(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bank Holidays in August 2023 : ऑगस्ट महिन्यात 14 दिवस बँका राहणार बंद! बँकेत जाण्यापूर्वी सुट्ट्यांची संपूर्ण यादी तपासा
Bank Holidays in August 2023 : जून महिन्यात 14 दिवस बॅंका बंद राहणार आहेत. या सुट्ट्या संपूर्ण देशभरात लागू होणार आहेत.
Bank Holidays in August 2023 : जुलै महिना संपून आता ऑगस्ट महिना अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशातच ऑगस्ट महिना सुरु होण्यापूर्वी बँक (Bank Holiday) एकूण किती दिवस बंद राहणार आहेत, हे जाणून घेणं फार महत्वाचं आहे. कारण बँक हा सर्वसामान्य लोकांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. खात्यातून पैसे काढण्यापासून ते पैसे जमा करणे, जुन्या नोटा बदलणे इत्यादी कामासाठी आपल्याला बँकेत जावे लागते. जर तुम्हालाही ऑगस्ट महिन्यात बँकेशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम करायचे असेल तर या महिन्याची बँकेची सुट्ट्यांची यादी नक्की पाहा.
ग्राहकांच्या सोयीसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया दरवर्षी सुट्ट्यांची यादी प्रसिद्ध करते. अशा परिस्थितीत ही यादी तपासून तुम्ही तुमच्या बँकेशी संबंधित कामांची यादी सहज बनवू शकता. रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या यादीनुसार, ऑगस्ट 2023 महिन्यात एकूण 14 दिवस बँका बंद राहतील. या सुट्ट्या संपूर्ण देशभरात लागू होणार आहेत.
ऑगस्ट हा सुट्ट्यांचा महिना आहे
विशेष म्हणजे ऑगस्ट महिन्यात बँकांना मोठ्या प्रमाणात सुट्ट्या असतात. सण, जयंती आणि शनिवार-रविवार यामुळे या महिन्यात अनेक दिवस बँका बंद राहणार आहेत. 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनानिमित्त संपूर्ण देशात बँका बंद राहणार आहेत. याशिवाय ओणम, रक्षाबंधनामुळे देशातील अनेक भागांत बँका बंद राहणार आहेत. तुम्हालाही पुढच्या महिन्यात काही महत्त्वाची कामे पूर्ण करायची असतील, तर सुट्ट्यांच्या यादीनुसार नियोजन करा.
सुट्ट्यांची संपूर्ण यादी (Bank Holidays List in August 2023) :
6 ऑगस्ट 2023 : रविवार (साप्ताहिक सुट्टी)
8 ऑगस्ट 2023 : गंगटोकमधील तेंडोंग ल्हो रम फाट्यामुळे बॅंक बंद असेल.
12 ऑगस्ट 2023 : महिन्याचा दुसरा शनिवार
13 ऑगस्ट 2023 : रविवार (साप्ताहिक सुट्टी)
15 ऑगस्ट 2023 : स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभरात बँका बंद राहतील
16 ऑगस्ट 2023 : पारशी नववर्षानिमित्त मुंबई, नागपूर आणि बेलापूरमध्ये बँका बंद राहतील.
18 ऑगस्ट 2023 : गुवाहाटीमध्ये श्रीमंत शंकरदेव तिथीमुळे बँका बंद राहतील.
20 ऑगस्ट 2023 : रविवारी (साप्ताहिक सुट्टी)
26 ऑगस्ट 2023 : महिन्याचा चौथा शनिवार
27 ऑगस्ट 2023 : रविवार (साप्ताहिक सुट्टी)
28 ऑगस्ट 2023 : पहिल्या ओणममुळे कोची आणि तिरुवनंतपुरममध्ये बँका बंद राहतील
29 ऑगस्ट 2023 : तिरुओनममुळे कोची आणि तिरुअनंतपुरममध्ये बँकेला सुट्टी
30 ऑगस्ट : रक्षाबंधन
31 ऑगस्ट 2023 : डेहराडून, गंगटोक, कानपूर, कोची, लखनौ आणि तिरुअनंतपुरम येथे रक्षाबंधन / श्री नारायण गुरु जयंती / पंग-लबसोल मुळे बँकांना सुट्टी असेल.
बँक बंद असताना काम कसे हाताळायचे?
आजच्या काळात नवीन तंत्रज्ञानामुळे बँक बंद असतानाही ग्राहक बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करू शकतात. यासाठी तो नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग किंवा यूपीआय या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करू शकतो. त्याच वेळी, तुम्ही पैसे काढण्यासाठी एटीएम वापरू शकता.
महत्त्वाच्या बातम्या :