अब्जाधीशांच्या संख्येत भारताला जगात मानाचं पान, वर्षभरात संपत्तीत 42 टक्क्यांची वाढ, कोणत्या देशाला कितवं स्थान?
भारतातील अब्जाधीशांच्या (Indian Billionaire) संपत्तीत (Wealth) मोठी वाढ झाली आहे. एका वर्षात तब्बल 42 टक्क्यांची वाढ झाली आहे.
Billionaire Ambitions Report : भारतातील अब्जाधीशांच्या (Indian Billionaire) संपत्तीत (Wealth) मोठी वाढ झाली आहे. एका वर्षात तब्बल 42 टक्क्यांची वाढ झाली आहे. त्याचबरोबर अमेरिका आणि चीननंतर भारतात 185 अब्जाधीशांची संख्या झाली आहे. अब्जाधीशांच्या संख्येत भारताचा जगात तिसरा क्रमांक लागत असल्याची माहिती एका अहवालातून समोर आली आहे. पुढच्या काळात भारतातील अब्जाधीशांची संख्येत आणखी मोठी वाढ होणार असल्याची माहिती देखील अहवालात देण्यात आली आहे.
एकीकडे भारतात रोजगाराचे संकट आहे आणि डॉलरच्या तुलनेत रुपया सातत्याने कमकुवत होत आहे. महागाईमुळे लोकांच्या खिशाला झळ बसत आहे. मात्र, दुसऱ्या बादुलाअब्जाधीशांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसत आहे.
UBS च्या अब्जाधीश महत्वाकांक्षा अहवालात नेमकं काय?
रेटिंग एजन्सी UBS च्या नवीनतम अब्जाधीश महत्वाकांक्षा अहवालात असे दिसून आले आहे की एका वर्षात भारतातील अब्जाधीशांच्या संपत्तीत 42.1 टक्क्यांनी वाढ झाली आहे. अमेरिका आणि चीननंतर भारतात 185 अब्जाधीशांची संख्या आहे. अब्जाधीशांच्या संख्येत भारताचा जगात तिसरा क्रमांक लागत आहे. अमेरिकेत अब्जाधीशांची संख्या 835 तर चीनमध्ये 427 आहे. एवढेच नाही तर भारतात दर तीन महिन्यांनी एक नवा अब्जाधीश होत आहे. भारतात एका वर्षात 32 नवीन अब्जाधीशांची भर पडली आहे.
पुढच्या काळात भारतात अब्जाधिशांच्या संख्येत मोठी वाढ होणार
UBS अहवालात दिलेल्या माहितीनुसार, भारताचे पुढील दशक अब्जाधीशांचे असणार आहे. या काळात अब्जाधीशांच्या संख्येत लक्षणीय वाढ होईल. भारतात 108 सार्वजनिकरित्या सूचीबद्ध कौटुंबिक व्यवसाय आहेत, ज्यांनी अब्जाधीशांच्या संख्येत भारताला तिसऱ्या स्थानावर नेले आहे. जलद शहरीकरण, डिजिटलायझेशन, उत्पादन क्षेत्राचा विस्तार आणि ऊर्जा क्षेत्र यामुळे हा वेग वाढत आहे. पुढील दशकात भारतातील अब्जाधीशांची संख्या चीनच्या बरोबरीने असेल असा अंदाज आहे.
जगातील अब्जाधिशांची संख्येत झपाट्यानं वाढ
दिवसेंदिवस जगात अनेकांच्या संपत्तीत मोठी वाढ होताना दिसत आहे. यामुळं जगातील अब्जाधिशांची संख्या देखील झपाट्यानं वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. जगाता अमेरिकेत सर्वात जास्त अब्जाधिश आहेत. त्यानंतर चीनचा क्रमांक लागतो. त्यानंतर भारताचा तिसरा क्रमांक लागत आहे. म्हणजे भारतात देखील अब्जाधिश लोकांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. दरम्यान, अहवालात दिलेल्या माहितीनुसार येणाऱ्या काळात अब्जाधिशांच्या संख्येत आणथी मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या: