Cashback SBI Card : ऑनलाईन किंवा ऑफलाईन खरेदी करताना ऑफरच्या शोधात आहात? 'कॅशबॅक SBI कार्ड'वर मिळतेय 5 टक्के कॅशबॅक
Online Shopping Offers : आजच्या डिजिटल युगात यूजर्स त्यांच्या आवडत्या वस्तू खरेदी करण्यासाठी ऑफर्सची प्रतीक्षा करतात. अशा लोकांसाठी SBI ने कॅशबॅक ऑफर असलेले कार्ड ग्राहकांसाठी बाजारात आणले आहे.
Cashback SBI Card : जर तुम्ही ऑनलाइन किंवा ऑफलाइन खरेदी करताना ऑफरच्या शोधात (Online Shopping Offers) असाल, क्रेडिट कार्डच्या मदतीने कॅशबॅकचा (Cashback) अधिक फायदा घेत असाल तर SBI चे हे नवीन कार्ड तुमच्यासाठी ऑफरची एक मोठी संधी घेऊन आले आहे. एसबीआयने ग्राहकांसाठी कॅशबॅक SBI कार्ड (Cashback SBI Card) बाजारात आणले असून ते SBI कार्ड लाइनअपमध्ये कनेक्ट करण्यात आलं आहे. या कार्डच्या नावावरूनच त्याची खासियत समजते.
कॅशबॅक SBI या कार्डवर सर्व ऑनलाइन आणि ऑफलाइन खरेदीवर 5 टक्क्यांपर्यंत कॅशबॅक उपलब्ध आहे. या कॅशबॅकमध्ये मिळणारी रक्कम थेट तुमच्या खात्यात जमा केली जाते. याशिवाय हे कार्ड इंधनाच्या खरेदीवरही सूट देते.
लाभ कोणाला मिळणार? (Cashback SBI Card)
कार्डधारकाचे वय 21 ते 65 वर्षांच्या दरम्यान असावे. तसेच व्यक्तीचा क्रेडिट कार्डचा इतिहास चांगला असावा. या कार्डवर आकारण्यात येणाऱ्या फीबद्दल बोलायचे तर ते वार्षिक 999 रुपये अधिक जीएसटी इतके आहे. तुम्ही 2 लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च केल्यास वार्षिक शुल्कातही सूट देण्यात येणार आहे. तुम्ही या कार्डच्या मदतीने ऑफलाइन शॉपिंग केल्यास तुम्हाला 1 टक्के सूट मिळेल. त्यासाठी किमान 500 रुपये खर्च करावे लागतील.
या ऑनलाइन साइट्सवर सवलत (Cashback Offers On Online Sites)
Flipkart, Amazon आणि इतर साईटवरून ऑनलाइन खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी हे कार्ड अधिक चांगला पर्याय ठरू शकेल. Flipkart, Myntra आणि Amazon यासह साईटवरही त्याला 5 टक्के कॅशबॅक ऑफर दिली जाते. कॅशबॅक SBI कार्डचा फायदा हा अनेक रिटेल विक्रेत्यांनाही मिळणार आहे.
ई-कॉमर्समध्ये केंद्र सरकारचं देसी ONDC प्लॅटफॉर्म
ई-कॉमर्समध्ये बदल घडवून आणण्यासाठी आणि या बड्या कंपन्यांचे वर्चस्व कमी करण्यासाठी केंद्र सरकारने ONDC प्लॅटफॉर्म सुरू केला आहे. ओएनडीसी म्हणजे ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स. म्हणजेच असे नेटवर्क जिथे भारतातील सर्वात लहान उद्योजक आपला माल डिजिटल पद्धतीने विकू शकतील. हा प्लॅटफॉर्म विक्रेते, खरेदीदार आणि डिलर्सला एकत्र आणण्याचं काम करतो.
सध्या भारतात अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टला टक्कर देणारी कोणतीही कंपनी नाही त्यामुळे भारतीय या कंपनीचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. या कंपन्यांची क्रेझ कमी करण्यासाठी आणि भारतातील लहान व्यावसायिकांना मोठं प्लॅटफार्म उपलब्ध करुन देण्यासाठी हा एक उत्तम पर्याय केंद्र सरकारने शोधून काढला आहे. या ONDC रजिस्ट्रेशन फ्रीमध्ये करता येणार आहे. ऑर्डर करण्यासाठी काही प्रमाणात पैसे आकारण्यात येणार आहे. मात्र हे पैसे बाकी कंपन्यांपेक्षा कमी असेल.
ही बातमी वाचा: