कसे व्हाल करोडपती? कोणत्या योजनेत कराल पैशांची गुंतवणूक, सविस्तर माहिती एका क्लिकवर
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) सारख्या सरकारी योजनेद्वारे करोडपती बनू शकता. या सरकारी हमी योजनेत तुमची गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित राहते.
Investmant Plan: कमी काळात तुम्हाला श्रीमंत व्हायचे असेल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. जर तुम्ही करोडपती (Crorepati) होण्याचे स्वप्न पाहत असाल, परंतू, सरासरी पगारामुळं तुम्हाला असे वाटत असेल की हे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही, तर हे चुकीचे आहे. तुम्ही सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) सारख्या सरकारी योजनेद्वारे करोडपती बनू शकता. या सरकारी हमी योजनेत तुमची गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित राहते कारण त्यावर बाजारातील चढउतारांचा परिणाम होत नाही. तुमचा मासिक पगार जरी 65 ते 70 हजार रुपये असला तरी तुम्ही या योजनेद्वारे तुमचे करोडपती होण्याचे स्वप्न सहज पूर्ण करू शकता.
25 वर्षात व्हाल करोडपती
पीपीएफमध्ये वार्षिक गुंतवणुकीची कमाल मर्यादा 1.5 लाख रुपये आहे. अशा परिस्थितीत, करोडपती बनण्यासाठी, तुम्हाला दरवर्षी एवढी रक्कम पीपीएफमध्ये जमा करावी लागेल. मासिक आधारावर गणना केल्यास, तुम्हाला पीपीएफमध्ये दरमहा सुमारे 12,500 रुपये गुंतवावे लागतील. PPF योजना 15 वर्षांमध्ये परिपक्व होते, परंतु मुदतपूर्तीनंतर, तुम्हाला योगदान चालू ठेवून 5 वर्षांच्या ब्लॉकमध्ये दोनदा योजना वाढवावी लागेल. अशा प्रकारे तुम्हाला 25 वर्षे वार्षिक 1,50,000 रुपयांची गुंतवणूक चालू ठेवावी लागेल. सध्या या योजनेवर 7.1 टक्के व्याज दिले जात आहे. तुम्ही गणना केल्यास, तुम्ही 25 वर्षांत 37,50,000 रुपये गुंतवाल, परंतु तुम्हाला 65,58,015 रुपये व्याज म्हणून मिळतील. अशा प्रकारे, गुंतवलेली रक्कम आणि व्याजाच्या रकमेसह 25 वर्षानंतर, तुम्हाला PPF मधून 1,03,08,015 रुपये मिळतील. अशा प्रकारे तुम्ही 25 वर्षात करोडपती व्हाल.
दरमहा 12,500 गुंतवणूक केल्यास होणार मोठा फायदा
दरम्यान, तुमच्या मनात असा प्रश्न असेल की, तुम्ही दरमहा 12,500 रुपये कसे गुंतवाल? समजा तुमचा पगार 65 ते 70 हजार रुपये आहे तरी हे काम तुमच्यासाठी अवघड नाही. अशा परिस्थितीत, तुम्हाला फक्त 20 टक्के गुंतवणुकीचा आर्थिक नियम स्वीकारावा लागेल. या नियमानुसार, प्रत्येक व्यक्तीने कोणत्याही परिस्थितीत त्याच्या उत्पन्नाच्या 20 टक्के गुंतवणूक करावी. अशा परिस्थितीत, जर तुम्ही दरमहा 65,000 रुपये कमावत असाल, तर तुम्ही 20 टक्के दराने 13,000 रुपये गुंतवले पाहिजेत. पण PPF मध्ये तुम्हाला दरमहा फक्त 12,500 रुपये गुंतवावे लागतील, त्यामुळे हे काम फार कठीण नाही. या योजनेत तुम्ही अगदी सहजपणे वार्षिक 1.5 लाख रुपये जमा करु शकता आणि स्वतःला हमखास करोडपती बनवू शकता.
महत्त्वाच्या बातम्या: