एक्स्प्लोर

Investment : ज्येष्ठांसाठी चालवल्या जाणार्‍या योजनांमधील गुंतवणुकीत वाढ, किती वाढ आणि किती परतावा? 

गुंतवणुकीसाठी अल्पबचत योजना ही लोकांची पहिली पसंती ठरत आहेत. ज्येष्ठांसाठी चालवल्या जाणार्‍या योजनांमधील गुंतवणुकीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. 

Small Saving Schemes Investment : प्रत्येकाला आपल्या कमाईतील काही रक्कम वाचवायची असते. वाचलेली रक्कम अशा ठिकाणी गुंतवायची असते की जिथं त्यांचे पैसे सुरक्षित राहतील आणि त्यांना चांगला परतावाही मिळेल. या पार्श्वभूमीवर अल्पबचत योजना या लोकांची पहिली पसंती ठरत आहेत. हे या योजनांमध्ये होणाऱ्या गुंतवणुकीच्या आकड्यांमधून समोर आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारनं अल्पबचत योजनांबाबत उचललेल्या पावलांचा मोठा परिणाम दिसून येत आहे. ज्येष्ठांसाठी चालवल्या जाणार्‍या योजनांमधील गुंतवणुकीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. 

मागील वर्षीच्या तुलनेत यंदा गुंतवणुकीत मोठी वाढ 

केंद्र सरकार विशेषत: ज्येष्ठ नागरिकांसाठी चालवल्या जाणाऱ्या योजनांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहे. एप्रिल-सप्टेंबर या तिमाहीत या योजनांमधील गुंतवणुकीत मोठी झेप घेतली आहे. एप्रिलपासून आतापर्यंत ज्येष्ठांच्या गुंतवणुकीत 2.5 पटीनं वाढ झाली आहे. अहवालानुसार, एप्रिल ते सप्टेंबर सहामाहीत केवळ ज्येष्ठ नागरिकांसाठी चालवल्या जाणार्‍या योजनांमधील गुंतवणूक वाढली नाही, तर महिलांनी चालवल्या जाणाऱ्या छोट्या बचत योजनांमध्येही हा आकडा लक्षणीय वाढला आहे. ज्येष्ठ नागरिक बचत योजनांच्या ठेवी वर्षानुवर्षे जवळपास 2.5 पटीने वाढल्या आहेत आणि 74,625 कोटी रुपयांपर्यंत वाढल्या आहेत. मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत एकूण गुंतवणुकीत 28,715 कोटी रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे. म्हणजेच 160 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

ज्येष्ठ नागरिकांना इतके व्याज मिळत आहे.

सरकारने ज्येष्ठ नागरिकांशी संबंधित योजनांच्या व्याजदरात लक्षणीय वाढ केली आहे. यामध्ये समाविष्ट असलेल्या ज्येष्ठ नागरिक बचत योजनेचा व्याजदर जून तिमाहीत 8 टक्क्यांवरून 8.2 टक्क्यांवर गेला आहे. याशिवाय, आवर्ती ठेव योजनेत 20 बेसिस पॉइंट्सची वाढही दिसून आली आहे.

अल्पबचत योजनांमधील गुंतवणुकीत वाढ

एकीकडे व्याजदरात वाढ झाल्यामुळं वृद्धांसाठी चालवल्या जाणाऱ्या अल्पबचत योजनांमधील गुंतवणुकीत वाढ झाली आहे. तर दुसरीकडे महिलांसाठी सुरु असलेल्या बचत योजनांबाबत बोलायचे झाले तर महिला सन्मान बचत प्रमाणपत्र किंवा सप्टेंबरमध्ये एमएसएससीमध्येही वाढ झाली आहे. या तिमाहीत गुंतवणूक वाढून 13,512 कोटी रुपये झाली आहे. ही योजना दोन वर्षांसाठी आणली असून मार्च 2025पर्यंत खाते उघडता येईल.

एमएसएससी योजना काय आहे?

केंद्र सरकारने सुरु केलेल्या एमएसएससी योजनेअंतर्गत महिला दोन वर्षांसाठी 2 लाख रुपयांची गुंतवणूक करू शकतात. या योजनेतील गुंतवणुकीवर 7.5 टक्के व्याजदर निश्चित करण्यात आला आहे. 2 वर्षांच्या मॅच्युरिटी कालावधी असलेल्या या योजनेला महिलांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. खातेदारांच्या संख्येत जोरदार वाढ होत आहे. ही योजना सरकारने 2023-24 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात जाहीर केली होती आणि त्यात किमान 1000 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करता येते.

महत्त्वाच्या बातम्या:

Post Office Gram Suraksha Yojana : फक्त 50 रुपयांपासून गुंतवणूक अन् 35 लाखांचा परतावा; 4 वर्षांनी कर्ज, बोनसचा लाभ! पोस्टाची 'ही' योजना आपणास माहीत आहे का?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tirupati Stampede : तिरुपती बालाजी मंदिरात भीषण चेंगराचेंगरी, 6 जणांचा मृत्यू; वैकुंठ एकादशीची टोकन्स वाटताना नेमकं काय घडलं?
तिरुपती बालाजी मंदिरात भीषण चेंगराचेंगरी, 6 जणांचा मृत्यू; मंदिरात नेमकं काय घडलं?
मराठमोळ्या शर्वरी वाघचा Unseen अंदाज, मर्मेड गाऊन अन् कर्व्ही फिगर; घायाळ करणाऱ्या अदा पाहून चुकेल काळजाचा ठोका
मराठमोळ्या शर्वरी वाघचा Unseen अंदाज, मर्मेड गाऊन अन् कर्व्ही फिगर; घायाळ करणाऱ्या अदा पाहून चुकेल काळजाचा ठोका
Crime news: इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांच्या गाडीवर ड्रायव्हर, बनावट आयडी बनवून स्वत:च बनला कमिशनर; नोकरीच्या नावाने घातला 40 तरुणांना गंडा
इन्कम टॅक्स अधिकाऱ्यासारखा लवाजमा, गाडीवर लाल दिवा; नोकरीच्या नावाने घातला 40 तरुणांना गंडा
Cidco Homes : सिडकोनं  26 हजार घरांच्या किमती जाहीर करताच अर्जदार संतापले, धूळफेक  झाल्याचा आरोप, संजय शिरसाट म्हणाले...
घरांच्या किमती कमी करा, अन्यथा पैसे परत द्या, सिडकोच्या घरांच्या किमती जाहीर होताच अर्जदारांमध्ये नाराजीचा सूर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Tirupati Balaji Temple Stampede : तिरुपती मंदिरात चेंगराचेंगरी, सहा भाविकांचा मृत्यू, 40 जखमीTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 09 जानेवारी 2025 : ABP MajhaABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 6.30 AM : 09 Jan 2025 : Maharashtra PoliticsTop 100 Headlines : 6 AM : 09 Jan 2024 : टॉप शंभर बातम्या : Superfast News : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tirupati Stampede : तिरुपती बालाजी मंदिरात भीषण चेंगराचेंगरी, 6 जणांचा मृत्यू; वैकुंठ एकादशीची टोकन्स वाटताना नेमकं काय घडलं?
तिरुपती बालाजी मंदिरात भीषण चेंगराचेंगरी, 6 जणांचा मृत्यू; मंदिरात नेमकं काय घडलं?
मराठमोळ्या शर्वरी वाघचा Unseen अंदाज, मर्मेड गाऊन अन् कर्व्ही फिगर; घायाळ करणाऱ्या अदा पाहून चुकेल काळजाचा ठोका
मराठमोळ्या शर्वरी वाघचा Unseen अंदाज, मर्मेड गाऊन अन् कर्व्ही फिगर; घायाळ करणाऱ्या अदा पाहून चुकेल काळजाचा ठोका
Crime news: इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांच्या गाडीवर ड्रायव्हर, बनावट आयडी बनवून स्वत:च बनला कमिशनर; नोकरीच्या नावाने घातला 40 तरुणांना गंडा
इन्कम टॅक्स अधिकाऱ्यासारखा लवाजमा, गाडीवर लाल दिवा; नोकरीच्या नावाने घातला 40 तरुणांना गंडा
Cidco Homes : सिडकोनं  26 हजार घरांच्या किमती जाहीर करताच अर्जदार संतापले, धूळफेक  झाल्याचा आरोप, संजय शिरसाट म्हणाले...
घरांच्या किमती कमी करा, अन्यथा पैसे परत द्या, सिडकोच्या घरांच्या किमती जाहीर होताच अर्जदारांमध्ये नाराजीचा सूर
Ajit Pawar: धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढला, अजित पवारांनी घेतली अमित शाहांची भेट
धनंजय मुंडेंचं मंत्रिपद वाचवण्यासाठी अजितदादांचं अमित शाहांना साकडं? दिल्लीत गुप्तभेट, चर्चांना उधाण
प्रसुती झालेल्या महिलेचा जुळ्या बाळांसह 80 किमीचा प्रवास, 10 वर्षांनंतरही पालघरचा आरोग्य विभाग व्हेंटिलेटरवर
प्रसुती झालेल्या महिलेचा जुळ्या बाळांसह 80 किमीचा प्रवास, 10 वर्षांनंतरही पालघरचा आरोग्य विभाग व्हेंटिलेटरवर
मी धनंजय मुंडेंचा नोकर नसून परळीतील प्रतिष्ठीत व्यापारी; सारंगी महाजनांची जमीन घेणारे गोविंद मुंडे समोर
मी धनंजय मुंडेंचा नोकर नसून परळीतील प्रतिष्ठीत व्यापारी; सारंगी महाजनांची जमीन घेणारे गोविंद मुंडे समोर
पुण्यात शरद मोहोळ गँगच्या सदस्याला अटक, कमरेला होते 2 पिस्तुल; हिंजवडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पुण्यात शरद मोहोळ गँगच्या सदस्याला अटक, कमरेला होते 2 पिस्तुल; हिंजवडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Embed widget