महागाई नियंत्रणासाठी सरकारचे प्रयत्न, 'या' वस्तूंच्या निर्यातीवर बंदी कायम
देशातील महागाई नियंत्रणात (Control inflation) आणण्यासाठी आणि अचानक वाढलेल्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार गेल्या काही महिन्यांपासून सातत्यानं प्रयत्न करत आहे.
Control Inflation : देशातील महागाई नियंत्रणात (Control inflation) आणण्यासाठी आणि अचानक वाढलेल्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार गेल्या काही महिन्यांपासून सातत्यानं प्रयत्न करत आहे. यासाठी केंद्रानं 2022 मध्येच पहिले मोठे पाऊल उचलले होते. देशातील नागरिकांच्या हितासाठी मोदी सरकारकडून विविध योजना आखल्या जात आहेत. काही महिन्यांपूर्वी केंद्र सरकारनं गहू, तांदूळ आणि साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली होती. यामुळं व्यापार्यांचे नुकसान होत असले तरी भारताबाहेर माल जात नसल्यानं तो रास्त भावात देशातील जनतेला उपलब्ध होत आहे.
बंदी उठवण्याचा हेतू नाही
गहू, तांदूळ आणि साखरेच्या निर्यातीवरील निर्बंध हटवण्याचा सरकारपुढे सध्या कोणताही प्रस्ताव नाही, असे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी सांगितले. गोयल म्हणाले की, भारताचा गहू आणि साखर आयात करण्याचाही कोणताही विचार नाही. गहू, तांदूळ आणि साखरेवरील निर्यातबंदी उठवण्याचा सध्या कोणताही प्रस्ताव नसल्याचे गोयल म्हणाले.
एक वर्षाची बंदी
वाढत्या देशांतर्गत किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी भारताने मे 2022 मध्ये गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. यानंतर जुलै 2023 पासून बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवरही बंदी आहे. सरकारने ऑक्टोबर 2023 मध्ये साखरेच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा आदेशही जारी केला होता. गहू आणि साखर आयात करण्याची कोणतीही योजना किंवा गरज नसल्याचेही ते म्हणाले. गैर-बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी असतानाही, भारत आपल्या मित्र देशांना त्यांच्या अन्न सुरक्षा गरजांसाठी तांदूळ पुरवत आहे. भारताने इंडोनेशिया, सेनेगल आणि गांबियासारख्या देशांना तांदूळ पुरवला आहे.
महत्वाच्या बातम्या: