एक्स्प्लोर

Bank Holidays in June 2023 : जून महिन्यात 12 दिवस बँका राहणार बंद! बँकेत जाण्यापूर्वी सुट्ट्यांची संपूर्ण यादी तपासा

Bank Holidays in June 2023 : जून महिन्यात 12 दिवस बॅंका बंद राहणार आहेत. या सुट्ट्या संपूर्ण देशभरात लागू होणार आहेत.

Bank Holidays in June 2023 : मे महिना संपून आता जून महिना अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशातच वर्षाचा सहावा महिना सुरु होण्यापूर्वी बँक (Bank Holiday) एकूण किती दिवस बंद राहणार आहेत, हे जाणून घेणं फार महत्वाचं आहे. बँक हा सर्वसामान्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. आजकाल इंटरनेट बँकिंग (Internet Banking), मोबाईल बँकिंगमुळे (Mobile Banking) लोकांची बरीचशी कामे घरबसल्याच होतात. पण मोठ्या प्रमाणात रोख रक्कम काढायची असल्यास (Cash Withdrawal), डिमांड ड्राफ्ट (Demand Draft) इत्यादी कामांसाठी बँकेची गरज भासते. यासोबतच आरबीआयने 2000 रुपयांच्या नोटा बदलण्याचे आदेश दिले आहेत. नागरिक 30 सप्टेंबर 2023 पर्यंत कोणत्याही बँकेत जाऊन 2000 रुपयांची नोट बदलू शकता. अशा परिस्थितीत, जर तुम्ही जून महिन्यात कोणतेही महत्त्वाचे काम पूर्ण करण्यासाठी बँकेत जात असाल, तर या संपूर्ण महिन्यातील सुट्ट्यांची यादी जाणून घेणं गरजेचं आहे. 

जून महिन्यात 12 दिवस बॅंका बंद राहणार आहेत. या सुट्ट्या संपूर्ण देशभरात लागू होणार आहेत. नुकत्याच, रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (RBI) जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार जून महिन्यात कोणत्या दिवशी बॅंका बंद असणार आहेत याची यादी जाहीर केली आहे.  

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या कॅलेंडरनुसार जून महिन्यात एकूण 12 दिवस बँकांची सुट्टी असेल. राज्य आणि तिथल्या सणानुसार या सुट्ट्या बदलू शकतात. बँक सुट्ट्यांची यादी आरबीआय (RBI) 3 आधारावर जारी करते. ही यादी देशभरात आणि राज्यांमध्ये साजरा केल्या जाणाऱ्या सणांवर आधारित आहे.

सुट्ट्यांची संपूर्ण यादी (Bank Holidays List in June 2023) :

4 जून 2023 : रविवार (साप्ताहिक सुट्टी)

10 जून 2023 : महिन्याचा दुसरा शनिवार

11 जून 2023 : रविवार (साप्ताहिक सुट्टी)

15 जून 2023 : मिझोराम आणि ओडिशामध्ये राजा संक्रांतीनिमित्त बँका बंद राहतील.

18 जून 2023 : रविवार (साप्ताहिक सुट्टी)

20 जून 2023 : ओडिशात रथयात्रेमुळे बँका बंद राहतील.

24 जून 2023 : महिन्याचा चौथा शनिवार

25 जून 2023 : रविवार (साप्ताहिक सुट्टी)

26 जून 2023 : त्रिपुरामध्ये खार्ची पूजेमुळे बँका बंद राहतील.

28 जून 2023 : केरळ, महाराष्ट्र, जम्मू आणि काश्मीरमध्ये ईद उल अजहानिमित्त बँका बंद राहतील.

29 जून 2023 : ईद उल अजहा निमित्त इतर राज्यांमध्ये बँका बंद राहतील.

30 जून 2023 : मिझोराम, ओडिशामध्ये रीमा ईद उल अझा बँका बंद राहतील.

वरील नमूद केलेल्या दिवसांच्या सुट्ट्या रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (RBI) जाहीर केलेल्या सुट्ट्यांनुसार लागू होणार आहेत. या बॅंकेच्या सुट्ट्या असल्या तरी खातेधारकांनी बॅंकेचे काही काम करण्यासाठी नेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग वापरु शकतात. तुम्ही या सुट्ट्यांचा मागोवा ठेवल्यास, तुम्ही बँकेच्या व्यवहाराची अधिक चांगल्या पद्धतीने योजना करु शकता. लाँग वीकेंडसाठी, तुम्ही तुमच्या सुट्ट्यांचे उत्तम नियोजन देखील करु शकता.

महत्त्वाच्या बातम्या :

Adani Group: अदानी एंटरप्रायझेसच्या शेअर्सवर स्टॉक एक्सचेंजची पाळत, 'अदानीं'च्या शेअर्समध्ये पुन्हा पडझड 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Palghar News: वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ashok Dhodi Palghar : कारमध्ये सापडलेला मृतदेह अशोक धोडी यांचाच, पोलिसांची माहितीJob Majha : जॉब माझा :भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र येथे विविध पदांसाठी भरती :ABP MajhaBuldhana : बुलढाणा केसगळती प्रकरण, गावातील नागरिकांच्या रक्तात, केसात हेवी मेटल असलेलं 'सेलेनियम'Chhatrapati Shivaji Maharaj Statue :जपानच्या टोकियोत बसवणार शिवरायांचा पुतळा, देशभरात रथयात्रा सुरू

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Palghar News: वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
Embed widget