एक्स्प्लोर

पगारवाढ न होताच पगार 1 लाखांनी वाढला, डॉलर- रुपयाच्या खेळात मोठा उलटफेर, काय घडलं?

Dollar vs Rupees : या आठवड्यात 25 सप्टेंबरला डॉलरच्या तुलनेत  रुपया 7 पैशांनी घसरुण 87.60 रुपयांवर आले होते. 

नवी दिल्ली : भारताचं चलन रुपया गेल्या काही दिवसांपासून डॉलरच्या तुलनेत घसरत आहे. 26 डिसेंबर 2025 ला अमेरिकेच्या डॉलरच्या तुलनेत आज रुपया 6 पैशांनी मजबूत झाला. यासह भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत  88.70 रुपयांच्या स्तरावर पोहोचला आहे. गुरुवारी भारताचा रुपया अमेरिकेच्या डॉलरच्या तुलनेत 7 पैशांनी वाढला होता मात्र नंतर तो कमजोर झाला. H-1B व्हिसाच्या फीरमध्ये वाढ झाल्यानं आणि कच्चा तेलाच्या दरातील किमतीमधील तेजीमुळं रुपयावरील दबाव वाढला आहे. 

अमेरिका आणि भारत यांच्यातील व्यापारी करार लवकरच होईल असे संकेत आहेत. अमेरिकेच्या व्याज दरांतील कपाती संदर्भातील अनिश्चिततेमुळं गुरवारी भारतीय शेअर बाजारात घसरण झाली होती. विदेशी गुंतवणूकदारांनी सातत्यानं विक्री केल्यानं आणि H-1B व्हिसाची फी वाढवल्यानं भारतीय शेअर बाजारात सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घसरण झालीय. 

सोमवारी भारताचा रुपया डॉलरच्या तुलनेत 7 पैशांनी घसरुन 87.60 रुपयांवर आला होता. सुरुवातीला रुपया 14 पैशांनी मजबूत झाला होता. या आर्थिक वर्षात रुपया 2.15 टक्क्यांनी घसरला आहे. तर, 2025 मध्ये 2.30 टक्क्यांनी घसरला आहे. ऑगस्टमध्ये भारताचा रुपया डॉलरच्या तुलनेत 0.20 टक्क्यांनी मजबूत झाला होता. 

बिझनेस स्टँडर्डच्या रिपोर्टनुसार एलकेपी सिक्युरिटीजचे व्हाईस प्रेसिंडेंट रिसर्च अनालिस्ट जतिन त्रिवेदी यांच्या मतानुसार विदेशी गुंतवणूकदार भारतीय शेअरची विक्री करत आहेत. भारतीय शेअर बाजारात ते विक्रेते बनले आहेत. याचा गुंतवणूकदारांच्या मानसिकतेवर परिणाम झाला. ट्रम्प टॅरिफ, एचवन बी व्हिसा संदर्भातील नियमांमुळं रुपया मजबूत होण्याची शक्यता कमी आहे.

पगार एक लाखांनी कसा वाढला?

डॉलर आणि रुपयातील घसरण तुम्ही पाहिली आहे. आता विचार करा भारतातील एखादा व्यक्ती अमेरिकेत 500000 अमेरिकन डॉलर्स पगारावर नोकरी करतो. म्हणजे रुपयाच्या 2.30 टक्के घसरणीपूर्वी भारतीय रुपयात त्याचा पगार 43,33,484 रुपये होता. आता सप्टेंबरपर्यंत 2.30 टक्के घसरण झाल्यानंतर त्याचा व्यक्तीचा पगार 1,02,016.5 रुपयांनी पगार 44,35,500  रुपये असेल. म्हणजेच पगारवाढ न होता त्या व्यक्तीचा भारतीय चलनातील पगार 1 लाख रुपयांनी वाढला.   

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bihar Election : तेज प्रताप यादव यांना केंद्र सरकारकडून वाय प्लस सुरक्षा, दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी मोठा निर्णय 
तेज प्रताप यादव यांना केंद्र सरकारकडून वाय प्लस सुरक्षा, दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी मोठा निर्णय 
Digital Gold : 10 रुपयांत 'डिजीटल गोल्ड' खरेदी करत असाल तर सावधान, गुंतवणूकदारांसाठी ते धोकादायक, सेबीचा कडक इशारा 
10 रुपयांमध्ये डिजीटल गोल्ड घेणं पडेल महागात, सेबीनं धोक्याचा इशारा देत दिला महत्त्वाचा सल्ला 
MPSC : राज्यसेवेच्या 385 जागांसाठी रविवारी पूर्व परीक्षा, सुमारे 1 लाख 75 हजार उमेदवार भवितव्य आजमावणार
राज्यसेवेच्या 385 जागांसाठी रविवारी पूर्व परीक्षा, सुमारे 1 लाख 75 हजार उमेदवार भवितव्य आजमावणार
Maharashtra Live blog: मीरारोड पोलीस ठाण्यातील तरुणांचा सिगारेट पार्टीचा व्हिडिओ व्हायरल
Maharashtra Live blog: मीरारोड पोलीस ठाण्यातील तरुणांचा सिगारेट पार्टीचा व्हिडिओ व्हायरल
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Bacchu Kadu Farmers : आरक्षणाच्या लढाईपेक्षा मातीची लढाई गरजेची तरच शेतकरी सुखी होईल
Bacchu Kadu Farmer Protest:  बच्चू कडूंच्या आंदोलनाचं सुरुवात ते शेवट, इनासाईड स्टोरी काय?
Bacchu Kadu Farmers Protest :बच्चू कडूंचा नवा लढा, आता पूर्ण महाराष्ट्रात पायी दौरा करणार
Bacchu Kadu On Farmers Loss : शेतकऱ्यांना चालू वर्षांत कर्जमाफी देणं का गरजेचं? बच्चू कडूंनी गणित मांडलं
Bacchu Kadu On Farmers Protest : राजकारण हललं की बच्चू कडू आंदोलन करतात का? बच्चू कडूंचं उत्तर ऐकाच

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bihar Election : तेज प्रताप यादव यांना केंद्र सरकारकडून वाय प्लस सुरक्षा, दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी मोठा निर्णय 
तेज प्रताप यादव यांना केंद्र सरकारकडून वाय प्लस सुरक्षा, दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी मोठा निर्णय 
Digital Gold : 10 रुपयांत 'डिजीटल गोल्ड' खरेदी करत असाल तर सावधान, गुंतवणूकदारांसाठी ते धोकादायक, सेबीचा कडक इशारा 
10 रुपयांमध्ये डिजीटल गोल्ड घेणं पडेल महागात, सेबीनं धोक्याचा इशारा देत दिला महत्त्वाचा सल्ला 
MPSC : राज्यसेवेच्या 385 जागांसाठी रविवारी पूर्व परीक्षा, सुमारे 1 लाख 75 हजार उमेदवार भवितव्य आजमावणार
राज्यसेवेच्या 385 जागांसाठी रविवारी पूर्व परीक्षा, सुमारे 1 लाख 75 हजार उमेदवार भवितव्य आजमावणार
Maharashtra Live blog: मीरारोड पोलीस ठाण्यातील तरुणांचा सिगारेट पार्टीचा व्हिडिओ व्हायरल
Maharashtra Live blog: मीरारोड पोलीस ठाण्यातील तरुणांचा सिगारेट पार्टीचा व्हिडिओ व्हायरल
हे पवार महाराष्ट्राचं विधानभवन आपल्या नावावर करतील; पुणे जमीन प्रकरणावरुन लक्ष्मण हाकेंची जळजळीत टीका
हे पवार महाराष्ट्राचं विधानभवन आपल्या नावावर करतील; पुणे जमीन प्रकरणावरुन लक्ष्मण हाकेंची जळजळीत टीका
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर बर्निग ट्रकचा थरार, चालकाने दाखवले प्रसंगावधान; मोठा अनर्थ टळला
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर बर्निग ट्रकचा थरार, चालकाने दाखवले प्रसंगावधान; मोठा अनर्थ टळला
BJP President : भाजपला नवा अध्यक्ष कधी मिळणार?  राजनाथ सिंह यांचं मोठं वक्तव्य, बिहार निवडणुकीचा दाखला देत म्हणाले..
भाजपला नवा अध्यक्ष कधी मिळणार? राजनाथ सिंह यांचं मोठं वक्तव्य , बिहार निवडणुकीचा दाखला देत म्हणाले..
Narco Test : नार्को टेस्ट म्हणजे काय? आरोपीला अर्ध-बेशुद्ध करण्यासाठी कोणतं केमिकल वापरतात? आतापर्यंत कुणाकुणाची टेस्ट झाली?
नार्को टेस्ट म्हणजे काय? आरोपीला अर्ध-बेशुद्ध करण्यासाठी कोणतं केमिकल वापरतात? आतापर्यंत कुणाकुणाची टेस्ट झाली?
Embed widget