लॉकडाऊनमध्येही मध्य रेल्वे सुसाट! ऑटोमोबाईल्स, शेतीसह अनेक खासगी क्षेत्रात देशाबाहेरही सेवा
लॉकडाऊनमध्ये अनेक व्यवसायांचे कंबरडे मोडले असताना मध्य रेल्वे सुसाट धावत आहे. ऑटोमोबाईल्स, शेतीसह अनेक खासगी क्षेत्रात रेल्वे देशाबाहेरही सेवा देत आहे.
मुंबई : कोरोना महामारीमुळे देशाची आर्थिक घडी विस्कटली आहे. लॉकडाऊनमुळे अनेक क्षेत्रात मंदी आली आहे. रेल्वे क्षेत्रालाही याचा मोठा फटका बसला आहे. मध्य रेल्वे आता हळूहळू यातून सावरत ट्रकवर येत आहे. रेल्वेतर्फे ऑटोमोबाईल्स, शेतीसह अनेक खासगी ठिकाणी देशाबाहेरही सेवा दिली जात आहे. हा सर्व नवीन व्यवसाय मध्य रेल्वेच्या सर्व विभागांमधील व्यवसाय विकास युनिटच्या सखोल विपणनामुळे शक्य झाल्याची माहिती रेल्वेने दिली.
मध्य रेल्वेने अलीकडेच क्षेत्रीय आणि विभागीय स्तरावर व्यवसाय विकास युनिट स्थापित केले आहेत. हे व्यवसाय विकास विभाग विविध मालवाहतूक संस्था, नवीन ग्राहक, व्यापारी संस्था आणि लॉजिस्टिक्स कंपन्यांनी सादर केलेले नवीन प्रस्ताव, योजना आणि सूचना विचारात घेत आहेत. बीडीयूच्या या उपक्रमांमुळे नवीन व्यवसाय मिळाला आणि नव्या व्यवसायासाठी व्यापार आणि उद्योगाशी संबंध प्रस्थापित झाला. बिझिनेस डेव्हलपमेंट युनिट स्थानिक शेतकरी, लोडर्स, एपीएमसी आणि व्यक्तींसोबत नवीन प्रस्तावांची आणि लवचिक योजनांची आक्रमकपणे जाहिरात करीत त्यांच्या मागण्या एकत्रित करते.
मुंबई विभागातील बिझिनेस डेव्हलपमेंट युनिटने 23 एनएमजी द्वारा कळंबोली ते बेनापोल येथे ऑटोमोबाईलचे लोडींग नुकतेच सुरू केले आहे, स्टील पाईप्सचा एक रेक नागोठाणे ते तिनसुकीयासाठी भरला गेला. पुणे विभागातील बिझिनेस डेव्हलपमेंट युनिटने त्यांच्या अथक प्रयत्नातून ऑटोमोबाईल वाहतुकीस पुन्हा आपल्याकडे आकर्षित करीत मालवाहतुकीत प्रचंड वाढ केली आणि एकूणच कामगिरी आणि विभागाच्या उत्पन्नात भर पाडली. ऑक्टोबर 2020 पर्यंतच्या या आर्थिक वर्षातील मागील 7 महिन्यांत, 46 एनएमजी रॅक्समध्ये ऑटोमोबाईलची वाहतूक केली गेली जी 2019-2020 च्या संपूर्ण आर्थिक वर्षाच्या ऑटोमोबाईल लोडिंगच्या कामगिरीइतकी आहे.
पुणे विभागातील बीडीयू टीम सतत संपर्क साधत असल्यामुळे येत्या पाच महिन्यांत वाहन वाहतुकीस मोठा वाव आहे. भारतीय रेल्वेने सादर केलेल्या मिनी रेकच्या आकर्षक नवीन फ्रेट पॉलिसीमुळे 1500 किलोमीटरपेक्षा अधिक अंतराकरिता प्रथमच कळमेश्वर ते आझरा (एनएफआर) कडबा; बडनेरा ते तामिळनाडूच्या पोलाची येथे सोयाबीज, खंडवा ते परभणीपर्यंत गहू लोडींग करण्यात आले. भुसावळ गुडशेड वरून दर्शना (बांगलादेश) येथे प्रथमच मका निर्यातीसाठी 3 इंडेंट करण्यात आली. नागपूर विभागात 4 वर्षानंतर गव्हाची वाहतूक बेतुल गुडशेड येथून पुन्हा सुरू झाली. अजनी ते फिलौर, फिरोजपूर करीता ट्रॅक्टर लोडिंग तसेच बादली येथून गुना, जामनगरला जाण्यासाठी सिमेंट लोडिंग या नव्या ठिकाणासाठी झालेली आहे. रावेर/सावडा/निंभोरा येथून केळीची वाहतूक करण्यासह, फ्रेट/पार्सल लोडिंग इंडेंट मध्ये वाढ होत आहे, आहे. बीडीयूच्या प्रयत्नांना बळ म्हणून बडनेरा स्टेशन कायमस्वरुपी पार्सल वाहतुकीसाठी उघडण्यात आला आहे. बांगलादेश व इतर ठिकाणी कापड, कापूस, बियाणे आणि धाग्याच्या वाहतुकीसाठी हिंगणघाट हे पार्सल टर्मिनल म्हणून उघडले गेले आहे.
कोलकात्यात सर्वसामान्यांसाठी लोकलला परवानगी, मुंबईत कधी? केंद्र आणि राज्य सरकारची चालढकल?