Share Market : पाच सत्रांच्या घसरणीला लगाम, Sensex 574 तर Nifty 177 अंकांनी वधारला
Share Market : ऑटो, फार्मा, आयटी, ऑईल अॅन्ड गॅस या क्षेत्रातील शेअर्स एक ते दोन टक्क्यांनी वधारले. मेटल आणि बँकिंग क्षेत्रातल्या शेअर्सची विक्री झाली.

मुंबई: शेअर बाजारातील गेल्या पाच सत्रांच्या घसरणीला आज लगाम लागला आहे. शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स 574 अंकांनी वधारला तर निफ्टीही 177 अंकानी वधारला आहे. सेन्सेक्समध्ये 1.02 टक्क्यांची वाढ होऊन तो 57,037 वर पोहोचला आहे तर निफ्टीमध्ये 1.05 टक्क्यांची वाढ होऊन तो 17,136 वर पोहोचला आहे.
आज 1716 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे तर 1593 शेअर्समध्ये घसरण झाली आहे. 111कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही.
आज बाजार बंद होताना ऑटो, फार्मा, आयटी, ऑईल अॅन्ड गॅस या क्षेत्रातल्या शेअर्समध्ये एक ते दोन टक्क्यांची वाढ झाली. तर बँकिंग आणि मेटल सेक्टरच्या शेअर्समध्ये विक्री झाल्याचं दिसून आलं आहे. BSE मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्येही वाढ झाली आहे.
बुधवारी शेअर बाजारात BPCL, Tata Motors, Shree Cements, UltraTech Cement आणि Eicher Motors या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली असून Bajaj Finance, ICICI Bank, Bajaj Finserv, JSW Steel आणि ONGC या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली आहे.
या कंपन्यांचे शेअर्स वधारले
- BPCL- 3.75 टक्के
- Tata Motors- 3.67 टक्के
- Shree Cements०- 3.43 टक्के
- UltraTechCement- 3.36 टक्के
- Eicher Motors- 3.34 टक्के
या कंपन्यांचे शेअर्स घसरले
- Bajaj Finance- 3.13
- ICICI Bank- 1.40
- Bajaj Finserv- 1.34
- JSW Steel- 1.01
- ONGC- 0.93
महत्त्वाच्या बातम्या:























