Gold Import Duty : सोन्यावरील आयात शुल्क चार टक्के करण्याचा प्रस्ताव, जाणून घ्या काय होणार परिणाम
Gold Import Duty : वाणिज्य मंत्रालयाने सोन्यावरील आयात शुल्कात घट करण्याचा प्रस्ताव दिला आहे.
Gold Import Duty News: आज सोन्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. त्यामुळे सोने आणि ज्वेलरीशी संबंधित शेअर दरात मोठी हालचाल दिसत आहे. वाणिज्य मंत्रालयाने सोन्यावरील आयात शुल्कात कपात करून चार टक्के करण्याचा प्रस्ताव दिला आहे. सध्या सोन्यावर 7.5 टक्के आयात शुल्क आहे. त्याशिवाय त्यावर आणखी 2.5 टक्के कृषी सेस लावण्यात येतो. त्यामुळे एकूण आयात शुल्क 10 टक्क्यांवर जाते.
आयात शुल्क कपातीचा काय फायदा?
सोन्यावरील आयात शुल्कात कपात करावी अशी मागणी दीर्घकाळापासून करण्यात येत आहे. आता वाणिज्य मंत्रालयाने त्याचा प्रस्ताव सादर करत या मागणीला बळ दिले आहे. भारत हा मोठ्या प्रमाणावर सोने आयात करणाऱ्या देशांपैकी एक आहे. या वर्षी 900 टन सोन्याची आयात करण्यात आली आहे. आतापर्यंतची ही सर्वाधिक आयात आहे. सोन्यावरील आयात शुल्क 12 टक्क्यांवर 7.5 टक्क्यांवर करण्याची घोषणा या वर्षीच्या केंद्रीय अर्थसंकल्पात करण्यात आली होती. या घोषणेचे स्वागत करण्यात आले होते.
सोन्याची तस्करी कमी होणार?
वाणिज्य मंत्रालयाने केलेली शिफारस केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्य केल्यास त्याचा थेट परिणाम सोन्याच्या तस्करीवर होऊ शकतो. या निर्णयामुळे सोन्याची तस्करी कमी होऊ शकते. भारतात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीरपणे सोन्याची आयात होते. त्यामुळे सरकारचा मोठा महसूल बुडतो. या वर्षी 900 टन सोने आयात झाले आहे. मात्र, तरीदेखील जवळपास 25 टक्के सोने बेकायदेशीपणे भारतात आले असल्याचे म्हटले जाते. मागील वर्षी 350 टन सोने आयात करण्यात आले होते. या वर्षी आयातीत वाढ झाली असून 900 टन सोने आयात करण्यात आले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या: