधनातही लावणार पैसा?
'लोन ॲप्स'च्या नादाला लागण्याआधी सावधान, होऊ शकते मोठी फसवणूक; 'अशी' घ्या काळजी!
अब्जाधीश एलॉन मस्क भारतात येणार, 'हे' शेअर्स रॉकेटप्रमाणे भरारी घेणार?