एक्स्प्लोर
Advertisement
फुटवेअर बनवणाऱ्या 'या' कंपनीचा आयपीओ येतोय..जाणून घ्या सविस्तर
रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) नुसार, या कंपनीचा येणारा नवा आयपीओ पूर्णपणे ऑफर फॉर सेल (OFS) वर असेल.
Campus Activewear IPO : फुटवेअर निर्माता कॅम्पस ऍक्टिव्ह वेअर आयपीओ आणणार आहे. कंपनीने यासाठी सेबीकडे ड्राफ्ट पेपर दाखल केले आहते. रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) नुसार, हा आयपीओ पूर्णपणे ऑफर फॉर सेल (OFS) वर असेल. या अंतर्गत कंपनीचे प्रवर्तक म्हणजेच प्रमोटर्स आणि विद्यमान शेअर्सहोल्डरधारकांद्वारे 5.1 कोटी इक्विटी शेअर्स विकले जातील.
OFS अंतर्गत शेअर्स विकणार
प्रवर्तक हरी कृष्ण अग्रवाल आणि निखिल अग्रवाल हे OFS अंतर्गत शेअर्स ऑफर करणार्यांपैकी आहेत. याव्यतिरिक्त, त्यात TPG ग्रोथ III SF Pte Ltd आणि QRG Enterprises Ltd सारख्या गुंतवणूकदारांचा यामध्ये समावेश आहे. सध्या कंपनीमध्ये प्रवर्तकांची 78.21 टक्के हिस्सेदारी आहे. याशिवाय, TPG ग्रोथ आणि QRG एंटरप्रायझेस अनुक्रमे 17.19 टक्के आणि 3.86 टक्के आहेत.
OFS अंतर्गत शेअर्स विकणार
प्रवर्तक हरी कृष्ण अग्रवाल आणि निखिल अग्रवाल हे OFS अंतर्गत शेअर्स ऑफर करणार्यांपैकी आहेत. याव्यतिरिक्त, त्यात TPG ग्रोथ III SF Pte Ltd आणि QRG Enterprises Ltd सारख्या गुंतवणूकदारांचा यामध्ये समावेश आहे. सध्या कंपनीमध्ये प्रवर्तकांची 78.21 टक्के हिस्सेदारी आहे. याशिवाय, TPG ग्रोथ आणि QRG एंटरप्रायझेस अनुक्रमे 17.19 टक्के आणि 3.86 टक्के आहेत.
कॅम्पस ऍक्टिव्हवेअर प्रसिद्ध ब्रँड
कॅम्पस ऍक्टिव्ह वेअर 2005 मध्ये 'कॅम्पस' ब्रँड सादर केला. ही लाईफस्टाईल-ओरिएंडेट स्पोर्ट्स आणि ऍथलीझर फुटवेअर कंपनी आहे. शिवाय संपूर्ण कुटुंबासाठी विविध उत्पादनांचा पोर्टफोलिओ प्रदान करते. 2020 च्या आर्थिक वर्षात कंपनीचा भारतातील ब्रँडेड स्पोर्ट्स आणि ऍथलीझर फूटवेअर उद्योगात सुमारे 15 टक्के बाजाराचा वाटा आहे, जो आर्थिक वर्ष 2021 मध्ये सुमारे 17 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. या पब्लिक इश्यूवर कंपनीला सल्ला देण्यासाठी BofA Securities India Limited, JM Financial, CLSA India आणि Kotak Mahindra Capital Company यांची मर्चंट बँकर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Share Market : ओमायक्रॉनमुळे मंदीचे सावट? शेअर बाजारमध्ये 'ब्लॅक मंडे'; सेन्सेक्स 1000 अंकांनी कोसळला
- शेअर मार्केटमुळे घरात सुबत्ता, कृतज्ञता म्हणून बंगल्याचं नाव ठेवलं.. 'शेअर मार्केटची कृपा'
- Reddit IPO : US सोशल मीडिया प्लॅटफॉर्म IPO आणण्यासाठी तयार, कागदपत्रं SEC ला सादर
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement