Financial Changes in December : डिसेंबरमध्ये आधार अपडेट, टॅक्स फायलिंग संदर्भातील कामं पूर्ण करावी लागणार, आरबीआयकडेही लक्ष
Financial Changes in December : डिसेंबर महिन्यात आधार कार्ड, क्रेडिट कार्ड संदर्भातील कामं करावी लागणार आहेत. डिसेंबर महिन्यात आधार कार्ड दुरुस्तीची मुदत संपणार आहे.
December Financial Change नवी दिल्ली: 2024 या वर्षातील शेवटचा महिना असलेल्या डिसेंबरमध्ये आर्थिक आणि वित्तीय कामांच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे. आरबीआयची पतधोरण समितीची बैठक देखील होणार आहे. याशिवाय आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची मुदत संपणार आहे. अॅडव्हान्स टॅक्स जमा करण्याची शेवटची तारीख देखील डिसेंबर महिन्यात आहे. याशिवाय काही बँकांच्या क्रेडिट कार्डचे नियम बदलणार आहेत.
आरबीआयचं पतधोरण 6 डिसेंबरला येणार?
सर्वांचं लक्ष आरबीआयच्या पतधोरणाकडे लागली आहे. आरबीआय व्याज दरांमध्ये कपात करणार का ते पाहावं लागेल. सध्याचा दर 6.5 टक्के काय राहतो का ते पाहावं लागेल. आरबीआयनं पतधोरण आढाव्यानंतर सलग 10 वेळा दर बदलले नाहीत. महागाईचा दर कायम राहिल्यास आरबीआय व्याज दरात कपात करेल, अशी आशा अर्थशास्त्रातील जाणकारांना आहे. आरबीआयनं 6 डिसेंबरला दरांमध्ये बदल केले नहीत तर गृह कर्जावरील व्याज दर आणि त्याच्या हप्त्यावर परिणाम होणार नाही. यानंतर कर्ज काढणाऱ्या लोकांना आर्थिक नियोजनात त्यानुसार बदल करावे लागतील.
मोफत आधार अपडेटची मुदत संपणार
आधार कार्ड मोफत करण्यासाठी शेवटची मुदत 14 डिसेंबर आहे. यानुसार आधारमधील पत्ता, जन्मतारीख कोणतंही शुल्क जमा न करता येतील. ज्यांचं कार्ड 10 वर्षांपेक्षा जुनं आहे त्यांना ते अपडेट करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 14 डिसेंबरनंतर यासाठी 50 रुपये शुल्क द्यावं लागेल.
तिसऱ्या अॅडव्हान्स टॅक्सची अखेरची तारीख 15 डिसेंबर
जर तुम्ही पगारदार व्यक्ती असाल तर इतर संसाधनातून उत्पन्न मिळवत असाल तर त्यासाठी म्हणजेच ठेवींवरील व्याज, घरभाड्यातून मिळणारं उत्पन्न, भांडवली उत्पन्न मिळत असेल तर अॅडव्हान्स टॅक्स द्यावा लागेल. प्राप्तिकर कायदा सेक्शन 208 नुसार कोणत्याही आर्थिक वर्षात टीडीएस आणि टिसीएस कपात करुन 10 हजारांपेक्षा अधिक टॅक्स लायबिलिटी राहिल्यास अॅडव्हान्स टॅक्स द्यावा लागतो. करदात्यांना अंदाजित कर चार टप्प्यांमध्ये द्यावा लागतो. 75 टक्के रक्कम 15 डिसेंबरपर्यंत द्यावे लागतात. यामध्ये चूक झाल्या, प्राप्तिकर कायदा 234 सीनुसार दरमहा 1 टक्के दरानं दंडव्याज द्यावं लागू शकतं.
अॅक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्डचं शुल्क बदलणार
अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डवरील असोसिएट चार्जेसचा आढावा घेऊन त्यात बदल होण्याची तारीख 20 डिसेंबर आहे. त्यानंतर क्रेडिट कार्ड ग्राहकांना नव्या दरानं रिडीम्पशन फी, क्रेडिट कार्ड आणि व्याज इतर बदलेल्या शुल्कानुसार द्यावं लागेल. बँकेनं EDGE रिवॉर्ड्स आणि माइल्सचा वापर करणाऱ्या ग्राहकांसाठी देखील फी बदलली आहे. कॅश रिडिम्पशनवर 199 रुपयांसह जीएसटी लागेल. पॉइंटसला मायलेज प्रोग्राममध्ये बदलायचं असल्यास 199 रुपयांसह जीएसटी शुल्क द्यावं लागेल. AU स्मॉल फायनान्स बँक आपल्या काही क्रेडिट कार्ड शुल्कात बदल करणार असून डिसेंबरमध्ये ते लागू होतील.
आयटीआर फाईल करण्याचा शेवटचा दिवस
जर तुम्ही आयटीआर फाईल केला नसेल तर दंडासह जमा करण्याची तारीख 31 डिसेंबर 2024 पर्यंत करु शकतात. आयटीआर फाइल करण्याची शेवटची तारीख 31 जुलै होती. आता 5 हजार रुपये दंड भरुन आयटीआर फाईल करता येईल. ज्यांचं उत्पन्न 5 लाखांपेक्षा कमी असेल त्यांना 1 हजार रुपये द्यावे लागतील.
इतर बातम्या :