ATM : एटीएममध्ये एकूण किती पैसे असतात? ATM मशीनसंबंधित 'या' गोष्टी तुम्हाला माहितीयत?
Total Cash in ATM Machine : तुम्ही कधी विचार केला आहे की, एटीएम मशीनमध्ये एकूण किती पैसे असतात. आज या प्रश्नाचं उत्तर जाणून घ्या.
मुंबई : बँक अकाऊंटमधून पैसे काढायचे असतील तर सोपा मार्ग म्हणजे एटीएम (ATM) मशीन. एटीएम (ATM) मुळे आपली अनेक कामं सोपी होतात. एटीएममुळे फक्त पैसै काढणे (Money Withdrawn) नाही तर, बँकेत पैसे भरणं, पैसे ट्रान्सफर (Money Transfer) करणं यासारखी अनेक कामं बँकेत (Bank) न जाता सहज होतात. एटीएमचा वापर बहुतेक जण सगळेच करतात. एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले असता, कधी मशीनमध्ये पैसे नसतात, असं तुमच्यासोबतही कधी झालं आहे का? यावेळी, तुम्ही कधी विचार केला आहे की, एटीएममध्ये किती पैसे असतात. एटीएम मशीनमध्ये एकूण किती पैसे असतात, आज या प्रश्नाचं उत्तर जाणून घ्या.
एटीएम म्हणजे काय?
एटीएम (ATM) म्हणजे ऑटोमेटेड टेलर मशीन (Automated teller machine). ही इलेक्ट्रॉनिक मशीन (Electronic Machine) बँकेचा सर्व्हर (Bank Server) आणि सॅटेलाईट (Satellite) यांच्यासोबत कनेक्टेड असते. यामुळे बँकेसंबंधित कम्प्युटराईजड कामं सहज करतात येतात. बँक सर्व्हरमधून (Bank Server) परवानगी मिळाल्यानंतरच तुमच्या बँक खात्यातून (Bank Account) पैसे काढले जातात.
एटीएम मशीनमध्ये एकूण किती पैसे असतात?
एटीएम मशीनमध्ये पैशांसाठी ट्रे असतात, ज्याला स्लॉट असं म्हटलं जातं. एटीएममध्ये 100, 200, 500 अशा नोटांची विभागणी करुन जमा केले जातात. एटीएम मशीनमध्ये चार स्लॉट असतात. या प्रत्येक स्लॉटमध्ये 22 कप्पे असतात. एका कप्प्यात 100 नोटा भरता येतात. एटीएम मशीनमध्ये संबंधित बँक पैसे जमा करते. हे काम बँकेचे ठराविक कर्मचारी करतात. एका एटीएम मशीमध्ये सुमारे 88 लाख रुपये रक्कम जमा केली जाऊ शकते. मात्र, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) मार्गदर्शक तत्त्वांनुसार, बँक एटीएम मशीनमध्ये 12 लाखांपेक्षा जास्त पैसे ठेवू शकत नाही.
कोणत्या एटीएममध्ये किती पैसे?
दरम्यान, एटीएम मशीन कोणत्या भागात आहे, यानुसार बँक संबंधित एटीएममध्ये किती पैसे ठेवायचे हे ठरवते. ग्रामीण भागातील लोक एटीएमचा वापर क्वचितच करतात, त्यामुळे ग्रामीण भागातील एटीएम मशीनमध्ये सुमारे 4 ते 5 लाख रुपयेच ठेवले जातात. शहरी भागातील लोक एटीएमचा जास्त वापर करतात, त्यामुळे या भागातील एटीएम मशीनमध्ये 8 ते 12 लाख रुपये ठेवले जातात. तसेच, एटीएमचा वापर पाहता बँक एटीएममध्ये दिवसभरात किती वेळा पैसे जमा करायचं, हे ठरवते.
महत्त्वाच्या इतर बातम्या :