एक्स्प्लोर

IPO Update : DAM Capital च्या आयपीओवर गुंतवणूकदारांचा पैशांचा वर्षाव, 81.88 पट बोली लागली, GMP कितीवर?

IPO Update : DAM Capital Advisors IPO सबस्क्राइब करण्याची मुदत संपली आहे. या आयपीओसाठी गुंतवणूकदारांनी 81.88 पट बोली लावली. 

DAM Capital Advisors IPO GMP मुंबई:  एकीकडे शेअर बाजारात घसरणीचं सत्र सुरु असल्यानं गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान गेल्या आठवड्यात झाल्याचं पाहायला मिळालं. दुसरीकडे बीएसई आणि एनएसईवर मोठ्या प्रमाणात आयपीओ लिस्ट होत आहेत. आयपीओला गुंतवणूकदारांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं देखील पाहायला मिळालं. डिसेंबर महिन्यात  शेअर बाजारात लिस्ट झालेल्या आयपीओंनी गुंतवणूकदारांना चांगला प्रतिसाद दिला आहे.  2024 च्या शेवटच्या आठवड्यात देखील आयपीओंना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र आहे. DAM Capital Advisors चा आयपीओ सबस्क्राइब करण्याची मुदत काल संपली. हा आयपीओ 81.88 पट सबस्क्राइब झाला आहे.  

गैर संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून हा आयपीओ  98.47 पट सबस्क्रइब झाला. रिटेल गुंतवणूकदारांनी  या आयपीओला 26.80 सबस्क्राइब केलं. तर, मान्यताप्राप्त संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 166.33 पट सबस्क्राइब केलं.  

 
DAM Capital Advisors चा आयपीओ पूर्णपणे ऑफर फॉर सेल यासाठी होता. म्हणजेच या आयपीओच्या माध्यमातून जी रक्कम उभारली जाईल ती रक्कम शेअर विक्री करणाऱ्यांकडे जाईल. कंपनीनं आयपीओसाठी किंमतपट्टा 269-283 रुपये निश्चित केला होता. एका लॉटमध्ये 53 शेअर निश्चित करण्यात आले होते.  

DAM Capital Advisors IPO चा जीएमपी कितीवर?

दाम कॅपिटल अ‍ॅडव्हायजर्सचा किंमतपट्टा 283 रुपये निश्चित करण्यात आली होती. सध्या आयपीओचा जीएमपी 55 टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यानुसार आयपीओ लिस्ट झाल्यास गुंतवणूकदारांना एका शेअरला 160 रुपये अधिक मिळू शकतात. हा आयपीओ सबस्क्राइब करण्यासाठी 19 डिसेंबरला खुला झाला होता तो 23 डिसेंबरला बंद झाला. आयपीओवर बोली लावणाऱ्या गुंतवणूकदारांच्या डीमॅट खात्यात 24 डिसेंबरला शेअर जारी केले जाणार आहेत. तर, लिस्टींग 27 डिसेंबरला बीएसई आणि एनएसईवर लिस्ट होणार आहेत.  


डीएएम कॅपिटल अ‍ॅडव्हायजर्स भारतातील प्रमुख गुंतवणूक बँकिंग कंपनी पैकी एक आहे. ही कंपनी इक्विटी कॅपिटल मार्केट, मर्जर आणि  अ‍ॅक्विजिशन, प्राइवेट इक्विटी, संरचित आर्थिक सल्ला आण ब्रोकिंग आणि रिसर्चसह इतर सेवा देते.  

2022- 2024 च्या काळात कंपनीचं उत्पन्न एकूण 38.77 टक्क्यांच्या दरानं सीएजीआरनं वाढून 182 कोटी रुपयांवर गेलं आहे. कंपनीनं आतापर्यंत 72 इक्विटी कॅपिटल मार्केट व्यवहार यशस्वीपणे केले आहेत. 

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

इतर बातम्या : 

धक्कादायक! जगातील प्रत्येक व्यक्तीवर 11 लाखांचं कर्ज, कर्जात कोणता देश कितव्या क्रमांकावर?

ख्रिसमसपूर्वी सोन्यानं दिला दणका, दरात झाली मोठी वाढ, 10 ग्रॅमसाठी किती द्यावे लागतात पैसे? 

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
नवीन CEO येताच एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट, 17 टक्के पगारवाढ करण्याचा निर्णय, पगारासोबत मिळणार इतरही लाभ
नवीन CEO येताच एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट, 17 टक्के पगारवाढ करण्याचा निर्णय, पगारासोबत मिळणार इतरही लाभ
गॅस आयात धोरणात मोठा बदल, 67 टक्के LPG  गॅस एकाच देशातून आयात होणार, सरकारनं घेतला मोठा निर्णय
गॅस आयात धोरणात मोठा बदल, 67 टक्के LPG  गॅस एकाच देशातून आयात होणार, सरकारनं घेतला मोठा निर्णय

व्हिडीओ

Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray On Mumbai Goa Highway: मी आता रस्ता पाहिला, सगळीकडे माती, काळजी घ्या नाहीतर...; मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केल्यानंतर राज ठाकरे अधिकाऱ्याला काय काय म्हणाले?
मी आता रस्ता पाहिला, सगळीकडे माती, काळजी घ्या नाहीतर...; मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केल्यानंतर राज ठाकरे अधिकाऱ्याला काय काय म्हणाले?
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?
Raj Thackeray On Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्ग का रखडला?, राज ठाकरेंनी फोन करताच नितीन गडकरींनी सांगितलं नेमंक कारण
मुंबई-गोवा महामार्ग का रखडला?, राज ठाकरेंनी फोन करताच नितीन गडकरींनी सांगितलं नेमंक कारण
H1B Visa: तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
Rahul Gandhi: नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
तामिळनाडूच्या 21 खासदारांचा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला कडाडून विरोध! सीएम विजय यांनी बोलावलेल्या बैठकीला DMK आणि AIADMK खासदारांनी पाठ फिरवली
तामिळनाडूच्या 21 खासदारांचा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला कडाडून विरोध! सीएम विजय यांनी बोलावलेल्या बैठकीला DMK आणि AIADMK खासदारांनी पाठ फिरवली
Mojtaba khamenei Video: कधी मृत्यू, कधी गंभीर जखमी, तर कधी इराणमध्ये नाहीतच अशी चर्चा रंगली असतानाच सर्वोच्च इराणी नेते मोजतबा खामेनींचा पहिला व्हिडिओ समोर! जमिनीवर बसून सहकाऱ्यांशी 'मन की बात'
कधी मृत्यू, कधी गंभीर जखमी, तर कधी इराणमध्ये नाहीतच अशी चर्चा रंगली असतानाच सर्वोच्च इराणी नेते मोजतबा खामेनींचा पहिला व्हिडिओ समोर! जमिनीवर बसून सहकाऱ्यांशी 'मन की बात'
Manoj Jarange Patil: 'मी समाजासाठी जीव देऊ शकतो अन् वेळ पडली तर जीव घेऊही शकतो'; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा
'मी समाजासाठी जीव देऊ शकतो अन् वेळ पडली तर जीव घेऊही शकतो'; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा
Embed widget