Bank Holidays : सणासुदीचा हंगाम! नोव्हेंबरमध्ये 'या' दिवशी बँका राहणार बंद, लिस्ट वाचा मगच व्यवहार करा
नोव्हेंबरमध्ये अनेक मोठे सण येत आहेत. अशा स्थितीत बँकांनाही सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामुळं ज्यांना बँकांचे व्यवहार करायचेत त्यांनी ही लिस्ट पाहावी आणि मगच व्यवहार करावेत.
Bank Holidays in Nov 2023 : ऑक्टोबर महिन्याचे शेवटचे पाच सहा दिवस राहिले आहेत. लवकरच नोव्हेंबर महिना सुरू होणार आहे. सध्या भारतात सणांचा हंगाम सुरु आहे. नोव्हेंबरमध्ये अनेक मोठे सण येत आहेत. अशा स्थितीत बँकांनाही सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ग्राहकांच्या सोयीसाठी बँक सुट्ट्यांची यादी अगोदर प्रसिद्ध करते. यामुळं तुम्हाला जर बँकांचे काही व्यवहार करायचे असतील तर त्यापूर्वी तुम्ही ही यादी वाचणं गरजेचं आहे.
नोव्हेंबरमध्ये बरेच दिवस बँका राहणार बंद
नोव्हेंबर महिन्यात बँका तब्बल 15 दिवस बंद राहतील. यामध्ये दिवाळी (दिवाळी 2023), गोवर्धन पूजा, छठ पूजा इत्यादी सणांच्या सुट्ट्यांचा समावेश आहे. याशिवाय शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांचाही त्यात समावेश करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत जर तुम्हाला बँकेशी संबंधित महत्त्वाचे काम पुढील महिन्यात पूर्ण करायचे असेल तर सुट्ट्यांची ही यादी पहा.
नोव्हेंबरमध्ये 'या' दिवशी बँका राहणार बंद
1 नोव्हेंबर 2023- कन्नड राज्योत्सव/कुट/करवा चौथमुळे बंगळुरु, इंफाळ आणि शिमला येथे बँका बंद राहतील.
5 नोव्हेंबर 2023- रविवारची सुट्टी
10 नोव्हेंबर 2023- गोवर्धन पूजा/लक्ष्मी पूजा/दीपावली/दिवाळीनिमित्त शिलाँगमध्ये बँका बंद राहतील.
11 नोव्हेंबर 2023- दुसरा शनिवार
12 नोव्हेंबर 2023- रविवार
13 नोव्हेंबर 2023- गोवर्धन पूजा/लक्ष्मी पूजा/दीपावली/दिवाळी मुळे आगरतळा, डेहराडून, गंगटोक, इम्फाळ, जयपूर, कानपूर, लखनौ येथील बँकांना सुट्टी असेल.
14 नोव्हेंबर 2023- अहमदाबाद, बेलापूर, बंगळुरू, गंगटोक, मुंबई, नागपूर येथील बँकांना दिवाळी (बळी प्रतिपदा) / विक्रम संवत नवीन वर्ष / लक्ष्मीपूजनामुळे सुट्टी असेल.
15 नोव्हेंबर 2023- गंगटोक, इंफाळ, कानपूर, कोलकाता, लखनौ आणि शिमला येथे भाई दूज/चित्रगुप्त जयंती/लक्ष्मी पूजा/निंगल चक्कूबा/भ्रात्री द्वितीया मुळे बँका बंद राहतील.
19 नोव्हेंबर 2023- रविवारची सुट्टी
20 नोव्हेंबर 2023- पाटणा आणि रांचीमध्ये छठनिमित्त बँका बंद राहतील.
23 नोव्हेंबर 2023- सेंग कुट स्नेम/इगास बागवालमुळे डेहराडून आणि शिलाँगमध्ये बँका बंद राहतील.
25 नोव्हेंबर 2023- चौथा शनिवार
26 नोव्हेंबर 2023- रविवार
27 नोव्हेंबर 2023- गुरुनानक जयंती / कार्तिक पौर्णिमेमुळे, अहमदाबाद, बंगळुरू, चेन्नई, गंगटोक, गुवाहाटी, हैदराबाद, इंफाळ, कोची, पणजी, पाटणा, त्रिवेंद्रम आणि शिलाँग वगळता संपूर्ण देशात बँका बंद राहतील.
30 नोव्हेंबर 2023- कनकदास जयंतीनिमित्त बंगळुरूमध्ये बँका बंद राहतील.
बँकेची कामे कशी करावी
बँक हा सर्वसामान्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. अशा स्थितीत बँकांना सततच्या दीर्घ सुट्ट्यांमुळं काही वेळा महत्त्वाची आर्थिक कामे ठप्प होतात. अशा परिस्थितीत तुम्ही नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग किंवा UPI च्या माध्यमातून एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे ट्रान्सफर करू शकता. पैसे काढण्यासाठी तुम्ही एटीएम वापरू शकता.
महत्त्वाच्या बातम्या: