सगल 5 दिवस बँका राहणार बंद, बँकांचे व्यवहार करण्यापूर्वी 'ही' यादी तपासा
यावर्षी सोमवारी ख्रिसमस (नाताळ 2023) (Christmas) हा सण साजरा केला जाणार आहे. या ख्रिसमसच्या सणाच्या निमित्तानं बँकांना मोठी सुट्टी (Bank Holidays) मिळणार आहे.
Bank Holidays : यावर्षी सोमवारी ख्रिसमस (नाताळ 2023) (Christmas) हा सण साजरा केला जाणार आहे. या ख्रिसमसच्या सणाच्या निमित्तानं बँकांना मोठी सुट्टी (Bank Holidays) मिळणार आहे. सलग पाच दिवस बँका बंद राहणार आहेत. चौथ्या शनिवारमुळं 23 डिसेंबरला म्हणजे उद्या बँका बंद राहणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, काही राज्यांमध्ये ख्रिसमसमुळं बँकांना सलग पाच दिवस सुट्टी असणार आहे. यावर्षीचे फक्त 9 दिवस उरले आहेत. यापैकी काही राज्यांमध्ये 7 दिवस बँकांना सुट्ट्या असणार आहेत. अशा परिस्थितीत तुम्हाला बँकेशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम पूर्ण करायचे असेल तर ते आजच करा. तुम्हाला नंतर अडचणींचा सामना करावा लागणार नाही. ख्रिसमसनिमित्त सलग किती दिवस बँका कोणत्या राज्यांमध्ये बंद राहणार हे पाहुयात.
सलग पाच दिवस राहणार बँका बंद
यावेळी चौथा शनिवार असल्यानं 23 डिसेंबर रोजी देशभरातील बँकांना सुट्टी असेल. यानंतर रविवार आहे. ख्रिसमसनिमित्त सोमवारी देशभरातील बँका बंद राहणार आहेत. 26 आणि 27 डिसेंबरला अनेक राज्यांमध्ये ख्रिसमसच्या निमित्ताने बँकांना सुट्टी असेल. अशा स्थितीत पाच दिवसांच्या सुट्टीमुळे नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागू शकतो. समस्या टाळण्यासाठी, राज्यांनुसार सुट्ट्यांची यादी पाहून तुम्ही बँकेत जाण्याची योजना करू शकता.
या राज्यांमध्ये बँका राहणार बंद
23 डिसेंबर 2023- चौथ्या शनिवारमुळं देशभरात बँका बंद राहतील
24 डिसेंबर 2023- रविवारमुळं देशभरातील बँकांना सुट्टी असेल
25 डिसेंबर 2023- ख्रिसमसनिमित्त देशभरात बँका बंद राहतील
26 डिसेंबर 2023- ख्रिसमसच्या सणानिमित्त आयझॉल, कोहिमा, शिलाँग येथे बँका बंद राहतील
27 डिसेंबर 2023- ख्रिसमसमुळे कोहिमामधील बँका बंद राहतील
30 डिसेंबर 2023- शिलाँगमध्ये यु कियांगमुळं बँका बंद राहतील
31 डिसेंबर 2023- रविवारमुळे बँकांना सुट्टी असेल
बँक बंद असताना असे काम पूर्ण करा
बँक ही एक आवश्यक वित्तीय संस्था आहे. अशा परिस्थितीत दीर्घकाळ बँका बंद असल्यानं ग्राहकांची अनेक महत्त्वाची कामं रखडली आहेत. पण बदलत्या तंत्रज्ञानामुळं अनेक कामं सोपी झाली आहेत. एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यासाठी तुम्ही मोबाईल बँकिंग किंवा नेट बँकिंग वापरु शकता. UPI च्या माध्यमातूनही पैसे ट्रान्सफर करता येतात. पैसे काढण्यासाठी तुम्ही एटीएम वापरू शकता.
महत्त्वाच्या बातम्या: