अर्थ मंत्रालयाने 'या' बँकांना जारी केला नवा आदेश, सुरक्षेच्या संदर्भात सूचना जारी
अर्थ मंत्रालयानं बँकांबाबत एक नवीन आदेश जारी केला आहे. सायबर गुन्ह्यांपासून (सायबर सुरक्षा) संरक्षण करण्यासाठी या सूचना जारी करण्यात आल्या आहेत
Finance Ministry: अर्थ मंत्रालयानं बँकांबाबत एक नवीन आदेश जारी केला आहे. सायबर गुन्ह्यांपासून (सायबर सुरक्षा) संरक्षण करण्यासाठी या सूचना जारी करण्यात आल्या आहेत. UCO बँकेतील अलीकडील घटना लक्षात घेऊन, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना त्यांच्या डिजिटल ऑपरेशन्सशी संबंधित प्रणाली आणि प्रक्रियांचे पुनरावलोकन करण्यास सांगितले आहे.
आरबीआय आणि अर्थ मंत्रालय सतर्क
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंत्रालयाने बँकांना त्यांच्या सायबर सुरक्षेची तपासणी आणि ती मजबूत करण्यासाठी उपाययोजना करण्याचा सल्ला दिला आहे. बँकांनी बारीक लक्ष ठेवले पाहिजे. भविष्यातील सायबर धोक्यांसाठी तयार राहावे, असे सूत्रांनी सांगितले आहे. वित्तीय क्षेत्रातील वाढत्या डिजिटलायझेशनमुळं वित्त मंत्रालय आणि भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) नियमित अंतराने बँकांना याबद्दल जागरूक करत आहेत. गेल्या आठवड्यात, सार्वजनिक क्षेत्रातील UCO बँकेत तात्काळ पेमेंट सेवेद्वारे (IMPS) काही लोकांच्या खात्यात 820 कोटी रुपये चुकीच्या पद्धतीने हस्तांतरित करण्यात आले.
युको बँक वसुली करत आहे
IMPS प्लॅटफॉर्म नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) द्वारे ऑपरेट केले जाते. IMPS द्वारे दोन बँकांमध्ये पैसे त्वरित हस्तांतरित केले जाऊ शकतात. IMPS द्वारे पैसे ट्रान्सफर केल्यानंतर तुम्हाला प्रतीक्षा करण्याची गरज नाही. युको बँकेने शेअर बाजाराला सांगितले आहे की त्यांनी सक्रिय पावले उचलली आहेत. देयकांची खाती गोठवली आहेत. तसेच 820 कोटींपैकी 649 कोटी रुपये वसूल केले आहेत. चुकीच्या पद्धतीने पाठवलेल्या एकूण रकमेच्या हे प्रमाण सुमारे 79 टक्के आहे. मात्र, ही तांत्रिक चूक मानवी चुकांमुळे झाली की 'हॅकिंग'च्या प्रयत्नामुळे झाली, हे युको बँकेने अद्याप स्पष्ट केलेले नाही.
युको बँकेतील घटना
युको बँकेतील काही खातेदारांच्या बँक खात्यात अचानक कोट्यवधी रुपये जमा झाल्याची घटना घडली होती. या घटनेमुळं आश्चर्य व्यक्त केले गेले. प्रत्यक्षात बँकेच्या चुकीमुळे ही घटना घडली होती. बँकेच्या चुकीमुळं झटपट पेमेंट सेवेद्वारे काही बँक खात्यांमध्ये 820 कोटी रुपये जमा झाले. बँकेला आपली चूक लक्षात येताच त्यांनी पैसे काढण्याची प्रक्रिया सुरू केली. आतापर्यंत बँकेने 649 कोटी रुपये वसूल केले आहेत. बँकेने अद्याप स्पष्ट केलेले नाही की एवढी मोठी रक्कम अचानक खात्यात कशी हस्तांतरित झाली. बँकेचे म्हणणे आहे की हस्तांतरित केलेल्या रकमेपैकी 79 टक्के रक्कम म्हणजे 649 कोटी रुपये परत आली आहे. मात्र, अद्यापही सुमारे 200 कोटी रुपये वसूल न झाल्याने ते परत घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेचा फटका युको बँकेच्या शेअर्सवरही मोठा आहे. गुरुवारी युको बँकेचा शेअर 1.1 टक्क्यांनी घसरून 39.39 रुपयांवर आला. बँकेने या घटनेची माहिती तपास यंत्रणांना दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या: