एक्स्प्लोर

Oxfam Report : दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

Oxfam International Report: कोरोना महासाथीच्या काळात जगभरात आर्थिक विषमता मोठ्या प्रमाणावर वाढली असल्याचे Oxfam International च्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

Oxfam International Report:  कोरोना महासाथीच्या आजाराने जगभरात हाहा:कार उडला होता. कोरोना महासाथीमुळे कोट्यवधी कुटुंबावर परिणाम झाला. कोरोना महासाथीमुळे जगभरात आर्थिक विषमता वाढली. कोरोनाच्या दोन वर्षाच्या काळात अब्जाधीशांच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली. मागील 23 वर्षात त्यांची संपत्ती इतक्या प्रमाणात वाढली नव्हती, असा दावा ऑक्सफॅम इंटरनॅशनलच्या  (Oxfam International) अहवालात करण्यात आला आहे. 

ऑक्सफॅम इंटरनॅशनलने आपल्या अहवालात म्हटले की, कोरोना महासाथीच्या 24 महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणावर संपत्ती वाढली. मागील 23 वर्षांमध्ये संपत्तीमध्ये इतकी वाढ कधीच झाली नव्हती. 

जगात सध्या 2668 अब्जाधीश असल्याचे  ऑक्सफॅम इंटरनॅशनलच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. या अब्जाधीशांकडे 12.7 ट्रिलियन डॉलर म्हणजे जवळपास 984.95 लाख कोटींची संपत्ती आहे. हा आकडा जगाच्या जीडीपीच्या 14 टक्के इतका आहे. 

>> ऑक्सफॅम इंटरनॅशनलच्या अहवालात आहे काय?

श्रीमंत आणखी श्रीमंत झाले:  कोरोना महासाथीनंतर  जगभरात अब्जाधीशांच्या संख्येत 573 जणांची भर पडली. म्हणजेच जवळपास दर 30 तासामध्ये एका अब्जाधीशाची भर पडली. या अब्जाधीशांच्या संपत्तीत महासाथीच्या काळात 42 टक्के म्हणजेच 293.16 लाख कोटींची भर पडली. जगातील 3.1 अब्ज लोकसंख्येकडे असलेली संपत्ती जगातील सर्वोच्च 10 अब्जाधीशांकडे आहे. 

गरीब आणखी गरीब झाले: कोरोना महासाथीच्या काळात 99 टक्के लोकांच्या कमाईत घट झाली आहे. वर्ष 2021 मध्ये 12.5 कोटींहून अधिकजण बेरोजगार झालेत. वर्ष 2021 मध्ये 40 टक्के लोकांच्या उत्पन्नात घट झाली. महासाथ सुरू होण्याआधी 6.7 टक्के लोकांच्या कमाईत घट होत होती. 

कंपन्यांचे उत्पन्न वाढले: महासाथीच्या काळात फार्मा उद्योगाशी संबंधित 40 जण अब्जाधीश झाले. मॉडर्ना आणि फायजरसारख्या कंपन्यांनी प्रति सेकंदाला 1 हजार डॉलरचा नफा कमावला. फार्मा कंपन्यांनी सरकारकडून जेनरिक उत्पादनासाठी 24 पट अधिक शुल्क घेतले. 

बेरोजगार महिलांच्या संख्येत वाढ: महासाथीच्या आधी स्त्री-पुरुष यांच्या वेतनातील भेदभावा संपुष्टात येण्यासाठी 100 वर्ष लागतील असा अंदाज होता. आता मात्र ही शक्यता 136 वर्ष इतकी वाढली आहे. वर्ष 2020 मध्ये पुरुषांपेक्षा महिलांचा रोजगार कमी होण्याची शक्यता 1.4 पट अधिक होती. तर, वर्ष 2019 च्या तुलनेत 2021 नोकरी करणाऱ्या महिलांची संख्या 1.3 कोटीपेक्षा कमी होते. तर, नोकरी करणाऱ्या पुरुषांची संख्या वर्ष 2019 इतकी झाली होती. 

गरिबांचे आर्युमान घटणार: श्रीमंत देशातील नागरिकांचे सरासरी दरडोई उत्पन्न गरीब देशांमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या तुलनेत 16 वर्षांनी अधिक आहे. पुरेशी आरोग्य सुविधा न मिळाल्याने दरवर्षी 56 लाख लोकांना प्राण  गमवावे लागत आहे. त्यानुसार, दररोज 15 हजार जणांचा मृत्यू होत आहे. 

गरिबीत वाढ होणार 

ऑक्सफॅमच्या अहवालानुसार गेल्या वर्षी खाद्यपदार्थांच्या किमती 33.6 टक्क्यांनी वाढल्या होत्या. यंदाही भावात 23 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. अन्नधान्याच्या किमती वाढल्याने जगात आणखी गरिबी वाढेल. यावर्षी 26.3 कोटी लोक खूप गरीब असतील. त्यानुसार या वर्षी दर 33 तासांनी 1 कोटी लोक गरीब होतील.

श्रीमंत गरीब दरी कशी मिटवणार?

श्रीमंत आणि गरीब यांच्यातील ही दरी कमी करण्यासाठी ऑक्सफॅमने अधिक कर वाढवण्याची सूचना केली आहे. 5 दशलक्ष डॉलर संपत्ती असलेल्या लोकांवर 2 टक्के आणि 50 दशलक्ष डॉलर संपत्ती असलेल्या लोकांवर 3 टक्के कर आकारला जावा. त्याच वेळी, ज्यांच्याकडे 1 अब्ज डॉलरपेक्षा जास्त संपत्ती आहे, त्यांच्यावर 5 टक्के कर आकारला जावा. कर वाढवून, जगातील श्रीमंतांकडून दरवर्षी 2.52 ट्रिलियन डॉलर (रु. 195.44 लाख कोटी) कर येईल, ज्यामुळे जगातील 2.3 अब्ज लोकांना गरिबीतून बाहेर काढण्यास मदत होईल, असा दावाही ऑक्सफॅमच्या अहवालात करण्यात आला आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं स्मारक बांधणार; काँग्रेसच्या पत्रानंतर केंद्र सरकारचा निर्णय
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं स्मारक बांधणार; काँग्रेसच्या पत्रानंतर केंद्र सरकारचा निर्णय
Nitish Kumar Reddy : नितीश कुमार रेड्डी... फ्लावर नहीं फायर है! खांद्याला दुखापत तरी ठोकले पहिले अर्धशतक, पुष्पा स्टाईल सेलिब्रेशन, Video
नितीश कुमार रेड्डी... फ्लावर नहीं फायर है! खांद्याला दुखापत तरी ठोकले पहिले अर्धशतक, पुष्पा स्टाईल सेलिब्रेशन, Video
वाल्मिक कराडला अद्याप अटक का नाही? छत्रपती संभाजीराजेंचा संतप्त सवाल; म्हणाले, धनंजय मुंडेंना...
वाल्मिक कराडला अद्याप अटक का नाही? छत्रपती संभाजीराजेंचा संतप्त सवाल; म्हणाले, धनंजय मुंडेंना...
Ind vs Aus 4th Test Day-3 : तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात टीम इंडियाला 2 धक्के! फॉलोऑन वाचवण्यासाठी 'इतक्या' धावांची गरज, भारत 'ही' कसोटी जिंकणार?
तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात टीम इंडियाला 2 धक्के! फॉलोऑन वाचवण्यासाठी 'इतक्या' धावांची गरज, भारत 'ही' कसोटी जिंकणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Deshmukh on Santosh Deshmukh Case : तपासावर समाधानी नाही, मारेकऱ्यांना तात्काळ अटक कराTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 28 डिसेंबर 2024 : ABP MajhaSambhaji Raje on Santosh Deshmukh Case : Dhananjay Munde यांनी राजीनामा द्यावा ; संभाजीराजेTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 28 डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं स्मारक बांधणार; काँग्रेसच्या पत्रानंतर केंद्र सरकारचा निर्णय
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं स्मारक बांधणार; काँग्रेसच्या पत्रानंतर केंद्र सरकारचा निर्णय
Nitish Kumar Reddy : नितीश कुमार रेड्डी... फ्लावर नहीं फायर है! खांद्याला दुखापत तरी ठोकले पहिले अर्धशतक, पुष्पा स्टाईल सेलिब्रेशन, Video
नितीश कुमार रेड्डी... फ्लावर नहीं फायर है! खांद्याला दुखापत तरी ठोकले पहिले अर्धशतक, पुष्पा स्टाईल सेलिब्रेशन, Video
वाल्मिक कराडला अद्याप अटक का नाही? छत्रपती संभाजीराजेंचा संतप्त सवाल; म्हणाले, धनंजय मुंडेंना...
वाल्मिक कराडला अद्याप अटक का नाही? छत्रपती संभाजीराजेंचा संतप्त सवाल; म्हणाले, धनंजय मुंडेंना...
Ind vs Aus 4th Test Day-3 : तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात टीम इंडियाला 2 धक्के! फॉलोऑन वाचवण्यासाठी 'इतक्या' धावांची गरज, भारत 'ही' कसोटी जिंकणार?
तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात टीम इंडियाला 2 धक्के! फॉलोऑन वाचवण्यासाठी 'इतक्या' धावांची गरज, भारत 'ही' कसोटी जिंकणार?
पालघर रेल्वे स्थानकाजवळ भीषण अपघात, रेल्वेच्या धडकेत 2 जणांचा जागीच मृत्यू, 1 जण गंभीर
पालघर रेल्वे स्थानकाजवळ भीषण अपघात, रेल्वेच्या धडकेत 2 जणांचा जागीच मृत्यू, 1 जण गंभीर
Success Story : माढ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! 23 व्या वर्षी दोघीही  CA उत्तीर्ण, नेमकी कशी घातली यशाला गवसणी?
माढ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! 23 व्या वर्षी दोघीही  CA उत्तीर्ण, नेमकी कशी घातली यशाला गवसणी?
मोठी बातमी! सोलापुरात राहणाऱ्या 3 बांगलादेशी तरुणांना अटक, एजंटकडून काढली होती बनावट आधार कार्ड 
मोठी बातमी! सोलापुरात राहणाऱ्या 3 बांगलादेशी तरुणांना अटक, एजंटकडून काढली होती बनावट आधार कार्ड 
जगातील 10 सर्वात मोठे कर्जदार देश कोणते? भारताच्या तुलनेत अमेरिकेवर 10 पट कर्ज अधिक
जगातील 10 सर्वात मोठे कर्जदार देश कोणते? भारताच्या तुलनेत अमेरिकेवर 10 पट कर्ज अधिक
Embed widget