एक्स्प्लोर

Stock Market Closing Bell : 'या ' स्टॉक्समधील नफावसुलीने बाजारात घसरण, गुंतवणूकदारांना एक लाख कोटींचा फटका

Stock Market Closing Bell :  शेअर बाजारात आज झालेल्या घसरणीमुळे गुंतवणूकादारांना जवळपास एक लाख कोटींचा फटका बसला.

Sensex Closing Bell :  आठवड्यातील व्यवहाराच्या शेवटच्या दिवशी आणि सलग दुसऱ्या सत्रात भारतीय शेअर बाजार घसरणीसह (Share Market Closing Bell) बंद झाला. एफएमसीजी (FMCG) आणि बँकिंग (Nifty Bank) शेअर्समध्ये झालेल्या विक्रीमुळे ही घसरण दिसून आली. आज दिवसभरातील व्यवहार थांबले तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (Sensex) 365 अंकांनी घसरून 65,322 अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी (Nifty) 115 अंकांच्या घसरणीसह 19,428 अंकांवर स्थिरावला. 

कोणत्या सेक्टरमध्ये चढ-उतार?

आजच्या व्यवहारात बँकिंग शेअर्समध्ये झालेल्या विक्रीमुळे बँक निफ्टी 303 अंकांनी घसरून बंद झाला. एफएमसीजी शेअर्समध्ये घसरण दिसून आली आहे. याशिवाय फार्मा, ऑटो, आयटी, मेटल, एनर्जी, मेटल्स, रिअल इस्टेट, हेल्थकेअर आणि ऑईल अॅण्ड गॅस सेक्टरमधील शेअर्समध्ये घसरण झाली. केवळ ग्राहकोपयोगी वस्तूंच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. 

आजच्या व्यवहारात स्मॉल कॅप आणि मिड कॅप समभागही घसरले. सेन्सेक्स निर्देशांकामधील 30 शेअर्सपैकी 7 शेअर्स तेजीसह  बंद झाले. तर,  निफ्टी निर्देशांकातील 50 कंपन्यांच्या शेअर्सपैकी 11 कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. 

इंडेक्‍स किती अंकांवर बंद झाला दिवसभरातील उच्चांक दिवसभरातील नीचांक किती टक्के बदल
BSE MidCap 30,403.85 30,588.69 30,399.54 -0.21%
BSE Sensex 65,311.29 65,727.80 65,274.61 -0.57%
BSE SmallCap 35,274.93 35,526.76 35,269.61 -0.35%
India VIX 11.52 11.87 11.36 1.07%
NIFTY Midcap 100 37,836.15 38,148.50 37,791.20 -0.45%
NIFTY Smallcap 100 11,748.35 11,836.35 11,734.55 -0.18%
NIfty smallcap 50 5,360.50 5,409.70 5,354.25 -0.15%
Nifty 100 19,359.00 19,484.40 19,343.25 -0.53%
Nifty 200 10,304.60 10,373.95 10,296.10 -0.52%
Nifty 50 19,428.30 19,557.75 19,412.75 -0.59%

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत घट

शेअर बाजारातील घसरणीमुळे आजच्या व्यवहारात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत घट झाली आहे. मुंबई शेअर बाजारावर सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे बाजार भांडवल 304.58 लाख कोटी रुपयांवर आले आहे. मागील ट्रेडिंग सत्रात 305.54 लाख कोटी रुपये होते. आजच्या सत्रात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 96,000 कोटी रुपयांची घट झाली आहे. 

2094 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण

मु्ंबई शेअर बाजारात (BSE) आज तेजीपेक्षा घसरणीसह बंद झालेल्या शेअर्सची संख्या अधिक आहे. एक्सचेंजमध्ये आज एकूण 3,724 शेअर्सचे व्यवहार झाले. यापैकी 1491 शेअर्स तेजीसह बंद झाले. त्याच वेळी, 2,047 शेअर्समध्ये घसरण दिसून आली. तर 139 कंपन्यांच्या शेअर्स दरात कोणताही बदल झाला नाही. आजच्या व्यवहारादरम्यान 204 शेअर्सने 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला. त्याच वेळी, 27 शेअर्सने 52 आठवड्यांच्या नीचांक गाठला. आज एकाही कंपनीच्या शेअर दराने अप्पर सर्किट गाठले नाही. तर, तीन कंपन्यांच्या शेअर दरांनी लोअर सर्किट गाठले. 

इतर महत्त्वाच्या बातम्या :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Andheri West constituency: अपक्ष उमेदवाराने अर्ज मागे घेतला, अंधेरी पश्चिम मतदारसंघात काँग्रेसची ताकद वाढली, 10 हजारांच्या मताधिक्याने निवडून येण्याचा दावा
अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवाराची माघार, काँग्रेसची ताकद वाढली, 10 हजार मतांनी निवडून येण्याचा दावा
Horoscope Today 05 November 2024 : आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Sada Sarvankar : भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  7 AM : 5 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा:  7 AM :  5 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM : 5 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6:30 AM : 5 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Andheri West constituency: अपक्ष उमेदवाराने अर्ज मागे घेतला, अंधेरी पश्चिम मतदारसंघात काँग्रेसची ताकद वाढली, 10 हजारांच्या मताधिक्याने निवडून येण्याचा दावा
अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवाराची माघार, काँग्रेसची ताकद वाढली, 10 हजार मतांनी निवडून येण्याचा दावा
Horoscope Today 05 November 2024 : आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Sada Sarvankar : भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
Embed widget