सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना दणका, खाद्य तेलाच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या कोणत्या तेलाचे किती दर?
सणासुदीच्या आधीच खाद्य तेलाच्या किंमतीत (Edible Oil Prices) मोठी वाढ झाली आहे. तेलाच्या वाढीमुळं स्वयंपाकघरातील बजेट बिघडले आहे.
Edible Oil Prices : सणासुदीच्या आधीच खाद्य तेलाच्या किंमतीत (Edible Oil Prices) मोठी वाढ झाली आहे. तेलाच्या वाढीमुळं स्वयंपाकघरातील बजेट बिघडले आहे. सरकारी आकडेवारीनुसार, गेल्या एका महिन्यात मोहरीच्या तेलाच्या किंमतीत 9.10 टक्के तर पामतेलाच्या किमतीत 14.16 टक्क्यांची वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात आणि ऑनलाइन किराणा कंपन्यांच्या पोर्टलवर मोहरीच्या तेलाच्या किमती 26 टक्क्यांनी वाढल्या आहेत.
मोहरीचे तेल 176 रुपये प्रति किलोवर
महिनाभरापूर्वी, ऑनलाइन किराणा पोर्टलवर मोहरीचे तेल 139 रुपये प्रति किलो दराने उपलब्ध होते. सध्या या तेलाची किंमत 176 रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. म्हणजेच गेल्या एका महिन्यात किंमती 26.61 टक्क्यांनी वाढल्या आहेत. देशात खाद्यतेल म्हणून मोहरीचे तेल सर्वाधिक वापरले जाते. सरकारी आकडेही खाद्यतेलाच्या किंमती वाढल्या आहेत. ग्राहक व्यवहार विभागाच्या किमती संनियंत्रण विभागानुसार, मोहरीचे तेल जे एक महिन्यापूर्वी 25 ऑगस्ट 2024 रोजी 139.19 रुपये प्रति किलो दराने उपलब्ध होते, ते आता 151.85 रुपये प्रति किलो दराने उपलब्ध आहे. मोहरीचे तेल मुंबईत 183 रुपये, दिल्लीत 165 रुपये, कोलकात्यात 181 रुपये, चेन्नईत 167 रुपये आणि रांचीमध्ये 163 रुपये किलो दराने उपलब्ध आहे.
सर्वच तेलाच्या किंमतीत वाढ
मोहरीच्या तेलाव्यतिरिक्त इतर खाद्यतेलाच्या दरातही वाढ झाली आहे. एक महिन्यापूर्वी सूर्यफूल तेल 119.38 रुपये प्रतिकिलो दराने उपलब्ध होते, आता ते 129.88 रुपये प्रतिकिलो दराने उपलब्ध आहे. महिन्याभरापूर्वी पामतेल 98.28 रुपये प्रतिकिलो दराने उपलब्ध होते, मात्र आता ते 112.2 रुपये प्रतिकिलो दराने उपलब्ध आहे. सोया तेलाचे भावही एका महिन्यात 117.45 रुपयांवरून 127.62 रुपये प्रतिकिलो झाले आहेत.
खाद्य तेलाच्या दरात का वाढ होतेय?
खाद्यतेलाच्या आयात शुल्कात वाढ करण्यात आली असून, त्यामुळे खाद्यतेलाची आयात महाग झाली आहे. त्यामुळं दरात वाढ झाली आहे. सरकारने क्रूड सोयाबीन तेल, कच्चे पाम तेल आणि कच्चे सूर्यफूल तेलावरील आयात शुल्क शून्यावरुन 20 टक्के आणि खाद्यतेलांवरील आयात शुल्क 12.5 टक्क्यांवरून 32.5 टक्के केले आहे. सरकारच्या या निर्णयामुळे पामतेलापासून सोया, मोहरीपर्यंत सर्व प्रकारची खाद्यतेल महाग झाली आहे. देशांतर्गत शेतकऱ्यांचे हित जपण्यासाठी सरकारने खाद्यतेलाच्या आयात शुल्कात वाढ केली आहे. दरम्यान, सध्या देशात सणासुदीचा हंगाम सुरु झाला आहे. या काळातच खाद्य तेलाच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळं सर्वसामान्यांच्या खिशात
महत्वाच्या बातम्या: