Share Market : शेअर बाजारात तेजी, Nifty 17,800 वर तर Sensex 400 अंकांनी वधारला
Stock Market Update : ऑटो, रिअॅलिटी, ऑईल अॅन्ड गॅस, फार्मा आणि उर्जा या क्षेत्रातल्या शेअर्समध्ये दोन टक्क्यांपर्यंत वाढ झाली.

मुंबई: तीन दिवसांच्या सुट्टीनंतर खुल्या झालेल्या शेअर बाजारासाठी आजचा दिवस चांगला ठरला. आज शेअर बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये 400 अंकांची वाढ झाली, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक असलेल्या निफ्टीमध्ये 133अंकांची वाढ झाली. सेन्सेक्समध्ये आज 0.67 टक्क्यांची वाढ होऊन 59,863 तो अंकावर पोहोचला. तर निफ्टीमध्ये 0.76 टक्क्यांची वाढ होऊन तो 17,831 अंकावर पोहोचला. निफ्टी बँकच्या इंडेक्समध्येही आज 207 अंकांची वाढ होऊन तो 39,249 अंकांवर पोहोचला.
आज शेअर बाजार बंद होताना 1926 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली, तर 1527 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घट झाली. तसेच 153 कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही. आज HDFC Life, Adani Ports, Eicher Motors, BPCL आणि Maruti Suzuki या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली. तर Grasim Industries, Hindalco Industries, SBI, Bharti Airtel आणि JSW Steel या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये काहीशी घट झाली.
मेटल आणि सार्वजनिक बँका सोडल्या तर इतर सर्व क्षेत्रातल्या कंपन्याच्या शेअर्समध्ये वाढ झाली. ऑटो, रिअॅलिटी, ऑईल अॅन्ड गॅस, फार्मा आणि उर्जा या क्षेत्रातल्या शेअर्समध्ये दोन टक्क्यांपर्यंत वाढ झाली. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्येही एक टक्क्यांची वाढ झाली.
शेअर बाजाराची सुरुवात
आज बीएसईचा निर्देशांक सेन्सेक्स 212.34 अंकांनी वधारत 59,675.12 अंकांवर खुला झाला. तर, एनएसईचा निर्देशांक निफ्टी 99.05 अंकांनी वधारत 17797 अंकांवर खुला झाला. सकाळी 9.40 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 440 अंकांनी वधारत 59,903.17 अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी 124 अंकांनी वधारत 17,823.05 अंकावर व्यवहार करत होता.
या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली
- HDFC Life- 4.71 टक्के
- Adani Ports- 4.54 टक्के
- Eicher Motors- 3.98 टक्के
- BPCL- 3.59 टक्के
- Maruti Suzuki- 3.50 टक्के
या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घट झाली
- Grasim- 1.91 टक्के
- Hindalco- 1.68 टक्के
- SBI- 0.90 टक्के
- Bharti Airtel- 0.79 टक्के
- JSW Steel- 0.64 टक्के
महत्त्वाच्या बातम्या;























