
Share Market Updates : शेअर बाजारात पडझड सुरूच, सेन्सेक्स आजही 372 अंकांनी घसरला
एफएमसीजी, मेटल आणि फार्मा या कंपन्यांच्या शेअर्समध्ये एक टक्क्यांची वाढ झाली आहे तर ऑईल अॅन्ड गॅस, उर्जा कंपन्यांच्या शेअर्समध्ये एक टक्क्यांची घट झाली.

मुंबई: या आठवड्याच्या सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण झाल्याचं दिसून आलं आहे. आजही शेअर बाजारामध्ये पडझड झाली असून मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये 372 अंकांची घसरण झाली आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक असलेल्या निफ्टीमध्ये आज 91 अंकांची घसरण झाली आहे. सेन्सेक्समध्ये आज 0.69 टक्क्यांची घसरण होऊन तो 53,514 अंकावर स्थिरावला तर निफ्टीमध्ये 0.57 अंकांची घसरण होऊन तो 15,966 अंकांवर पोहोचला. बँक निफ्टीमध्येही आज 304 अंकांची घसरण होऊन तो 34,827 अंकावर स्थिरावला आहे.
आज शेअर बाजार बंद होताना 1649 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे तर 1584 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे. 141 कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही.
IndusInd Bank, HDFC, Bharti Airtel, HDFC Bank आणि Reliance Industries या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये आज घसरण झाली आहे. तर Divis Labs, JSW Steel, HUL, Cipla आणि Asian Paints या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली आहे.
एफएमसीजी, मेटल आणि फार्मा या कंपन्यांच्या शेअर्समध्ये एक टक्क्यांची वाढ झाली आहे तर ऑईल अॅन्ड गॅस, उर्जा कंपन्यांच्या शेअर्समध्ये एक टक्क्यांची घट झाली. मिडकॅपमध्ये 0.32 टक्क्यांची वाढ झाली आहे तर स्मॉलकॅपमध्ये काहीशी घसरण झाली.
रुपयाची घसरण सुरूच
डॉलरच्या तुलनेत आजही रुपया घसरला असून रुपयाची किंमत आज 79.63 इतकी झाली आहे.
या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली
- Divis Labs- 2.48 टक्के
- JSW Steel- 2.46 टक्के
- HUL- 1.97 टक्के
- Cipla- 1.88 टक्के
- Asian Paints- 1.66 टक्के
या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली
- IndusInd Bank- 3.31 टक्के
- Bharti Airtel- 2.94 टक्के
- HDFC - 2.78 टक्के
- HDFC Bank - 2.44 टक्के
- Reliance- 1.77 टक्के
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
