एक्स्प्लोर

Crypto Fever : बिटकॉईन टिक्का, इथेरियम बटर चिकन आणि बरचं काही... दिल्लीतील हॉटेलमध्ये बिटकॉईनने भरा बिल

Crypto Fever : बिटकॉईन टिक्का, इथेरियम बटर चिकन आणि बरचं काही... दिल्लीतील हॉटेलमध्ये बिटकॉईनने भरा बिल. दिल्लीतील कनॉट प्लेसमध्ये Ardor 2.1 रेस्टोरेंटने 'क्रिप्टो थाली' लॉन्च केली आहे.

Crypto Fever : गेल्या एका वर्षात भारतात क्रिप्टोकरन्सीचं क्रेझ वाढताना दिसत आहे. या वर्च्युअल करंन्सीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी जगभरातील अनेक गुंतवणूकदार उत्सुक असतात. देशात क्रिप्टोकरन्सीबाबत कोणतंही नियमन करण्यात आलेलं नसतानाही दररोज नवनवीन लोक क्रिप्टो बाजारात सामील होत आहेत. हीच बाब लक्षात घेत दिल्लीतील काही उद्योजकांनी क्रिप्टोकरंसीमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे. आता तुम्ही जेवणाच्या थाळीसाठी आपल्या क्रेडिट/डेबिट कार्ड, रोख रक्कम किंवा डिजिटल पेमेंटऐवजी बिटकॉइन, इथीरियम, डॅश, डोजेकॉइन, लाइटकॉइन यांसारख्या वर्च्युअल करंन्सीद्वारे पेमेंट करु शकता. 

दिल्लीतील कनॉट प्लेसमध्ये Ardor 2.1 रेस्टोरेंटने 'क्रिप्टो थाली' लॉन्च केली आहे. रेस्टॉरंटच्या मालकीण मेघा कालरा यांनी दावा केला आहे की, "देशात त्यांचं रेस्टॉरंट असं पहिलं रेस्टॉरंट आहे, ज्यांनी क्रिप्टोकरेंसी स्विकारण्यास सुरु केलं आहे. या रेस्टॉरंटमधील थाळीची किंमत 1,999 रुपये (कर वगळता)  इतकी ठेवण्यात आली आहे.", पुढे बोलताना कारला यांनी सांगितलं की, "ऑर्डर देण्यासाठी पूर्णपणे डिजिटल प्रक्रिया राबवण्यात येते. मेन्यूही ग्राहकांसमोर एका व्हिडीओ माध्यमातून वर्च्युअली प्ले होतो. ऑर्डर देताना आपली आवडती डिश निवडण्यासाठी एक क्यूआर कोड देण्यात येतो. त्यामुळे या रेस्टॉरंटमध्ये ऑर्डर देताना कोणत्याही व्यक्तीशी कोणत्याही प्रकारचा संवाद साधण्याची गरज भासत नाही. ही एक आगळी-वेगळी पद्धत आहे." दरम्यान, या रेस्टॉरंट्समध्ये 100 हून अधिक डिजिटल थाळी विकल्या गेल्यानंतरही बिल भरण्यासाठी क्रिप्टो करंन्सीची निवड करणारा पहिला ग्राहक मात्र अद्याप मिळालेला नाही. 

"क्रिप्टो हा मुख्य प्रवाहातील विषय आहे. म्हणून आम्हालाही त्याचा वापर करायचा होता आणि जाणून घ्यायचं होतं की, प्रयोगाच्या दृष्टीनं ते कसं कार्य करतं. आम्ही क्रिप्टोद्वारे पेमेंट करणाऱ्यांना 20 टक्के सूट देत आहोत, तर वापरकर्ते कोणत्याही सवलतीशिवाय रोख, कार्ड किंवा पेटीएमद्वारे पैसे देऊ शकतात. आमच्याकडे  बिटकॉइन टिक्का, सोलाना चोले भटुरे, पॉलीगॉन पिटा ब्रेड फलाफेल, इथेरियम बटर चिकन आणि बरेच काही पर्याय ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत.", असं कालरा यांनी फायनान्शियल एक्सप्रेस या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Petrol-Diesel Price Today : देशात इंधनाच्या दरांचा उच्चांक; आज पुन्हा पेट्रोल-डिझेलचा 'भडका', मुंबईत 'रेकॉर्ड ब्रेक' दर

 

महत्त्वाच्या बातम्या

UPI Transaction Charges : तुमच्या यूपीआय पेमेंटवर पैसे लागणार? सरकारचे दोन नवे फॉर्म्युले; दुकानदारांवर काय होणार परिणाम?
तुमच्या यूपीआय पेमेंटवर पैसे लागणार? सरकारचे दोन नवे फॉर्म्युले; दुकानदारांवर काय होणार परिणाम?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
तुम्ही कोणतं कार्ड वापरता? Airtel  चा ग्राहकांना मोठा दणका! सर्वात स्वस्त प्लॅन टाकला काढून, आता नवीन प्लॅन कोणता?
तुम्ही कोणतं कार्ड वापरता? Airtel  चा ग्राहकांना मोठा दणका! सर्वात स्वस्त प्लॅन टाकला काढून, आता नवीन प्लॅन कोणता?
दररोज संपत्तीत 4 हजार कोटींची वाढ, देशातील सर्वात श्रीमंत व्यावसायिकांकडे किती पैसा? जाणून घ्या कमाईबद्दल माहिती 
दररोज संपत्तीत 4 हजार कोटींची वाढ, देशातील सर्वात श्रीमंत व्यावसायिकांकडे किती पैसा? जाणून घ्या कमाईबद्दल माहिती 

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Hardik Pandya: हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
Embed widget