'या' बँकेची नवीन FD योजना, गुंतवणुकीवर मिळतोय भरघोस परतावा
तुम्ही जर पैशांची गुंतवणूक (Investment) करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. तुम्ही एफडी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे.
Banks Interest On FD: तुम्ही जर पैशांची गुंतवणूक (Investment) करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. तुम्ही एफडी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. तुम्हाला आता FD वर चांगला परतावा मिळणार आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ इंडिया (BOI) ने एक नवीन बल्क डिपॉझिट योजना सादर केली आहे. यामध्ये 175 दिवसांसाठी 2 कोटी रुपये आणि त्याहून अधिक ठेवींवर 7.50 टक्के व्याज दिले जाईल. आतापर्यंत BOI हीच रक्कम 174 दिवसांसाठी जमा केल्यावर सहा टक्के व्याज देत होती. नवे दर 1 जानेवारीपासून लागू झाले आहेत. नवीन व्याजदर 2 कोटी रुपयांपासून ते 50 कोटी रुपयांपेक्षा कमी ठेवींपर्यंत असतील अशी माहिती, बँकेने निवेदनात दिली आहे.
हॅपी सेव्हिंग खाते
खासगी क्षेत्रातील डीसीबी बँकेने 'हॅपी सेव्हिंग अकाउंट'ची घोषणा केली आहे. DCB बँकेने एका निवेदनात म्हटले आहे की, या अंतर्गत खातेधारकांना UPI द्वारे देशात व्यवहार केल्यावर 'कॅशबॅक' मिळेल.
या बँकांनीही व्याजदरही वाढवले
DCB बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे. नवीन दर 13 डिसेंबरपासून लागू झाले असून त्यानुसार सर्वसामान्य ग्राहकांसाठी 8 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 8.60 टक्के व्याजदर निश्चित करण्यात आला आहे. कोटक महिंद्रा बँकेनेही व्याजदर वाढवले आहेत. आता बँक एफडीवर गुंतवणूकदारांना 2.75 टक्के ते 7.25 टक्के व्याज देत आहे. हे व्याजदर 11 डिसेंबर 2023 पासून लागू झाले. फेडरल बँकेने 5 डिसेंबर 2023 पासून एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. यामध्ये 500 दिवसांच्या एफडीवर 7.50 टक्के व्याज दिले जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या: