Union Budget 2022 : हे तर आभासी, दिशाहीन बजेट, यामध्ये गरिबांसाठी काहीच नाही - खासदार सुप्रिया सुळे
Union Budget 2022 : यंदाचा अर्थसंकल्प म्हणजे केवळ आभासी असून दिशाहीन करणारा आहे, अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.
Union Budget 2022 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेला यंदाचा अर्थसंकल्प अत्यंत निराशादायक असून संपूर्णपणे आभासी आणि दिशाहीन करणारा आहे, अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. आज सकाळच्या सुमारास अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर विविध क्षेत्रातून या अर्थसंकल्पावर सातत्याने प्रतिक्रिया येत आहेत. विविध नेतेमंडळीही आपआपली मतं देत असून खासदार सुप्रिया सुळे यांनीही आपलं मत मांडलं आहे.
सुळे म्हणाल्या, 'यंदाच्या बजेटनं खूप निराशा केली आहे, हे बजेट केवळ आभासी आहे. त्यात गरिब जनतेसाठी यामध्ये काहीच नाही. बजेट सादर केलं असून त्यातील तरतूदीच्या किती टक्के खर्च आरोग्यावर, किती टक्के शिक्षणावर याचा कोणताही उल्लेख नाही.' यामध्ये सरकारचा डाटा सांगतो की बेरोजगारी किती वाढली आहे. पण हेच सरकार दावा करत आहे की नोकऱ्या पुरवल्य़ा. तसंच क्रिप्टो करन्सी हा गंभीर विषय त्यावर स्पष्टता यावी ही मागणी सातत्यानं संसदेत आम्ही करत असल्याचंही सुळे म्हणाल्या.
'निर्गुंतवणूक करून आलेल्या पैशांचा कसला अभिमान?'
पुढे बोलताना सुळे यांनी 'निर्गुंतवणूक करून आलेल्या पैशांचा अभिमानाने उल्लेख करण्यासारखे काय असते. असे निर्णय आवश्यक असतात पण सरकारच्या शिरपेचातला तो तूरा नाही. घरातली चांदी तेव्हाच विकायची असते जेव्हा खरंच अडचण असते. गोष्टी विकायला काढल्या त्याचा अभिमान काय बाळगता.' असं म्हणत त्यांनी सरकारवर ताशेरे ओढले. तसंच काहीतरी द्यायचं म्हणून 10 पैकी 2 मार्क या बजेटला देते असं सुळे म्हणाल्या.
संबंधित बातम्या: