एक्स्प्लोर

Union Budget 2025 : किसान क्रेडिट कार्ड कोणाला मिळतं? कर्जाचे 5 लाख कुठे खर्च करता येतात?

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्पात विविध घोषणा केल्या आहेत. किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 3 लाख रुपयांवरुन 5 लाख रुपये करण्यात आली आहे.

Union Budget 2025: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत देशाचा अर्थसंकल्प सादर केला. त्यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात विकसित भारताची संकल्पना मांडली. या अर्थसंकल्पात त्यांनी शेती क्षेत्रासाठी नवीन घोषणा केल्या आहेत. यामधील महत्वाची घोषणा म्हणजे किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 3 लाख रुपयांवरुन 5 लाख रुपये करण्यात आली आहे.

केसीसीसाठी सगळेच शेतकरी अर्ज करू शकतात

आतापर्यंत शेतकऱ्यांना शेतीसाठी किसान क्रेडिट कार्डवर फक्त 3 लाख रुपयांची मर्यादा मिळत होती. याशिवाय देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीही देशाच्या सुस्त आर्थिक विकासाला गती देण्यासाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शेतकऱ्यांना मोठी भेट दिली आहे. या वाढीव मर्यादेचा लाभ लवकरच शेतकऱ्यांना मिळेल, असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले. केसीसीसाठी सगळेच शेतकरी अर्ज करू शकतात. यामध्ये स्वत:च्या मालकीची जमीन असणारे, इतरांची जमीन भाडेतत्वावर करणाऱ्या शेतकऱ्यांचा समावेश होतो.

KCC कर्जाचे पैसे कुठे खर्च करू शकता?

किसान क्रेडिट कार्डवर शेतकऱ्यांना अत्यंत स्वस्त व्याजदरात कर्ज दिले जाते. हे कर्ज शेतकऱ्यांना शेतीसाठी दिले जाते. अशा परिस्थितीत शेतकरी बियाणे, खते, कीटकनाशके आणि डीएपी शेतीसाठी खरेदी करण्यासाठी KCC मर्यादेचा वापर करू शकतात. देशात लहान शेतकरी मोठ्या संख्येने आहेत, ज्यामुळे त्यांच्याकडे शेतीसाठी पुरेसे पैसे नाहीत. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केसीसी योजना सुरू केली होती.

किसान क्रेडिट कार्ड योजना कधी सुरू झाली?

किसान क्रेडिट कार्ड योजना 26 वर्षांपूर्वी 1998 मध्ये सुरू करण्यात आली होती. या योजनेंतर्गत शेती व संबंधित कामे करणाऱ्या शेतकऱ्यांना 9 टक्के व्याजाने अल्पमुदतीचे कर्ज दिले जाते. या योजनेची विशेष बाब म्हणजे सरकार कर्जावरील व्याजावर 2 टक्के सूटही देते. त्याच वेळी, जे शेतकरी संपूर्ण कर्जाची वेळेवर परतफेड करतात, त्यांना प्रोत्साहन म्हणून आणखी 3 टक्के सवलत दिली जाते. म्हणजेच हे कर्ज शेतकऱ्यांना केवळ 4 टक्के वार्षिक व्याजावर दिले जाते. 30 जून 2023 पर्यंत असे कर्ज घेणाऱ्यांची संख्या 7.4 कोटींहून अधिक होती. ज्यावर 8.9 लाख कोटींहून अधिकची थकबाकी दिसली.

आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प लादर केला. यामध्ये त्यांनी किसान क्रेडीट कार्डची मर्यादा 3 लाख रुपयावरुन 5 लाख रुपये करण्यात आली आहे. 

महत्वाच्या बातम्या:

Union Budget 2025 : किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 3 लाखांवरून 5 लाखांवर; देशभरातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar ZP Election Result: मावळमध्ये सुनील शेळकेंचा डंका, सगळ्या जागा राष्ट्रवादीने जिंकल्या, अजितदादांची आठवण येताच डोळे पाणावले
मावळमध्ये सुनील शेळकेंचा डंका, सगळ्या जागा राष्ट्रवादीने जिंकल्या, अजितदादांची आठवण येताच डोळे पाणावले
Satara ZP Election : शिवेंद्रराजे भोसले यांना कुसुंबी गटात धक्का, जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणेंच्या पत्नी अर्चना रांजणेचा पराभव
शिवेंद्रराजे भोसले यांना कुसुंबी गटात धक्का, अर्चना रांजणेंचा पराभव, जावळीतून धक्कादायक निकाल
मोठी बातमी! शरद पवारांना खोकल्याचा त्रास, पुण्यातील रुबी रुग्णालयात दाखल; डॉक्टरांनी दिली माहिती
मोठी बातमी! शरद पवारांना खोकल्याचा त्रास, पुण्यातील रुबी रुग्णालयात दाखल; डॉक्टरांनी दिली माहिती
Jaykumar Gore : जयकुमार गोरे यांना दोन धक्के, भारती गोरेंचा औंध तर अरुण गोरे यांचा कुकुडवाड गटातून पराभव, सोनल गोरे आंधळी गटातून विजयी
जयकुमार गोरे यांना दोन धक्के, भारती गोरेंचा औंध तर अरुण गोरे यांचा कुकुडवाड गटातून पराभव, सोनल गोरे आंधळी गटातून विजयी

व्हिडीओ

Avinash Jadhav : एक दिवस असा येईल की भाजपला एक जागा आणायलाही कसर करावी लागेल
Bharat Gogawale ZP Celebration : जिल्हा परिषदेत लेकाचा विजय, भरत गोगावलेंचं विजयी सेलिब्रेशन
Bharat Gogawale On Vikas Gogawale : भरतशेठला कुणीही हरवू शकत नाही, मुलाच्या विजयावर प्रतिक्रिया
ZP BJP Result : 731 पैकी 319 कल-निकाल हाती, निकालांमध्ये भाजपची शंभरी
Uddhav Thackeray Special Report : संजय राऊतांकडून उद्धव ठाकरेंना साकडं, ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar ZP Election Result: मावळमध्ये सुनील शेळकेंचा डंका, सगळ्या जागा राष्ट्रवादीने जिंकल्या, अजितदादांची आठवण येताच डोळे पाणावले
मावळमध्ये सुनील शेळकेंचा डंका, सगळ्या जागा राष्ट्रवादीने जिंकल्या, अजितदादांची आठवण येताच डोळे पाणावले
Satara ZP Election : शिवेंद्रराजे भोसले यांना कुसुंबी गटात धक्का, जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणेंच्या पत्नी अर्चना रांजणेचा पराभव
शिवेंद्रराजे भोसले यांना कुसुंबी गटात धक्का, अर्चना रांजणेंचा पराभव, जावळीतून धक्कादायक निकाल
मोठी बातमी! शरद पवारांना खोकल्याचा त्रास, पुण्यातील रुबी रुग्णालयात दाखल; डॉक्टरांनी दिली माहिती
मोठी बातमी! शरद पवारांना खोकल्याचा त्रास, पुण्यातील रुबी रुग्णालयात दाखल; डॉक्टरांनी दिली माहिती
Jaykumar Gore : जयकुमार गोरे यांना दोन धक्के, भारती गोरेंचा औंध तर अरुण गोरे यांचा कुकुडवाड गटातून पराभव, सोनल गोरे आंधळी गटातून विजयी
जयकुमार गोरे यांना दोन धक्के, भारती गोरेंचा औंध तर अरुण गोरे यांचा कुकुडवाड गटातून पराभव, सोनल गोरे आंधळी गटातून विजयी
Kolhapur ZP Election Result: ऐनवेळच्या पक्षांतराने 'विश्वास' गमावला? गोकुळचे माजी अध्यक्ष आबाजी पाटलांच्या मुलाचा दारुण पराभव; तिकडं अरुण डोंगळेंच्या मुलीनं विजय खेचून आणला
ऐनवेळच्या पक्षांतराने 'विश्वास' गमावला? गोकुळचे माजी अध्यक्ष आबाजी पाटलांच्या मुलाचा दारुण पराभव; तिकडं अरुण डोंगळेंच्या मुलीनं विजय खेचून आणला
मोहिते पाटलांसाठी कही खुशी कही गम, माळशिरसमध्ये अर्जुनसिंहांचा जिल्हा परिषदेवर विजय, पण...
मोहिते पाटलांसाठी कही खुशी कही गम, माळशिरसमध्ये अर्जुनसिंहांचा जिल्हा परिषदेवर विजय, पण...
Chhatrapati Sambhajinagar ZP Result: अब्दुल सत्तारांचे चिरंजीव जिल्हा परिषदेच्या आखाड्यात विजयी; अंभई गटातून भाजपच्या उमेदवाराला पाडलं
अब्दुल सत्तारांचे चिरंजीव जिल्हा परिषदेच्या आखाड्यात विजयी; अंभई गटातून भाजपच्या उमेदवाराला पाडलं
ZP Election Result 2026: भाजप नंबर 1, शिंदे गटही शंभरी पार; जिल्हा परिषदेतील 500 जागांचा चक्रावणारा निकाल, कुणाला किती जागा?
भाजप नंबर 1, शिंदे गटही शंभरी पार; जिल्हा परिषदेतील 500 जागांचा चक्रावणारा निकाल, कुणाला किती जागा?
Embed widget