Bank of Baroda : बँक ऑफ बडोदाचा दिवाळीनिमित्त धमाका, विशेष ठेव योजना जाहीर, आकर्षक व्याज दराची घोषणा
Bank of Baroda : सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची बँक असलेल्या बँक ऑफ बडोदानं विशेष ठेव योजना जाहीर केली आहे आणि आकर्षक व्याजदराची घोषणा देखील करण्यात आली आहे.
मुंबई : बँक ऑफ बडोदा (बीओबी) या भारतातील आघाडीच्या सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकेने बीओबी उत्सव डिपॉझिट योजना सुरु केली आहे. ही योजना 400 दिवस कालावधीची असून सणासुदीच्या निमित्ताने खास लाँच केली आहे. या अंतर्गत सर्वसामान्य नागरिकांसाठी 7.30 टक्के व्याजदर, ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.90 टक्के प्रती वर्ष दर आणि सुपर सीनियर सीटिझन्ससाठी (80 वर्ष आणि त्यापुढे) 7.95 टक्क्यांपर्यंत प्रती वर्ष नॉन-कॉलेबल ठेवींवर यांचा समावेश असेल. ही योजना 14 ऑक्टोबर 2024 रोजी सुरू झाली असून, तीन कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेवर ठेवींवर लागू असेल. बीओबी उत्सव ही मर्यादित काळासाठीची योजना आहे.
सणासुदीच्या या कॅम्पेनचा भाग म्हणून बँकेने 3 ते 5 वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठीच्या ठेवींचा व्याजदर वाढवला आहे. 6.50 टक्क्यांवरून 6.80 टक्क्यांवर नेला आहे. दरात झालेली ही वाढ बीओबी एसडीपी (सीस्टिमॅटिक डिपॉझिट प्लॅन) ग्राहकांनाही लागू होणार असून, त्यांना 3 ते 5 वर्ष प्रत्येक महिन्याचे योगदान देताना उच्च व्याजदर लॉक इन करता येईल. बीओबी एसडीपी ही बँक ऑफ बडोदाची रिकरिंग डिपॉझिट योजना आहे, जी दर महिन्याला नियमित बचतीद्वारे खात्रीशीर परतावा देते.
निवडक कालावधींच्या बीओबी अर्थ ग्रीन टर्म डिपॉझिट्सवरचा व्याजदरही 30 बीपीएसपर्यंत वाढविण्यात आला आहे.
पहिल्यांदाच बँकेने मुदत ठेवी विभागात सुपर सीनियर सीटिझन श्रेणी लाँच केली आहे. यात 80 वर्षापुढील ग्राहकांना ज्येष्ठ नागरिकांसाठी 1 ते 5 वर्षापर्यंतच्या कालावधीसाठी 10 बीपीएस अतिरिक्त व्याजाचा लाभ होणार आहे.
बँक ऑफ बडोदाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी देबदत्ता चंद म्हणाले, ‘ठेवींवर विविध प्रकारच्या ऑफर्स उपलब्ध करून देत सणासुदीच्या या काळात ग्राहकांना अधिकाधिक आनंद मिळवून देताना आम्हाला आनंद होत आहे. यामुळे ग्राहकांच्या पैशांची मोठ्या प्रमाणावर बचत होत आहे. बीओबी उत्सव डिपॉझिट योजना ठेवीदारांना या व्याजदराच्या चक्रामध्ये उच्च दर मिळविण्यासाठी चांगली संधी आहे. त्याशिवाय 3 ते 5 वर्ष विभागात लक्षणीय दरवाढ करण्यात आली असून, आम्ही दोन भिन्न प्रकारच्या ग्राहकांना सेवा देत आहोत – त्यातील एक म्हणजे, मध्यम कालावधीसाठी स्पर्धात्मक आणि खात्रीशीर परताव्यांच्या शोधात असलेले ग्राहक, तसेच बीओबी एसडीपीद्वारे प्रत्येक महिन्याला नियमित योगदानाद्वारे बचत करू इच्छिणाऱ्या ग्राहकांना प्रत्येक महिन्याच्या ठेवीवर उच्च व्याजदर मिळेल.’
इतर बातम्या :