एक्स्प्लोर

Bank News : मिनिमम बॅलन्स न ठेवणाऱ्या खातेदारांकडून 9000 कोटींची वसुली, बँकांची पाच वर्षांमधील आकडेवारी समोर

Bank News : काही बँकांनी बचत खात्यावरील मिनिमम बॅलन्स शुल्क आकारणं बंद केलं आहे. मात्र, संसदेत सादर केलेल्या माहितीनुसार बँकांनी पाच वर्षात 9000 कोटी रुपये वसूल केले आहेत.

नवी दिल्ली : देशातील काही प्रमुख बँकांनी बचत खात्यावरील मिनिमम बॅलन्स शुल्क आकारण्याचा निर्णय रद्द केला आहे. मात्र, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी गेल्या पाच वर्षात बँक खातेदारांकडून किमान सरासरी मासिक शिल्लक रक्कम न ठेवल्यानं किती रक्कम वसूल केली याची माहिती देण्यात आली आहे. ही रक्कम साधारणपणे 9000 कोटींच्या घरात आहे. राज्यसभेत वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार खातेदारांकडून वसूल करण्यात आलेली रक्कम 8932.98 कोटी रुपये आहे.

स्टेट बँक ऑफ इंडिया आणि यूनियन बँक ऑफ इंडिया यांच्याशिवाय इतर काही बँकांनी सरासरी शिल्लक रक्कम खात्यात न ठेवल्याबद्दल आकारलं जाणारं शुल्क रद्द केलं आहे. यूनियन बँक ऑफ इंडियानं म्हटलं की हा निर्णय ग्राहकांना पायाभूत बँकिंग सेवांमध्ये समानता, निष्पक्षता सुनिश्चित करण्यासाठी घेतला गेला आहे.

या बँकांनी दंड रद्द केला

वित्त मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार एप्रिल ते जून या तिमाहीत कॅनरा बँक, बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक, इंडियन बँक, बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांनी किमान सरासरी शिल्लक रकमेसाठी आकारलं जाणारं शुल्क रद्द केलं आहे. भारतीय स्टेट बँक 2020 पासून हे शुल्क आकारत नाही.

वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी म्हटलं की वित्तीय सेवा विभागानं बँकांनी हा दंड कमी करणे अथाव रद्द करण्यावर विचार करावा. प्रामुख्यानं निम-शहरी आणि ग्रामीण भागातील ग्राहकांना दिलासा देणं आवश्यक आहे.

द इंडियन एक्सप्रेस च्या रिपोर्टनुसार सर्वाधिक दंड इंडियन बँकेनं वसूल केला आहे. ही रक्कम 1828.18 कोटी रुपये इतकी आहे. पंजाब नॅशनल बँक दुसऱ्या स्थानावर असून त्यांनी 1662.42 कोटी रुपये होता. बँक ऑफ बडोदानं1531.62 कोटी रुपयांचा दंड वसूल केला होता. यानंतर कॅनरा बँकेनं 1212.92 कोटी रुपयांची वसुली केली. बँक ऑफ इंडियानं 809.66 कोटी रुपयांची दंड वसुली केली. सेंट्रल बँक ऑफ इंडियानं 585.36 कोटी, बँक ऑफ महाराष्ट्रानं 535.20 कोटी रुपये, यूनियन बँकेनं 484.75 कोटी, पंजाब अँड सिंध बँकेनं 100.92 कोटी तर इंडियन ओव्हरसीज बँकेनं 62.04 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

कोणत्या वर्षात किती दंड वसूल?

2020-21: 1,142.13 कोटी रुपये

2021-22: 1,428.53 कोटी रुपये

2022-23: 1,855.43 कोटी रुपये

2023-24: 2,331.08 कोटी रुपये

2024-25: 2,175.81 कोटी रुपये

वरील आकडेवारीनुसार गेल्या पाच वर्षात बँकांनी किमान सरासरी शिल्लक रक्कम न ठेवल्याबद्दल करण्यात आलेली दंड वसुली वाढल्याचं पाहायला मिळतं.

बँकांवर दबाव?

काही बँकांचा किमान सरासरी शिल्लक याबाबतचं शुल्क रद्द करण्याचा निर्णय अशावेळी आला आहे ज्यावेळी चालू खाती आणि बचत खाती यांच्या प्रमाणावर दबाव आहे. ही खाती बँकांना पैसे कमावण्यासाठी सर्वात सोपा मार्ग असतो. जूनमधील ताज्या वित्तीय स्थिरता रिपोर्टनुसार आरबीआयनं म्हटलं की बँकांची दमा रक्कम स्वस्त सीएसओ शिवाय डिपॉझिट सर्टिफिकेटसची भागीदारी वाढली आहे.दरम्यान, स्टेट बँक ऑफ इंडियानं 2020 पासून किमान शिल्लक रक्कमेवर आकारलं जाणारं शुल्क रद्द केलं आहे. त्यामुळं पहिल्यांदा खातं उघडणाऱ्यांची संख्या वाढली आहे.

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Municipal Corporation: आचारसंहिता लागण्यापूर्वीच कोल्हापूरच्या केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंकडून प्रस्तावावर सही
कोल्हापूर : आचारसंहिता लागण्यापूर्वीच केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंची प्रस्तावावर सही
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2025 | सोमवार
राज्य निवडणूक आयोग आधी म्हणतो, दुबार मतदार काढू; आता म्हणतो, आम्हाला आधिकर नाही, यादी आहे तशी स्वीकारली, हा निवडणुकीचा पोरखेळ; बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल
राज्य निवडणूक आयोग आधी म्हणतो, दुबार मतदार काढू; आता म्हणतो, आम्हाला आधिकर नाही, यादी आहे तशी स्वीकारली, हा निवडणुकीचा पोरखेळ; बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल
Maharashtra Local Body Election: एकनाथ शिंदेंसोबत सगळीकडे युती, अजित पवारांविरुद्ध शड्डू; महापालिकेची निवडणूक जाहीर होताच देवेंद्र फडणवीस काय काय म्हणाले?
एकनाथ शिंदेंसोबत सगळीकडे युती, अजित पवारांविरुद्ध शड्डू; महापालिकेची निवडणूक जाहीर होताच देवेंद्र फडणवीस काय काय म्हणाले?

व्हिडीओ

Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
Municipal Corporation Election : मनपासाठी 15 जानेवारीला मतदार, तर 16 जानेवारीला मतमोजणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Municipal Corporation: आचारसंहिता लागण्यापूर्वीच कोल्हापूरच्या केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंकडून प्रस्तावावर सही
कोल्हापूर : आचारसंहिता लागण्यापूर्वीच केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंची प्रस्तावावर सही
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2025 | सोमवार
राज्य निवडणूक आयोग आधी म्हणतो, दुबार मतदार काढू; आता म्हणतो, आम्हाला आधिकर नाही, यादी आहे तशी स्वीकारली, हा निवडणुकीचा पोरखेळ; बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल
राज्य निवडणूक आयोग आधी म्हणतो, दुबार मतदार काढू; आता म्हणतो, आम्हाला आधिकर नाही, यादी आहे तशी स्वीकारली, हा निवडणुकीचा पोरखेळ; बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल
Maharashtra Local Body Election: एकनाथ शिंदेंसोबत सगळीकडे युती, अजित पवारांविरुद्ध शड्डू; महापालिकेची निवडणूक जाहीर होताच देवेंद्र फडणवीस काय काय म्हणाले?
एकनाथ शिंदेंसोबत सगळीकडे युती, अजित पवारांविरुद्ध शड्डू; महापालिकेची निवडणूक जाहीर होताच देवेंद्र फडणवीस काय काय म्हणाले?
Municipal Corporation Election: कोल्हापूर, सोलापूर, सांगली मनपा निवडणुकीसाठी बिगुल अखेर वाजला! एका महिन्यात नवे कारभारी मिळणार!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली मनपा निवडणुकीसाठी बिगुल अखेर वाजला! एका महिन्यात नवे कारभारी मिळणार!
Maharashtra Municipal Elections : मुंबई-ठाण्यासह 29 महापालिकांसाठी निवडणुका जाहीर, मतदान आणि निकाल कधी? असा असेल संपूर्ण कार्यक्रम
मुंबई-ठाण्यासह 29 महापालिकांसाठी निवडणुका जाहीर, मतदान आणि निकाल कधी? असा असेल संपूर्ण कार्यक्रम
निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे; दुबार मतदान, प्रचाराची मुदत अन् ZP निवडणुका
निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे; दुबार मतदान, प्रचाराची मुदत अन् ZP निवडणुका
Municipal Corporation Election 2025: पुणे पिंपरी चिंचवडसह महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलं; मतदान अन् निकाल कधी? जाणून घ्या सविस्तर
पुणे पिंपरी चिंचवडसह महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलं; मतदान अन् निकाल कधी? जाणून घ्या सविस्तर
Embed widget