क्रेडिट कार्ड, LPG सिलेंडर ते पॅनकार्डपर्यंत...आजपासून हे 7 नवे नियम बदललेत, सामान्यांच्या खिशावर होणार परिणाम
New Rules: देशांतर्गत उड्डाण्णांसाठी जेट इंधनाच्या किमतींमध्ये सुमारे साडेसात टक्क्यांची वाढ झाली आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये जेट फ्युएलमध्ये 6,271 रुपयांची वाढ झाली आहे.

New Rules And Guidelines: आजपासून म्हणजे 1 जुलै 2025 पासून अनेक नियमांमध्ये बदल झाला आहे. या नियमांचा आपल्या दैनंदिन आयुष्यावर थेट परिणाम होणार आहे. यामध्ये रेल्वे तिकीट बुकिंग, क्रेडिट कार्ड, जीएसटी रिटर्न आणि एलपीजी सिलेंडरच्या नव्या किमती यांचा समावेश आहे. नेमके काय बदल झाले? या बदलांचा आपल्या जीवनावर काय परिणाम होणार? जाणून घेऊया..
1. क्रेडिट कार्डचे बिल पेमेंट
क्रेडिट कार्डबाबत आरबीआयने नवीन नियम लागू केला आहे. त्यानंतर आजपासून म्हणजेच 1 जुलैपासून सर्व खासगी आणि सरकारी बँकांच्या काही नियमांमध्ये याबाबत बदल झाला आहे. आता सर्व क्रेडिट कार्डधारकांना भारत बिल पेमेंट सिस्टीमच्या माध्यमातून पेमेंट करावे लागेल. यानंतर बिलडेस्क, इन्फीबीम एवेन्यू, क्रेड आणि फोनपे यांसारख्या प्लॅटफॉर्मवर याचा परिणाम होणार आहे.
2. नवीन पॅन कार्डसाठी नियम
आता नवीन पॅन कार्ड बनवण्यासाठी आधार देणे अनिवार्य असेल. यापूर्वी पॅन कार्ड बनवण्यासाठी जन्म प्रमाणपत्र किंवा इतर कोणतेही वैध कागदपत्र पुरेसे होते. पण सीबीडीटीने आता आधार व्हेरिफिकेशन अनिवार्य केले आहे.
3. कमर्शियल सिलेंडरच्या किमतीत कपात
आजपासून कमर्शियल सिलेंडर स्वस्त झाला आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडनुसार, दिल्लीमध्ये कमर्शियल सिलेंडर 58.5 रुपये, कोलकाता मध्ये 57 रुपये, मुंबईत 58 रुपये आणि चेन्नईमध्ये 57.5 रुपये प्रतिसिलेंडर स्वस्त झाला आहे. हे सलग चौथे महिना आहे की कमर्शियल सिलेंडरच्या किमतीत घसरण झाली आहे.
4. यूपीआयचे नियम
आजपासून यूपीआय चार्जबॅकचा नवीन नियमही लागू झाला आहे. रद्द झालेले चार्जबॅक क्लेम पुन्हा प्रोसेस करण्यासाठी आतापर्यंत बँकांना एनपीसीआय म्हणजेच नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून परवानगी घ्यावी लागायची. पण आता गेल्या महिन्याच्या 20 तारखेला जाहीर झालेल्या नव्या नियमानुसार एनपीसीआयच्या परवानगीशिवायच बँका चार्जबॅक क्लेम पुन्हा प्रोसेस करू शकतील.
5. आरक्षण चार्ट
आतापर्यंत ट्रेन रवाना होण्याच्या चार तास आधी आरक्षण चार्ट जारी केला जात होता. पण यामध्ये आता रेल्वेने बदल केला आहे, कारण वेटिंग लिस्ट असलेल्या प्रवाशांना यामुळे खूप त्रास होत होता. आता 1 जुलैपासून आरक्षण चार्ट आठ तास आधीच तयार केला जाईल. यानुसार जर तुमची ट्रेन दुपारी 1 वाजता सुटत असेल तर आदल्या रात्री 8 वाजताच तो तयार होऊन जारी केला जाईल.
6. जीएसटी रिटर्न
आता जीएसटीएन म्हणजेच जीएसटी नेटवर्कने घोषणा केली आहे की, जीएसटीआर-3बी फॉर्म एडिट करता येणार नाही. याशिवाय, कोणताही करदाता तीन वर्षांनंतर मागील तारखेचा जीएसटी रिटर्न भरू शकणार नाही.
7. जेट इंधनाच्या किमती वाढल्या
घरगुती फ्लाइटसाठी लागणाऱ्या जेट इंधनाच्या किमतीत सुमारे साडेसात टक्क्यांची वाढ झाली आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये जेट फ्यूलमध्ये 7.55 टक्के म्हणजेच 6,271 रुपयांची वाढ झाली असून, नवीन किंमत 89,344.05 रुपये प्रति किलोलीटर इतकी झाली आहे. तर कोलकातामध्ये 7.52 टक्के वाढीनंतर नवीन दर 92,526.09 रुपये, मुंबईत 7.66 टक्क्यांच्या वाढीनंतर नवीन दर 5,946.5 रुपये आणि चेन्नईत 7.67 टक्के वाढीनंतर नवीन दर 6,602.49 रुपये प्रति किलोलीटर झाला आहे.
हेही वाचा
शिक्षण फक्त 10 वी पास, संरक्षण क्षेत्रात नोकरीची मोठी संधी, 1800 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु
























