एक्स्प्लोर

Cidco Homes : सिडकोच्या खारघर, मानसरोवर रेल्वे स्टेशन अन् वाशीतील घरांच्या किंमती कधी जाहीर होणार? मोठी अपडेट समोर

Cidco Homes : सिडकोच्या नवी मुंबईतील 26 हजार घरांसाठी नोंदणी सुरु झाली असली तरी घरांच्या किंमती जाहीर न झाल्यानं ग्राहकांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं होतं.

नवी मुंबई :  सिडकोतर्फे 26,000 घरांची विक्री महागृहनिर्माण योजनेद्वारे करण्यात येणार आहे.  'माझे पसंतीचे सिडकोचे घर' या नावाने ही महागृहनिर्माण योजना जाहीर करण्यात आली आहे.प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य विक्री याद्वारे या घरांची विक्री केली जाईल. सिडकोकडून नवी मुंबईतील वाशी, खारघर, खांदेश्वर रेल्वे स्थानक परिसर, मानसरोवर, पनवेल, तळोजा व उलवे नोडमध्ये सदर घरे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. या घरांसाठी नोंदणी 12 ऑक्टोबरपासून सुरु झाली आहे. मात्र, सिडकोनं घरांच्या किमती जाहीर न केल्यानं नागरिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं होतं. घरांसाठी अर्ज करणाऱ्यांकडून घरांच्या किंमतींबाबत विचारणा केली जात होती. अखेर पुढील आठवड्यात या घरांच्या किमती जाहीर होणार आहेत.  

सिडकोकडून नवी मुंबईतील घरांच्या किंमती प्रकल्पनिहाय जाहीर केल्या जाणार आहेत. नवी मुंबईतील 26 हजार घरांच्या किंमती तांत्रिक कारणामुळं जाहीर करण्यात आल्या नव्हत्या. मात्र, येत्या आठवड्यात या घरांच्या किंमती जाहीर केल्या जातील, अशी माहिती देण्यात आली आहे. सिडकोची 26 हजार घरं ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) आणि अल्प उत्पन्न गट (LIG)  यांच्यासाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. 

सिडकोतर्फे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 67,000 घरे बांधण्यात येत आहेत. यापैकी पहिल्या टप्प्यात 26,000 घरे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. 

सिडकोची घरं कुठं, कोणत्या भागात?

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक
1. तळोजा, सेक्टर-28 : 2185  
2. तळोजा, सेक्टर-39 : 7509  
3. खारघर बस डेपो : 1700 
4. खारकोपर 2 ए : 288
5. खारकोपर 2बी : 288 
6. कळंबोली बस डेपो : 1360 
7. बामनडोंगरी : 1700 

अल्प उत्पन्न गटातील घरं कोणत्या भागात?

8. तळोजा, सेक्टर-37, अ्प उत्पन्न गट ए : 816 
9. तळोजा, सेक्टर-37 ,अल्प उत्पन्न गट बी :  8 
10. नवीन पनवेल (प.) बस टर्मिनस :  172 
11. खारघर बस टर्मिनस :  340  
12. मानसरोवर रेल्वे स्टेशन : 840 
13. खांदेश्वर रेल्वे स्टेशन : 1470 
14. खारकोपर-भूखंड क्र. 3, सेक्टर-16 ए : 2113  
15. वाशी ट्रक टर्मिनल अल्प उत्पन्न गट : 3131 
16. खारघर स्टेशन अल्प उत्पन्न गट बी : 1803

सिडकोच्या घरांचं चटई क्षेत्रफळ 322 स्क्वेअर फुट ते 540 स्क्वेअर फुट दरम्यान आहे. सिडकोच्या घरांचं चटई क्षेत्रफळ 322 स्क्वेअर फुट ते 540 स्क्वेअर फुट दरम्यान आहे. अर्जदारांना या सोडतीसाठी 11 नोव्हेंबर 2024 पर्यंत ऑनलाईन नोंदणी करत येईल.  आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गटांसाठी ही योजना आहे. प्रधानमंत्री आवास योजनेच्या अनुदानाचा लाभही त्यांना घेता येईल.

इतर बातम्या :

खुशखबर! सिडकोच्या घरांची लॉटरी निघाली, नवी मुंबईत होणार हक्काचं घर, जाणून घ्या नेमका कुठे अर्ज करायचा?

CIDCO House Lottery : नवी मुंबईतील सिडको घरांच्या लॉटरीसाठी दोन गट, 250000 रुपयांचे मिळणार अनुदान, वाचा नेमक्या अटी काय?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
Maharashtra CM : शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
Eknath Shinde : देवेंद्र फडणवीस यांची विनंती अन् उपमुख्यमंत्रिपदाबाबतचा प्रश्न, एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत काय म्हणाले?
देवेंद्रजींनी मुख्यमंत्री व्हावं असं पाठिंब्याचं पत्र सेनेनं दिलं, एकनाथ शिंदेंनी सांगितला अडीच वर्षांपूर्वीचा प्रसंग
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वरVarsha Bunglow Meeting : शपथविधीआधी महत्वाच्या खात्यासंदर्भात ठोस निर्णय? 'वर्षा'वर खलबतंDevendra Fadnavis Maharashtra Vidhansabha : भाजप विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी निवड, देवेंद्र फडणवीस पुन्हा आलेABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6PM 04 December 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
Maharashtra CM : शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
Eknath Shinde : देवेंद्र फडणवीस यांची विनंती अन् उपमुख्यमंत्रिपदाबाबतचा प्रश्न, एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत काय म्हणाले?
देवेंद्रजींनी मुख्यमंत्री व्हावं असं पाठिंब्याचं पत्र सेनेनं दिलं, एकनाथ शिंदेंनी सांगितला अडीच वर्षांपूर्वीचा प्रसंग
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Rahul Narwekar : राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'
देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'
Maharashtra CM : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय? गेल्या पाच महिन्यात काय काय घडलं?
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय? गेल्या पाच महिन्यात काय काय घडलं?
Embed widget