एक्स्प्लोर

Budget 2022 : तणाव आणि नैराश्याचा सामना करण्यासाठी ‘National Mental Health Program’, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा

Union Budget 2022 : अर्थमंत्र्यांनी आरोग्यावर लक्ष केंद्रित करून ‘नॅशनल डिजिटल हेल्थ इकोसिस्टम’साठी (Digital health ecosystem) खुले व्यासपीठ सुरू करण्याविषयी सांगितलं.

Union Budget 2022 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी मंगळवारी संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प 2022-23 (Union Budget 2022-23) सादर केला. आरोग्य क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात अनेक घोषणा करण्यात आल्या. अर्थमंत्र्यांनी आरोग्यावर लक्ष केंद्रित करून ‘नॅशनल डिजिटल हेल्थ इकोसिस्टम’साठी (Digital health ecosystem) खुले व्यासपीठ सुरू करण्याविषयी सांगितलं. सोप्या भाषेत सांगायचे तर सरकार हेल्थ इकोसिस्टम डिजिटल प्लॅटफॉर्म लाँच करणार आहे. म्हणजेच आरोग्याशी संबंधित अनेक माहिती आता ऑनलाईन उपलब्ध होणार आहे.

अर्थमंत्र्यांनी आरोग्य क्षेत्रासाठी कोणत्या घोषणा केल्या जाणून घ्या..

* नॅशनल डिजिटल हेल्थ इकोसिस्टम लाँच केले जाईल. याद्वारे तुम्हाला अनेक प्रकारची माहिती मिळेल. उदाहरणार्थ, याच्या मदतीने हेल्थ प्रोव्हायडर्सची माहिती उपलब्ध होणार आहे. सरकार सर्वसामान्यांना कोणत्या आरोग्य सुविधा देत आहे, याचा हिशेब तपशील देखील असेल.

* नॅशनल डिजिटल हेल्थ इकोसिस्टममध्ये प्रत्येक नागरिकाला एक वेगळी ‘युनिक हेल्थ आयडेंटिटी’ दिली जाईल. म्हणजेच तुमच्या आरोग्याचा तपशील घेतला जाईल.

* अर्थमंत्री म्हणाल्या, कोरोना महामारीमुळे लोकांचे मानसिक आरोग्य बिघडले आहे. यासाठी राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम सुरू करण्यात येणार आहे. राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रमात मानसिक आरोग्यासाठी काम करणाऱ्या 23 संस्थांचे विलीनीकरण करण्यात येणार आहे.

* यात लोक तणाव (Stress), नैराश्य (Depression) आणि अस्वस्थता यांसारख्या विषयांवर बोलू शकतात आणि त्यांना अशा मानसिक विकारांवर उपचार मिळावेत, यासाठी तज्ज्ञांशी फोनवर बोलता येईल.

* नॅशनल टेली मेंटल हेल्थ प्रोग्रामद्वारे (National Tele Mental Health Program), लोक थेट तज्ज्ञांशी बोलतील आणि त्यांच्या समस्यांवर उपाय शोधण्यात यशस्वी होतील.

* जागतिक आरोग्य संघटना (WHO) म्हणते की, जगभरात मानसिक आजारांशी संबंधित प्रकरणे वाढत आहेत. त्यांचा थेट परिणाम आरोग्य आणि अर्थव्यवस्थेवर होत आहे. मानसिक आजाराची बहुतेक प्रकरणे नैराश्यामुळे येतात. हा सर्वात सामान्य मानसिक विकार आहे, जो जगभरातील 260 दशलक्ष लोकांना प्रभावित करतो.

* जागतिक आरोग्य संघटनेनुसार (WHO), बहुतेक महिला नैराश्याने ग्रस्त आहेत. संशोधन अहवालात म्हटले आहे की, कोरोनाच्या काळात नैराश्य, तणाव आणि अस्वस्थतेची प्रकरणे वाढली आहेत. केंद्र सरकारच्या नॅशनल टेली-मेंटल हेल्थच्या मदतीने लोकांना मोठा दिलासा मिळू शकतो.

संबंधित बातम्या: 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्ती; दर्शनासाठी भाविकांची गर्दी
पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्ती; दर्शनासाठी भाविकांची गर्दी
दिल्लीत महाराष्ट्र संस्कृतीचा ठेवा; देवेंद्र फडणवीसांकडून 7 नेत्यांसाठी 5 मूर्ती, कुणाला-काय गिफ्ट
दिल्लीत महाराष्ट्र संस्कृतीचा ठेवा; देवेंद्र फडणवीसांकडून 7 नेत्यांसाठी 5 मूर्ती, कुणाला-काय गिफ्ट
KDMC : कल्याण-डोंबिवलीमध्ये आणखी एक बेकायदेशीर इमारत, मनपा अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात 
कल्याण-डोंबिवलीमध्ये आणखी एक बेकायदेशीर इमारत, मनपा अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात 
इराणकडून इस्त्रायलमध्ये स्लीपर सेल करून हेरगिरी! जगाला धडकी भरवणाऱ्या 'मोसाद'ला तगडा झटका; 30 ज्यू नागरिकांना अटक
इराणकडून इस्त्रायलमध्ये स्लीपर सेल करून हेरगिरी! जगाला धडकी भरवणाऱ्या 'मोसाद'ला तगडा झटका; 30 ज्यू नागरिकांना अटक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा 12 डिसेंबर 2024 : 07 PM ABP MajhaParbhani Violence : परभणीमधील जाळपोळ - तोडफोडीत छोट्या व्यापाऱ्यांना फटकाPune Gold Datta Idol : पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्तीABP Majha Headlines : 07 PM : 12 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्ती; दर्शनासाठी भाविकांची गर्दी
पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्ती; दर्शनासाठी भाविकांची गर्दी
दिल्लीत महाराष्ट्र संस्कृतीचा ठेवा; देवेंद्र फडणवीसांकडून 7 नेत्यांसाठी 5 मूर्ती, कुणाला-काय गिफ्ट
दिल्लीत महाराष्ट्र संस्कृतीचा ठेवा; देवेंद्र फडणवीसांकडून 7 नेत्यांसाठी 5 मूर्ती, कुणाला-काय गिफ्ट
KDMC : कल्याण-डोंबिवलीमध्ये आणखी एक बेकायदेशीर इमारत, मनपा अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात 
कल्याण-डोंबिवलीमध्ये आणखी एक बेकायदेशीर इमारत, मनपा अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात 
इराणकडून इस्त्रायलमध्ये स्लीपर सेल करून हेरगिरी! जगाला धडकी भरवणाऱ्या 'मोसाद'ला तगडा झटका; 30 ज्यू नागरिकांना अटक
इराणकडून इस्त्रायलमध्ये स्लीपर सेल करून हेरगिरी! जगाला धडकी भरवणाऱ्या 'मोसाद'ला तगडा झटका; 30 ज्यू नागरिकांना अटक
मंत्रिमंडळ विस्तार, भाजप ॲक्शन मोडवर; दिल्लीत खलबतं, मुंबईत चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट
मंत्रिमंडळ विस्तार, भाजप ॲक्शन मोडवर; दिल्लीत खलबतं, मुंबईत चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट
Nagpur : नागपुरातील श्रीमंतांच्या घरी दरोडा आणि अपहरणाचा कट, आंतरराज्य टोळीला केली पोलिसांनी अटक
नागपुरातील श्रीमंतांच्या घरी दरोडा आणि अपहरणाचा कट, आंतरराज्य टोळीला केली पोलिसांनी अटक
बीड बंदची हाक, संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर वातावरण तापलं; 27 डिसेंबरपर्यंत मनाई आदेश
बीड बंदची हाक, संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर वातावरण तापलं; 27 डिसेंबरपर्यंत मनाई आदेश
Parbhani : त्या जखमांचे मर्म भरणार कसे? हिंसेनंतर परभणी अखेर शांत, जनजीवन पूर्ववत 
त्या जखमांचे मर्म भरणार कसे? हिंसेनंतर परभणी अखेर शांत, जनजीवन पूर्ववत 
Embed widget