PM Kisan : खूशखबर! शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच जमा होणार पीएम किसान योजनेचा 15 वा हप्ता, लाभार्थी यादीमध्ये तुमचं नाव तपासा
PM Kisan Samman Nidhi 15th Installment : पंतप्रधान किसान योजनेच्या 15 हफ्ता जमा होण्याची प्रतीक्षा आता संपली आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार आहे.
PM Kisan Yojana Installment Update : शेतकऱ्यांसाठी आनंदाची (Good News for Farmenrs) बातमी आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM Kisan Samman Nidhi) योजनेचा 15 वा हफ्ता मिळण्यासाठीची प्रतीक्षा आता संपली आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान योजनेच्या पंधराव्या हफ्त्याची रक्कम जमा होणार आहे. पण त्याआधी लाभार्थी यादीमध्ये तुमचं नाव तपासा. यासोबतच जर तुम्ही ईकेवायसी केलं नसेल तर, ते करणं आवश्यक आहे.
शेतकऱ्यांसाठी खूशखबर
पंतप्रधान किसान सन्मान निधीचा पंधरावा हफ्ता दिवाळीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याचं सांगितलं जात होते. आता दिवाळी संपल्यानंतर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपणार आहे. त्यामुळे देशभरातील शेतकरी आपल्या खात्यात पैसे जमा होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM Kisan Yojana) योजनेचा 15 व्या 15 नोव्हेंबरला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 15 वा हफ्ता
केंद्र सरकारकडून लवकरच पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा 15 वा हप्ता जारी करण्यात येईल. किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी करणं अनिवार्य आहे. शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi) सुरू केली होती. यामुळे देशभरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये
केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेला सुरुवात केली. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये मिळतात. आतापर्यंत 14 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत. pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाइटवर नोंदणी करून शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
'या' दिवशी मिळणार पीएम किसान योजनेचा हफ्ता
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा 15 वा हप्ता 15 नोव्हेंबर 2023 ला देशभरातील करोडो शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचणार आहे. जर तुम्हीही पीएम किसानच्या 15 व्या हप्त्याची वाट पाहत असाल, तर लाभार्थी यादीत तुमचे नाव एकदा नक्की तपासा.
लाभार्थी यादीत तुमचं नाव तपासा
- पीएम किसान वेबसाइट https://pmkisan.gov.in/ ला भेट द्या
- पेमेंट सक्सेस टॅबच्या खाली तुम्ही भारताचा नकाशा पाहू शकाल.
- उजव्या बाजूला पिवळ्या रंगाचा टॅब डॅशबोर्ड दिसेल, त्यावर क्लिक करा
- तुम्हाला तुमचा संपूर्ण तपशील डॅशबोर्ड टॅबवर भरा.
- राज्य, जिल्हा, उपजिल्हा आणि पंचायत निवडा.
- यानंतर तुम्ही तपशील निवडू शकता.
या योजनेची स्थिती पाहा
- पीएम किसान वेबसाइटला https://pmkisan.gov.in/ भेट द्या
- 'तुमची स्थिती जाणून घ्या' (Know Your Status) या पर्यायावर क्लिक करा
- नोंदणी क्रमांक आणि कॅप्चा कोड प्रविष्ट करा.
- Get data वर क्लिक करा
- आता तुम्हाला स्टेटस दिसेल. ज्यामुळे तुम्ही लाभार्थी यादीत आहात की नाही हे स्पष्ट होईल.