एक्स्प्लोर

Railway Ticket Boking Rule : चार महिन्यांऐवजी पुढील दोन महिन्यांच्या तारखांचं तिकीट बुक करता येणार, रेल्वेकडून नियमात बदल, प्रवासी बुचकाळ्यात

Railway News : भारतीय रेल्वेनं तिकीट आरक्षित करण्यासंदर्भातील नियम बदलला आहे. आता पुढील दोन महिन्यांच्या कालावधीतील तिकीट बुक करता येणार आहे.

Indian Railway New Rules नवी दिल्ली: भारतीय रेल्वेनं तिकीट आरक्षित करण्यासंदर्भातील नियमांमध्ये बदल केला आहे. आता 120 दिवसांऐवजी 60 दिवस अगोदर तिकीट आरक्षित करता येल. रेल्वे मंत्रालयानं यासंदर्भातील एक नोटिफिकेशन जारी केलं आहे. रेल्वेच्या नोटिफिकेशननुसार आता पुढच्या दोन महिन्यांच्या काळातील तिकीट बुक करता येईल. यापूर्वी ते चार महिन्यांच्या कालावधीमधील आरक्षित करता येत होतं. यामुळं रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर मोठा परिणाम होणार आहे.  

रेल्वेच्या नोटिफिकेशननुसार नवा नियम 1 नोव्हेंबर 2024 पासून लागू होणार आहे. यामध्ये आगाऊ तिकीट आरक्षणाची मर्यादा 120 दिवसांवरुन कमी करुन 60 दिवसांवर आणली गेली आहे. यामध्ये प्रवासाच्या तारखा वगळल्या जाणार आहेत. सध्याच्या नियमानुसार पुढील चार महिन्यांच्या कालावधीतील एका तारखेला तुम्हाला प्रवास करायचा असल्यास त्याचं बुकिंग करु शकता. नवीन नियम नोव्हेंबरपासून लागू होणार आहे. 

या ट्रेन्सना नियम लागू नसणार

रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार तिकीट आरक्षणाचा बदलेला नियम हा ता एक्स्प्रेस, गोमती एक्स्प्रे अशा गाड्यांसाठी लागू नसेल. याशिवाय परकीय पर्यटकांना 360 दिवसांची मर्यादा आहे. त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.  

प्रवाशांची अडचण होणार?

आता प्रवाशांना 120 दिवस अगोदर तिकीट बुक करता येत होतं. त्यामुळं तिकीट बुकिंग होत असताना एखाद्याचं तिकीट वेटिंगवर असल्यास ते कन्फर्म होण्यासाठी वेळ असायचा . आता 60 दिवसांचा वेळ असल्यानं तिकीट आरक्षित करण्याऱ्यांची संख्या वाढेल. वेटिंग तिकीट कन्फर्म होण्याची शक्यता कमी आहे. पूर्वांचल आणि बिहारच्या मार्गांवर तिकीट आरक्षण चार महिने अगोदर फुल्ल झालेलं असतं.  

रेल्वेकडून सातत्यानं दलालांवर कारवाई

रेल्वे तिकीट आरक्षण प्रक्रिया सोपी बनवण्यासाठी आणि सर्व प्रवाशांना तिकीट मिळवण्यासाठी रेल्वेकडून प्रयत्न केले जात आहे. अवैधरित्या तिकीट बुकिंग करण्याऱ्यांविरोधात देखील रेल्वेकडून कारवाई करण्यात येत आहे. 

रेल्वे आरक्षित करण्याचे दोन पर्याय

भारतीय रेल्वेच्या आयआरसीटीसीच्या वेबसाईटवरुन तिकीट आरक्षित करता येते. यासाठी प्रवाशांना त्या वेबसाईटवर त्यांची नोंदणी करावी लागते. आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर नोंदणी केल्यानंतर तिकीट बुकिंग करता येतं. Ask Disha या एआय प्लॅटफॉर्मचा वापर करुन देखील तिकीट आरक्षित करता येतं.  याशिवाय रेल्वे स्टेशनवर जाऊन तिथं अर्ज भरुन देऊन रोख रक्कम भरुन तिकीट आरक्षित करता येते.

इतर बातम्या :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shrikant Shinde : संविधानावरील चर्चेदरम्यान श्रीकांत शिंदेंचा हल्लाबोल, राहुल गांधी ताडकन उठले अन्...; संसदेत मोठा गदारोळ
संविधानावरील चर्चेदरम्यान श्रीकांत शिंदेंचा हल्लाबोल, राहुल गांधी ताडकन उठले अन्...; संसदेत मोठा गदारोळ
Aadhaar Card Update : आधार कार्ड मोफत अपडेटला पुन्हा मुदतवाढ, जाणून घ्या नवी डेडलाईन
आधार कार्ड एक रुपया न देता अपडेट करा, पुन्हा मुदतवाढ, जाणून घ्या शेवटची तारीख 
India vs Australia 3rd Test : गाबा कसोटीत पहिला दिवस पावसाने वाहून गेला, फक्त 80 चेंडूचा खेळ; पुढील चार दिवस काय होणार?
गाबा कसोटीत पहिला दिवस पावसाने वाहून गेला, फक्त 80 चेंडूचा खेळ; पुढील चार दिवस काय होणार?
Aaditya Thackeray : भाजपचं सरकार आल्यानंतर हिंदू मंदिरं धोक्यात, उद्धव ठाकरेंनी भाजपचं नकली हिंदुत्व केलं एक्स्पोज; आदित्य ठाकरे कडाडले
भाजपचं सरकार आल्यानंतर हिंदू मंदिरं धोक्यात, उद्धव ठाकरेंनी भाजपचं नकली हिंदुत्व केलं एक्स्पोज; आदित्य ठाकरे कडाडले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Varsha Banglow | वर्षा बंगला सोडून एकनाथ शिंदे आता मुक्तागिरी बंगल्यात राहायला जाणारRahul Gandhi On BJP : संविधान रक्षणावर भाजपवाले बोलतात तेव्हा सावरकरांचा अपमान करतातAllu Arjun PC After Bail '  अटक... जेल...जामीन...पुष्पाची पहिली पत्रकार परिषदNana Patole PC : मलाईदार खात्यांसाठी महायुतीत भांडण, नाना पटोलेंचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shrikant Shinde : संविधानावरील चर्चेदरम्यान श्रीकांत शिंदेंचा हल्लाबोल, राहुल गांधी ताडकन उठले अन्...; संसदेत मोठा गदारोळ
संविधानावरील चर्चेदरम्यान श्रीकांत शिंदेंचा हल्लाबोल, राहुल गांधी ताडकन उठले अन्...; संसदेत मोठा गदारोळ
Aadhaar Card Update : आधार कार्ड मोफत अपडेटला पुन्हा मुदतवाढ, जाणून घ्या नवी डेडलाईन
आधार कार्ड एक रुपया न देता अपडेट करा, पुन्हा मुदतवाढ, जाणून घ्या शेवटची तारीख 
India vs Australia 3rd Test : गाबा कसोटीत पहिला दिवस पावसाने वाहून गेला, फक्त 80 चेंडूचा खेळ; पुढील चार दिवस काय होणार?
गाबा कसोटीत पहिला दिवस पावसाने वाहून गेला, फक्त 80 चेंडूचा खेळ; पुढील चार दिवस काय होणार?
Aaditya Thackeray : भाजपचं सरकार आल्यानंतर हिंदू मंदिरं धोक्यात, उद्धव ठाकरेंनी भाजपचं नकली हिंदुत्व केलं एक्स्पोज; आदित्य ठाकरे कडाडले
भाजपचं सरकार आल्यानंतर हिंदू मंदिरं धोक्यात, उद्धव ठाकरेंनी भाजपचं नकली हिंदुत्व केलं एक्स्पोज; आदित्य ठाकरे कडाडले
Rahul Gandhi : पेपरलीक, मक्तेदारी करा, अग्निवीर असावेत, देशातील तरुणांचे अंगठे कापले जावेत, असं संविधानात लिहिलेलं नाही; राहुल गांधींचा हल्लाबोल
पेपरलीक, मक्तेदारी करा, अग्निवीर असावेत, देशातील तरुणांचे अंगठे कापले जावेत, असं संविधानात लिहिलेलं नाही; राहुल गांधींचा हल्लाबोल
Raj Kapoor : पहिल्या चित्रपटासाठी नोकराकडून कर्ज, लता मंगेशकर म्हणाल्या होत्या, मी राज कपूरसाठी कधीही गाणार नाही! काय होता तो प्रसंग?
पहिल्या चित्रपटासाठी नोकराकडून कर्ज, लता मंगेशकर म्हणाल्या होत्या, मी राज कपूरसाठी कधीही गाणार नाही! काय होता तो प्रसंग?
Nana Patole : काँग्रेसमधील अंतर्गत वाद अन् राजीनाम्यावर नाना पटोलेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले,  'त्याची चर्चा करण्याची गरज...'
काँग्रेसमधील अंतर्गत वाद अन् राजीनाम्यावर नाना पटोलेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले 'त्याची चर्चा करण्याची गरज...'
Delhi Farmer Protest : शेतकऱ्यांचा शंभू सीमेवरून दिल्लीकडे मोर्चा; पोलिसांनी रॉकेट लाँचरमधून बॉम्ब अन् गोळ्या झाडल्याचा शेतकऱ्यांचा आरोप
शेतकऱ्यांचा शंभू सीमेवरून दिल्लीकडे मोर्चा; पोलिसांनी रॉकेट लाँचरमधून बॉम्ब अन् गोळ्या झाडल्याचा शेतकऱ्यांचा आरोप
Embed widget