एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Petrol-Diesel Price Today : देशात इंधनाच्या दरांचा उच्चांक; आज पुन्हा पेट्रोल-डिझेलचा 'भडका', मुंबईत 'रेकॉर्ड ब्रेक' दर

Petrol-Diesel Price Today: आंतरराष्ट्रीय स्तरावर तेलाच्या किमतींनी 2014 नंतर पहिल्यांदाच उच्चांक गाठलाय. आज पेट्रोलच्या किमतींमध्ये 30 पैसे आणि डिझेलच्या किमतींमध्ये 35 पैसे प्रति लिटरची वाढ झाली आहे.

Petrol and Diesel Price Today 06 October 2021 : देशात इंधनदरवाढीचं सत्र काही थांबण्याचं नाव घेईना. सततच्या वाढणाऱ्या इंधनाच्या किमतीमुळं महागाईचा मारा सहन करणाऱ्या सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसत आहे. आतंरराष्ट्रीय बाजारात ज्या वेगानं कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमतींमध्ये वाढ होत आहे. त्याचप्रमाणे देशात पेट्रोल-डिझेलच्या दरांतही झपाट्यानं वाढ होत आहे. 

सध्या देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती (Fuel Price) ऐतिहासिक उंचीवर आहेत. ऑक्टोबरमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किमतींत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर तेलाच्या किमतींनी 2014 नंतर पहिल्यांदाच उच्चांक गाठला आहे. जागतिक बेंचमार्क ब्रेंट $ 81 प्रति बॅरल पार केलं आहे. त्यामुळे देशभरातही इंधनाचे दर वाढण्यासोबतच पेट्रोल-डिझेलच्या किमती दररोज नवा उच्चांक गाठत आहे. 

सरकारी तेल कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार, आज (बुधवारी) पेट्रोलच्या किमतींमध्ये 30 पैसे प्रति लिटर आणि डिझेलच्या किमतींमध्ये 35 पैसे प्रति लिटरची वाढ करण्यात आली आहे. त्यासोबतच राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर 102.94 रुपये प्रति लिटर आणि मुंबईमध्ये 108.96 रुपयांवर पोहोचलं आहे. डिझेलच्या किमतींमध्येही मोठी वाढ झाली असून दिल्लीत 91.42 रुपये प्रति लिटर आणि मुंबईत 99.17 रुपये प्रति लिटरचा उच्चांक गाठला आहे. 

देशातील प्रमुख महानगरांतील दर :

देशातील महत्त्वाची शहरं पेट्रोल रुपये/लिटर डिझेल रुपये/लिटर
दिल्ली  102.94 91.42
मुंबई  108.96 99.17
कोलकाता  103.65 94.53
चेन्नई  100.49 95.93

ऑक्टोबरमध्ये आतापर्यंतची पाचवी वाढ

ऑक्टोबरमध्ये एका आठवड्याहून कमी वेळात पेट्रोलच्या किमतींमध्ये पाचवी वाढ झाली आहे. 24 सप्टेंबरपासून आतापर्यंत डिझेलच्या किमतींमध्ये 2 रुपये 80 प्रति लिटरची वाढ झाली आहे. 28 सप्टेंबरपासून आतापर्यंत 1 रुपये 80 पैसे प्रति लिटर महाग झालं आहे. या महिन्यात आतापर्यंत एक दिवस (04 ऑक्टोबर) पट्रोल-डिझेलचे दर स्थिर होते. 

पेट्रोल-डिझेल GSTमध्ये घेण्यासाठी का तयार नाही केंद्र आणि राज्य सरकार?

केंद्र सरकारनं कर प्रणालीमध्ये सुधारणांची गरज असल्याचं कारण देत जीएसटी (GST) लागू केला होता. पण जीएसटीमध्ये पेट्रोल आणि डिझेलचा समावेश करण्यात आलेला नाही. तसेच देशातील बहुतांश राज्य सरकारचंही हेच मत आहे की, पेट्रोल-डिझेलचा जीएसटीच्या कक्षेत समावेश केला जाऊ नये. पण का?  यामुळे काय फायदा होणार? यांसारखे अनेक प्रश्न आपल्या सर्वांच्या मनात निर्माण झाले आहेत. जाणून घेऊया यामागील कारणं... 

पेट्रोल-डिझेलच्या किमती जीएसटीच्या कक्षेत आणण्याची केंद्र सरकारसोबत राज्य सरकारचीही इच्छा नाही. कारण सरकारला चिंता आहे ती, देशाच्या तिजोरीची. सामान्य माणसाला दिलासा देता-देतो, देशाच्याच तिजोरीत खडखडाट होण्याची भिती सरकारला वाटतेय. जर पेट्रोल-डिझेलचा समावेश जीएसटीच्या कक्षेत केला, तर पेट्रोल-डिझेलच्या किमती अर्ध्या होणार. आजच्या किमतीनुसार जर अंदाज लावला तर, पेट्रोल 56 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 55 रुपये प्रति लिटर विकलं जाईल. 

पेट्रोल आणि डिझेलचे दर कुठे आणि कसे पाहाल?

इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App  तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत). 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra CM : शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
Sanjay Gaikwad : आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
Numerology : अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच म्हणणं करतात खरं
अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच करतात खरं
Maharashtra Ekikaran Samiti : बेळगावात मराठी भाषकांच्या मेळाव्यास परवानगी नाहीच, कडक कारवाई करण्याचा कर्नाटक पोलिसांचा इशारा
बेळगावात मराठी भाषकांच्या मेळाव्यास परवानगी नाहीच, कडक कारवाई करण्याचा कर्नाटक पोलिसांचा इशारा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  6:30 AM : 30 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSpecial Report Eknath Shinde : काळजीवाहू मुख्यमंत्र्यांना कोणती काळजी सतावतेय?Special Report Eknath Shnde Dimand : एकनाथ शिंदे नाराज, कुठे रखडलं? मंत्रिपदावरुन अडलं?Special Report Mahayuti Mla Mantripad : मंत्रिपदाची आस, कोणाच्या नावासमोर लागणार मंत्रिपदाचा टीळा?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra CM : शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
Sanjay Gaikwad : आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
Numerology : अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच म्हणणं करतात खरं
अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच करतात खरं
Maharashtra Ekikaran Samiti : बेळगावात मराठी भाषकांच्या मेळाव्यास परवानगी नाहीच, कडक कारवाई करण्याचा कर्नाटक पोलिसांचा इशारा
बेळगावात मराठी भाषकांच्या मेळाव्यास परवानगी नाहीच, कडक कारवाई करण्याचा कर्नाटक पोलिसांचा इशारा
Waqf Board : काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डला 10 कोटींचा निधी, या प्रकाराची चौकशी करणार; देवेंद्र फडणवीसांचा पहिला मोठा निर्णय
काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डला 10 कोटींचा निधी, या प्रकाराची चौकशी करणार; देवेंद्र फडणवीसांचा पहिला मोठा निर्णय
AR Rahman Net Worth : भारतापासून अमेरिकेपर्यंत आलिशान घरे, महागड्या कार; किंग कोहलीपेक्षाही गर्भश्रीमंत, एकूण किती हजार कोटींचा मालक?
एआर रहमान : भारतापासून अमेरिकेपर्यंत आलिशान घरे, महागड्या कार; किंग कोहलीपेक्षाही गर्भश्रीमंत, एकूण किती हजार कोटींचा मालक?
Champions Trophy : तर चॅम्पियन्स ट्रॉफी भारतामध्ये होणार? पाकिस्तानात होणार की नाही? आजच निर्णय होण्याची शक्यता
तर चॅम्पियन्स ट्रॉफी भारतामध्ये होणार? पाकिस्तानात होणार की नाही? आजच निर्णय होण्याची शक्यता
डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे गेला चिमुकल्याचा जीव, मृत्यूनंतर 11 दिवस ठेवलं व्हेंटिलेटरवर; संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार
डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे गेला चिमुकल्याचा जीव, मृत्यूनंतर 11 दिवस ठेवलं व्हेंटिलेटरवर; संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार
Embed widget