एक्स्प्लोर

डिसेंबरमध्ये बँक कर्मचाऱ्यांचा महासंप, इतके दिवस बँका राहणार बंद; सविस्तर माहिती एका क्लिकवर

तुम्हाला जर बँकेशी संबंधित महत्त्वाचे काम डिसेंबर 2023 मध्ये पूर्ण करायचे असेल, तर तुमच्यासाठी ही मोठी बातमी आहे.

Bank Strike : तुम्हाला जर बँकेशी संबंधित महत्त्वाचे काम डिसेंबर 2023 मध्ये पूर्ण करायचे असेल, तर तुमच्यासाठी ही मोठी बातमी आहे. कारण ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन (AIBEA) ने पुढील महिन्यात अनेक दिवस बँकांमध्ये संपाची (Bank Strike) घोषणा केली आहे. त्यामुळं बँकांचे व्यवहार करणाऱ्या लोकांनी याबाबतची संपूर्ण माहिती घेणं गरजेचं आहे. विविध मागण्यांसाठी बँक कर्मचारी संप करणार आहेत. 

डिसेंबरमध्ये अनेक दिवस बँकांचे कामकाज बंद राहू शकते. कारण पुढील महिन्यात अनेक दिवस विविध बँकांमध्ये संप असणार आहे. ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन (AIBEA) ने यासंदर्भात अधिसूचना जारी करुन ही माहिती दिली आहे. AIBEA ने डिसेंबर 2023 मध्ये वेगवेगळ्या तारखांना बँकांमध्ये संप जाहीर केला आहे. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, हा संप 4 डिसेंबर ते 11 डिसेंबर 2023 या कालावधीत सुरु होईल. त्यामुळं बँक कर्मचाऱ्यांचा संप सुरु होण्यापूर्वी नागरिकांनी याची माहिती घेणं गरजेचं आहे. 

 जाणून घ्या कोणत्या दिवशी बँकांमधील कामकाज राहणार बंद

4 डिसेंबर 2023- स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक आणि पंजाब अँड सिंध बँकेत संप असेल.
5 डिसेंबर 2023- बँक ऑफ बडोदा आणि बँक ऑफ इंडियामध्ये संप असेल.
6 डिसेंबर 2023- कॅनरा बँक आणि सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये संप होणार आहे.
7 डिसेंबर 2023- इंडियन बँक आणि युको बँकेत संप असेल.
8 डिसेंबर 2023- युनियन बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये संप होणार आहे.
9 आणि 10 डिसेंबर 2023- बँकांमध्ये शनिवार आणि रविवारची साप्ताहिक सुट्टी.
11 डिसेंबर 2023- खासगी बँकांमध्ये संप होणार आहे.

बँक कर्मचाऱ्यांची नेमकी मागणी काय?

बँक कर्मचाऱ्यांच्या या संपामागील मुख्य कारण म्हणजे बँकेत पुरेशा कर्मचाऱ्यांची भरती करावी. यासोबतच बँकिंग क्षेत्रातील आऊटसोर्सिंगवर बंदी घालून कायमस्वरुपी नोकऱ्यांची संख्या वाढवणे आदी मागण्यांचाही समावेश आहे. या प्रकरणाची माहिती देताना एआयबीईएचे सरचिटणीस सीएच वेंकटचलम म्हणाले की, गेल्या काही वर्षांत बँकांमध्ये खालच्या स्तरावर आऊटसोर्सिंगचे प्रमाण वाढले आहे. अशा परिस्थितीत तात्पुरते कामगार वाढल्याने ग्राहकांची वैयक्तिक माहितीही धोक्यात आली आहे.

ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागेल

ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन (AIBEA) ने प्रस्तावित केलेल्या संपामुळं ग्राहकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागू शकते. 4 डिसेंबर ते 11 डिसेंबर दरम्यान विविध बँकांमधील कामात व्यत्यय आल्याने तुमची अनेक महत्त्वाची कामे रखडतील. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला पुढील महिन्यात कोणतेही महत्त्वाचे काम पूर्ण करायचे असेल, तर आतापासून ही यादी तपासा आणि तुमच्या बँकेशी संबंधित कामाचे नियोजन करा.

महत्त्वाच्या बातम्या:

SBI ला मोठा झटका, तीन महिन्यांत नफ्यात 2600 कोटींचा फटका

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Amravati News: अमरावतीत काही संघटनांकडून शस्त्र वाटप, काँग्रेसचा आरोप; तर यशोमती ताई गांधारी सारख्या; खासदार अनिल बोंडेंचं प्रत्युत्तर 
अमरावतीत काही संघटनांकडून शस्त्र वाटप, काँग्रेसचा आरोप; तर यशोमती ताई गांधारी सारख्या; खासदार अनिल बोंडेंचं प्रत्युत्तर 
Rahul Gandhi : राहुल गांधी यांची गुंतवणूक कोणत्या म्युच्यूअल फंडात? किती परतावा मिळाला?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची गुंतवणूक कोणत्या म्युच्यूअल फंडात? किती परतावा मिळाला?
Bharat Gogawale : चांगली सेवा सुविधा हवी असेल तर भाडेवाढ करणे गरजेचे; मंत्री भरत गोगावलेंचं मोठं वक्तव्य
चांगली सेवा सुविधा हवी असेल तर भाडेवाढ करणे गरजेचे; मंत्री भरत गोगावलेंचं मोठं वक्तव्य
Raj Thackeray : मनसेत गटबाजी उफाळली, राज ठाकरेंनी नाशिक दौरा अर्धवट सोडल्यानंतर मोठ्या घडामोडी, पक्षात भाकरी फिरणार?
मनसेत गटबाजी उफाळली, राज ठाकरेंनी नाशिक दौरा अर्धवट सोडल्यानंतर मोठ्या घडामोडी, पक्षात भाकरी फिरणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Case Update : सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्याचे बोटांचे ठसे जुळत नसल्याची माहितीABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 25 January 2025Suresh Dhas PC : संतोष देशमुखांचे आरोपी फासावर जातील तेव्हाच समाज शांत  होईल- सुरेश धसJitendra Awhad : राज ठाकरेंच्या कार्यकर्त्याची हत्या,दादांच्या नेत्यावर आरोप,आव्हाडांचा गौप्यस्फोट!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amravati News: अमरावतीत काही संघटनांकडून शस्त्र वाटप, काँग्रेसचा आरोप; तर यशोमती ताई गांधारी सारख्या; खासदार अनिल बोंडेंचं प्रत्युत्तर 
अमरावतीत काही संघटनांकडून शस्त्र वाटप, काँग्रेसचा आरोप; तर यशोमती ताई गांधारी सारख्या; खासदार अनिल बोंडेंचं प्रत्युत्तर 
Rahul Gandhi : राहुल गांधी यांची गुंतवणूक कोणत्या म्युच्यूअल फंडात? किती परतावा मिळाला?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची गुंतवणूक कोणत्या म्युच्यूअल फंडात? किती परतावा मिळाला?
Bharat Gogawale : चांगली सेवा सुविधा हवी असेल तर भाडेवाढ करणे गरजेचे; मंत्री भरत गोगावलेंचं मोठं वक्तव्य
चांगली सेवा सुविधा हवी असेल तर भाडेवाढ करणे गरजेचे; मंत्री भरत गोगावलेंचं मोठं वक्तव्य
Raj Thackeray : मनसेत गटबाजी उफाळली, राज ठाकरेंनी नाशिक दौरा अर्धवट सोडल्यानंतर मोठ्या घडामोडी, पक्षात भाकरी फिरणार?
मनसेत गटबाजी उफाळली, राज ठाकरेंनी नाशिक दौरा अर्धवट सोडल्यानंतर मोठ्या घडामोडी, पक्षात भाकरी फिरणार?
Beed News: वाल्मिक कराडचा साथीदार बालाजी तांदळेचं CCTV फुटेज व्हायरल; पोलीस कोठडीतील विष्णू चाटे, सुदर्शन घुलेसाठी ब्लँकेट खरेदीचा आरोप
वाल्मिक कराडचा साथीदार बालाजी तांदळेचं CCTV फुटेज व्हायरल; पोलीस कोठडीतील विष्णू चाटे, सुदर्शन घुलेसाठी ब्लँकेट खरेदीचा आरोप
Ambadas Danve:वाल्मिक कराडची किती मालमत्ता ट्रान्सफर झाली याचाही तपास करावा, अंबादास दानवेंचा सरकारवर निशाणा, म्हणाले..
वाल्मिक कराडची किती मालमत्ता ट्रान्सफर झाली याचाही तपास करावा, अंबादास दानवेंचा सरकारवर निशाणा, म्हणाले..
Yes Bank : येस बँकेची  दमदार कामगिरी सुरुच , तिसऱ्या तिमाहीत कमावला तिप्पट नफा, बँकेचा शेअर किती रुपयांवर?
येस बँकेची दमदार कामगिरी, तिसऱ्या तिमाहीत कमावला तिप्पट नफा, बँकेचा शेअर किती रुपयांवर?
Srinagar Katra Vande Bharat Express : जम्मू-श्रीनगर वंदे भारत जगातील सर्वात उंच चिनाब रेल्वे ब्रिज अन् देशातील सर्वात मोठ्या टनेलमधून धावली, -10 अंश सेल्सिअसचाही फरक पडणार नाही!
Video : जम्मू-श्रीनगर वंदे भारत जगातील सर्वात उंच चिनाब रेल्वे ब्रिज अन् देशातील सर्वात मोठ्या टनेलमधून धावली, -10 अंश सेल्सिअसचाही फरक पडणार नाही!
Embed widget