Lemon Dou : कोको कोला आता दारू व्यवसायात, महाराष्ट्र आणि गोव्यामध्ये लेमन ड्यू ब्रँडची विक्री सुरू, जाणून घ्या किंमत
What Is Lemon Dou: जगभरात शीतपेयांची बाजारपेठ काबीज केल्यानंतर कोका कोलाने आता दारूच्या बाजारातही हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या दारूच्या मिक्स ब्रँडची पायलट चाचणी सुरू आहे.
Coca Cola Liquor : कोका कोला ही जगातील सर्वात मोठी शीतपेय उत्पादक कंपनी भारतात प्रथमच मद्यविक्री क्षेत्रात उतरली आहे. कंपनीने आपल्या लिकर ब्रँड 'लेमन ड्यू'ची (Lemon Dou) देशात विक्री सुरू केली आहे. सध्या गोवा आणि महाराष्ट्राच्या काही भागात त्याची विक्री होत आहे. महाराष्ट्रात लेमन ड्यूच्या 250 मिली कॅनची किंमत 230 रुपये (Lemon Dou Price) आहे, तर गोव्यामध्ये ती 150 रुपये इतकी आहे.
कोका कोला इंडियाकडून देशात दारू विक्री करण्याच्या बातमीला दुजोरा दिला आहे. इकॉनॉमिक टाईम्सला माहिती देताना कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, लेमन ड्यूची पायलट चाचणी केली जात आहे. जगातील अनेक बाजारपेठांमध्ये ते आधीच उपलब्ध आहे. आता आम्ही ते भारतातही आणण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत सध्या लोकांची मते जाणून घेतली जात आहेत. चाचणीचे निकाल आल्यानंतर ते पूर्णपणे बाजारात उतरवण्यात येणार आहे.
काय आहे लेमन डू? (What Is Lemon Dou)
लेमन डू हे एक प्रकारचे अल्कोहोल मिक्स आहे. हे शोशूपासून बनवले जाते. यामध्ये वोडका, ब्रँडी यांसारखे डिस्टिल्ड मद्य वापरले जाते. कोका कोला इंडियाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, कोको कोलाच्या शीतपेयाची सुविधा या लेमन डू बनवण्यासाठी वापरली जात नसून त्याची निर्मिती वेगवेगळ्या ठिकाणी केली जात आहे. लेमन ड्यू (Lemon Dou) हे संपूर्ण लिंबू क्रॅश करून त्याचा रस काढला जातो, त्यानंतर तो अल्कोहोलमध्ये मिसळून तयार केला जातो असं कंपनीच्या वेवसाईटवर म्हटलं आहे.
कोक-पेप्सी मद्य बाजारात दाखल
शीतपेयांची बाजारपेठ पूर्णपणे काबीज केल्यानंतर, कोक आणि पेप्सी या जागतिक कंपन्यांनी आता मद्य क्षेत्रावर लक्ष केंद्रित केले आहे. या दोन्ही कंपन्यांनी एक एक करून दारूच्या बाजारात प्रवेश केला आहे. कोकने याआधी जपानमध्येही लेमन डू उत्पादन लाँच केले होते. Pepsico ने अमेरिकन मार्केटमध्ये माउंटन ड्यूची अल्कोहोलिक आवृत्ती देखील लॉन्च केली आहे. त्याला हार्ड माउंटन ड्यू असे नाव देण्यात आले आहे. जर कोका कोलाचे लेमन ड्यू यशस्वी झाले तर ते भारतातही आणले जाऊ शकते. अलीकडेच कोका कोलाने 3300 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या माध्यमातून गुजरातमधील साणंद येथे प्लांट उभारण्याची घोषणा केली होती.
ही बातमी वाचा: