जगभरातील अब्जाधीशांना दणका, 16 लाख कोटी रुपयांचं नुकसान, 400 अब्जाधीशांच्या संपत्तीत मोठी घट
Billionaires wealth declines : जगभरातील अब्जाधिशांना मोठा फटका बसला आहे. त्यांच्या संपत्तीत मोठी घट झाल्याचे दिसून आले आहे.
Billionaires wealth declines : जगभरातील अब्जाधिशांना मोठा फटका बसला आहे. त्यांच्या संपत्तीत मोठी घट झाल्याचे दिसून आले आहे. अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेने, फेडरल रिझर्व्हने वर्षातील शेवटच्या धोरण बैठकीत सलग तिसऱ्यांदा व्याजदरात कपात केली. याशिवाय पुढील दोन वर्षांचे नियोजनही जगासमोर ठेवण्यात आले. पण यामुळं शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. या घसरणीमुळे जगातील 500 अब्जाधीशांपैकी सुमारे 400 अब्जाधीशांच्या संपत्तीत घट झाली आहे. ज्यांचे 193 अब्ज डॉलर्स म्हणजेच 16 लाख कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले.
ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या निर्देशांकानुसार जगातील टॉप 25 अब्जाधीशांपैकी 23 अब्जाधीशांच्या संपत्तीत घट झाली आहे. या 23 अब्जाधीशांचे गणना केलेले नुकसान 104.56 अब्ज डॉलर्सवर पोहोचले आहे. याचा अर्थ एकूण नुकसानापैकी निम्म्याहून अधिक नुकसान या 23 अब्जाधीशांचे झाले आहे. विशेष बाब म्हणजे यावेळेस पॉलिसी मिटिंगमध्ये सर्व गोष्टी ठरवणाऱ्या किंवा पुढील दोन वर्षांच्या नियोजनाची रूपरेषा मांडणाऱ्या व्यक्तीचा पगार दरमहा केवळ 13 लाख रुपये आहे. फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल असं त्यांचं नाव आहे. ज्यांच्या निर्णयामुळे शेअर बाजारात तर कहरच झाला नाही तर जगातील अब्जाधीशांच्या मनात दहशत निर्माण झाली.
जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती एलन मस्कच्या संपत्तीत मोठी घट
जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती एलन मस्क, जे 500 बिलियन डॉलरच्या अगदी जवळ होते, त्यांच्या संपत्तीत सर्वात मोठी घट झाली. जगातील टॉप 25 पैकी 23 जणांची संपत्ती 100 अब्ज डॉलर्सनी कमी झाली आहे. याचा अर्थ असा की निम्म्याहून अधिक नुकसान जगातील अव्वल 25 अब्जाधीशांपैकी केवळ 23 जणांनाच झाले आहे.
395 अब्जाधीशांचे 16 लाख कोटींचे नुकसान
अमेरिकेसह जगभरातील शेअर बाजारातील घसरणीमुळे 500 पैकी 395 अब्जाधीशांच्या संपत्तीत घट झाली आहे. या अब्जाधीशांना 193 अब्ज डॉलर्स म्हणजेच 16.41 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. तर 65 अब्जाधीश दिसले ज्यांची संपत्ती वाढली. विशेष बाब म्हणजे 65 अब्जाधीशांपैकी एकाही अब्जाधीशाची संपत्ती एक अब्ज किंवा त्याहून अधिक वाढलेली नाही. प्रत्येकाच्या संपत्तीत एक अब्ज डॉलर्सपेक्षा कमी वाढ झाली आहे. जगातील टॉप 25 अब्जाधीशांपैकी 23 अब्जाधीशांच्या संपत्तीत घट झाली आहे. या 23 अब्जाधीशांचे गणना केलेले नुकसान 104.56 अब्ज डॉलर्सवर पोहोचले आहे. याचा अर्थ एकूण नुकसानापैकी निम्म्याहून अधिक नुकसान या 23 अब्जाधीशांचे झाले आहे. फक्त दोन अब्जाधीश होते ज्यांच्या संपत्तीत वाढ झाली. जगातील 17 वे आणि आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत 72.5 दशलक्ष डॉलरची वाढ झाली आहे. तर चीनचे सर्वात श्रीमंत अब्जाधीश जोंग शानशान यांना 166 दशलक्ष डॉलर्सची कमाई झाली.
कोणत्या अब्जाधीशांचे सर्वाधिक नुकसान ?
ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सच्या आकडेवारीवर नजर टाकली तर जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती एलन मस्क यांना सर्वाधिक नुकसान सहन करावे लागले. त्यांची संपत्ती 28.4 अब्ज डॉलरने कमी झाली. जेफ बेझोस यांना 9.72 अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे. मार्क झुकरबर्गच्या संपत्तीत 7.6 अब्ज डॉलरची घट झाली आहे. कॅनेडियन अब्जाधीश चँगपेंग झोऊ यांना 6.42 अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे. मायकेल डेल, लॉरेन्स ग्राफ, लॅरी एलिसन, लॅरी पेज, स्टीव्ह बाल्मर, सर्जी ब्रिन यांनी 6 अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे.
नेमकं का झालं नुकसान?
फेडरल रिझर्व्हने सलग तिसऱ्यांदा व्याजदरात कपात केली आहे. फेडने सूचित केले आहे की 2025 साठी अपेक्षित व्याजदरातील प्रगतीशील कपात थांबवली जाईल. 2025 मध्ये केवळ 0.50 टक्के कपात दिसून येईल. 2026 मध्ये 0.50 टक्के कपातही जाहीर करण्यात आली आहे. डोनाल्ड ट्रम्प शपथ घेतल्यानंतर एक आठवडा किंवा 10 दिवसांनी सुरू होणाऱ्या फेडच्या बैठकीत व्याजदर रोखले जातील, असे संकेतही आहेत. त्यामुळे शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली.