(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bank Holidays in December : डिसेंबरमध्ये देशभरातील विविध भागात बँका 17 दिवस बंद राहणार, जाणून घ्या कोणत्या दिवशी सुट्टी असणार?
Bank Holidays : डिसेंबर महिन्यात देशभरात 17 दिवस बँका बंद राहणार आहेत. वेगवेगळ्या राज्यात कोणत्या दिवशी बँका बंद राहणार आहेत हे पाहणं महत्त्वाचं आहे.
नवी दिल्ली : 2024 मधील शेवटचा महिना डिसेंबरमध्ये देशभरात राष्ट्रीय आणि प्रादेशिक सुट्ट्यांमुळं बँका बंद राहणार आहेत. रविवार, दुसरा आणि चौथा शनिवार, विविध सणांच्या दिवशी असलेल्या सुट्ट्यांच्या दिवशी बँका बंद राहतील. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सुट्टयांच्या वेळापत्रकानुसार डिसेंबरमध्ये कोणत्या दिवशी बँका बंद असतील ते देखील पाहणं आवश्यक आहे.
बँकांच्या सुट्ट्यांची यादी :
1 डिसेंबर - रविवार (संपूर्ण देशभर)
3 डिसेंबर - शुक्रवार (गोवा)
8 डिसेंबर- रविवार (संपूर्ण देशभर)
12 डिसेंबर - मंगळवार (मेघालय)
14 डिसेंबर - दुसरा शनिवार (संपूर्ण देशभर)
15 डिसेंबर - रविवार (संपूर्ण देशभर)
18 डिसेंबर -बुधवार (मेघालय)
19 डिसेंबर - गुरुवार ,गोवा मुक्ती दिन(गोवा)
22 डिसेंबर - रविवार (संपूर्ण देशभर)
24 डिसेंबर -मंगळवार (मिझोरम, नागालँड आणि मेघालय) ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला सुट्टी
25 डिसेंबर - बुधवार (संपूर्ण देशभर) ख्रिसमस
26 डिसेंबर - गुरुवार (मिझोरम,नागालँड, मेघालय) ख्रिसमस सण साजरा करण्यासाठीसुट्टी
27 डिसेंबर - शुक्रवार (मिझोरम,नागालँड, मेघालय) ख्रिसमस सण साजरा करण्यासाठीसुट्टी
28 डिसेंबर - रविवार (संपूर्ण देशभर)
30 डिसेंबर - सोमवार (मेघालय )
31 डिसेंबर- मंगळवार (मिझोरम आणि सिक्कीम)
बँकांचे ग्राहक सुट्टीच्या काळामध्ये डिजिटल प्लॅटफॉर्म, इंटरनेट बँकिंग, मोबाईल अॅप, एटीएम यासारख्या सेवांचा वापर करु शकतात. ज्या दिवशी बँका बंद असतील त्याची माहिती असल्यास ग्राहकांच्या बँकांमधील फेऱ्या वाचू शकतात. ग्राहकांनी त्यांच्या राज्यात कोणत्या दिवशी बँका बंद असणार आहेत याची नोंद घेणं आवश्यक आहे.
बँकांच्या शाखा विविध सुट्ट्यांमुळं बंद असल्या तरी ऑनलाईन सेवांचा वापर करुन ग्राहक त्यांची आर्थिक कामं पूर्ण करु शकतात. ऐनवेळी रोख रक्कम हवी असल्यास एटीएममधून रोख रक्कम काढण्याचा पर्याय आहे. बँकांना सुट्ट्या असतील त्या दिवशी एटीएममधून पैसे काढण्याचा पर्याय देखील बँक ग्राहकांना उपलब्ध आहे. याशिवाय मोबाईलमधील विविध अॅप्सचा वापर ग्राहकांकंडून केला जातो. त्यामुळं कमी रकमेसाठी बँकांमध्ये जाणाऱ्यांची संख्या देखील कमी झाली आहे. बहुतांश यूजर्स गुगल पे, फोन पे, पेटीएम सारख्या अॅप्सचा वापर केला जातो.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून वर्षभरातील बँकांच्या सुट्ट्यांचं वेळापत्रक जाहीर केलं होतं. त्यानुसार बँका सुट्ट्या घेतात. याशिवाय स्थानिक आणि राष्ट्रीय उत्सवाच्या निमित्तानं किंवा धार्मिक सण उत्सवांच्या निमित्तानंदेखील सुट्टी जाहीर केली जाते.
इतर बातम्या :