Bank Job : परीक्षा न देता बँकेत नोकरीची सुवर्णसंधी, अर्ज करण्याची अंतिम तारीख किती?
बँक ऑफ बडोदा (BOB) ने 2024 मध्ये BC पर्यवेक्षक पदांच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 11ऑक्टोबर निश्चित करण्यात आली आहे.
Bank of Baroda Jobs : तुम्ही नोकरीच्या (Job) शोधात असाल आणि बँकेत करिअर करण्याचे स्वप्न पाहत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. बँक ऑफ बडोदा (BOB) ने 2024 मध्ये BC पर्यवेक्षक पदांच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 11ऑक्टोबर निश्चित करण्यात आली आहे.
मुलाखतीच्या आधारे भरती केली जाणार
अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 21 ते 45 वर्षे दरम्यान असावे. तुम्ही सेवानिवृत्त बँक कर्मचारी किंवा तरुण उमेदवार असल्यास, तुमचे कमाल वय 65 वर्षे असावे. या भरती अंतर्गत निवड मुलाखतीच्या आधारे केली जाईल. शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल आणि त्यांची कामगिरी अंतिम निवडीमध्ये भूमिका बजावेल.
11 ऑक्टोबर 2024 पर्यंत अर्ज करता येणार
पात्र आणि इच्छुक उमेदवार 11 ऑक्टोबर 2024 पर्यंत अर्ज करू शकतात. या भरती मोहिमेसाठी अर्ज करण्यास इच्छुक आणि पात्र असलेले उमेदवार bankofbaroda.in या अधिकृत साइटला भेट देऊन अर्ज करू शकतात.
उमेदवारांनी अर्ज भरून सर्व आवश्यक कागदपत्रांसह प्रादेशिक व्यवस्थापक - बँक ऑफ बडोदा, साबरकांठा क्षेत्रीय कार्यालय, दुसरा मजला परफेक्ट अव्हेन्यू, शामलाजी हायवे रोड, सहकारी जिन, हिम्मतनगर- 383001 येथे पाठवावा.
कशी होणार निवड प्रक्रिया?
बँक ऑफ बडोदाच्या या भरतीद्वारे, उमेदवारांची निवड मुलाखत प्रक्रियेतील त्यांच्या कामगिरीच्या आधारे केली जाईल. निवडलेल्या व्यक्तींना योग्य वेळेत मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
इतरही बँका पदवीधरांना देणार नोकऱ्या (Bank Job)
बँक (Bank) एका महिन्यात 25 वर्षांखालील पदवीधरांना नोकरी देणार आहे. यामुळं देशातील कोट्यवधी पदवीधरांच्या नोकरीचा प्रश्न सुटणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही नोकरी अप्रेंटिसच्या स्वरुपात असणार आहे. विशिष्ट कौशल्यांचे प्रशिक्षण घेतलेल्या अशा इंटर्न्सना बँका दरमहा 5000 रुपये मानधन मिळण्याची शक्यता आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अर्थसंकल्पीय घोषणेनंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. ज्या अंतर्गत पुढील पाच वर्षांत एक कोटी तरुणांना शीर्ष 500 कंपन्यांमध्ये प्रशिक्षण (इंटर्नशिप) देण्याचे सरकारचे लक्ष्य आहे. येत्या महिनाभरात याची प्रक्रिया सुरु होणार आहे. दरम्यान, पदवीधरांना किती दिवस नोकऱ्या मिळणार हे अद्याप समोर आलं नाही. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, देशातील अनेक बँका एका महिन्यात 25 वर्षांखालील पदवीधरांना नोकऱ्या देणार आहे.
महत्वाच्या बातम्या: