वाईट काळात देशाला प्रगतीपथावर नेणारा अर्थसंकल्प : अमोल मिटकरी
अर्थसंकल्पात केंद्र सरकारने सर्वसामान्य महिला, अंगणवाडी सेविका यांच्या हिताचा विचार करून योजना जाहीर केल्या आहेत. विरोधकांनी अर्थसंकल्पाचा अभ्यास करून त्यावर टीका करावी, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरांनी दिली आहे.
मुंबई : केंद्र सरकारने आज सादर केलेला अंतरिम अर्थसंकल्प हा सर्वसामान्यांना न्याय देणारा असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी दिलीये. ते अकोला ते 'एबीपी माझा'शी बोलत होतेय. अत्यंत वाईट काळात देशाला प्रगतीपथावर नेणारा हा अर्थसंकल्प असल्याचं आमदार मिटकरी म्हणालेय. तर अर्थसंकल्पावर टीका करणाऱ्या विरोधकांवरही त्यांनी शरसंधान साधलंय. दरम्यान ईडी चौकशीवरून आमदार रोहित पवार हे सहानुभूतीसाठी नाटक करत असल्याचा टोलाही त्यांनी आमदार रोहित पवारांना लगावलाय. या वयात प्रतिभा पवारांना ईडी (ED) कार्यालयापर्यंत सोबत नेण्याच्या कृतीवरही त्यांनी टीका केलीये.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकर म्हणाले, आजचा बजेट सर्वसामान्यांना न्याय देणारा आहे. आजच्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने सर्वसामान्य महिला, अंगणवाडी सेविका यांच्या हिताचा विचार करून योजना जाहीर केल्या आहेत. विरोधकांनी अर्थसंकल्पाचा अभ्यास करून त्यावर टीका करावी. विरोधकांना बजेटमधलं काही समजत नाहीय.
रोहित पवार चौकशीला का घाबरतात? अमोल मिटकरींचा सवाल
अमोल मिटकरी म्हणाले, जर काही चुकी काहीचं केलं नसेल तर रोहित पवार चौकशीला का घाबरतात? स्वतःला 'संघर्षयोद्धा' म्हणवणाऱ्या रोहित पवारांची चौकशीवरून सहानुभूती घेण्यासाठी स्टंटबाजी केली जात आहे. अजित पवारांना चौकशीसाठी बोलावलं तेव्हा शरद पवार प्रतिभाकाकी किंवा सुप्रिया सुळे सोबत का गेल्या नव्हत्या. यासोबतच जयंत पाटील आणि प्राजक्त तनपुरे यांची चौकशी होतांना यातलं कुणीच का सोबत गेलं नाही. वयात प्रतिभाकाकींना चौकशी कार्यालयापर्यंत सोबत येऊन जाणं हेच चीड आणणारं आहे.
अर्थसंकल्पावर फडणवीसांची प्रतिक्रिया
केंद्रीय अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, या अंतरिम अर्थसंकल्पात विशेषत: महिला, शेतकरी, गरिब, युवा आणि मध्यमवर्गीय अशा सर्वच घटकांकडे विशेष लक्ष देण्याचा प्रयत्न झाला आहे. 1 कोटी कुटुंबांना सोलर यंत्रणा देऊन 300 युनिटपर्यंत वीज मोफत देण्याचा संकल्प यात आहे. गरिब, चाळीत, झोपडपट्टीत राहणारे, मध्यमवर्गीय यांना स्वत:चे घर घेण्यासाठी योजना तयार करण्यात येणार आहे. 1 लाख कोटींचा व्याजमुक्त निधी तयार करुन युवांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय तर अतिशय क्रांतीकारी आहे. यातून आमचे युवा हे मोठ्या प्रमाणात उद्यमी होतील. यातून संशोधनाला आणि स्टार्टअप इकोसिस्टीमला मोठी चालना मिळेल.
हे ही वाचा :