ATM Card : एटीएम कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी; तुम्हाला मिळतोय 5 लाखांचा फायदा
ATM Card Insurance: एटीएम कार्डधारकांना पाच लाख रुपयांचा फायदा मिळू शकतो. जाणून घ्या याबाबत...
ATM Card Insurance: एटीएम कार्ड असणे (ATM Card) ही सध्याच्या काळातील आवश्यकता आहे. एटीएम कार्डमुळे लोकांच्या बँकातील फेऱ्या कमी झाल्या आहेत. पैसे काढण्यासाठी आता एटीएमला प्राधान्य दिले जात आहे. एटीएम-डेबिट कार्डमुळे (ATM-Debit Card) लोकांना खिशात रक्कम नसली तरी मोठ्या रक्कमेचे व्यवहार करता येणे शक्य झाले आहे. एटीएम कार्डचा आणखी एक फायदा आहे. मात्र, याबाबत फार कमी लोकांना माहिती आहे. एटीएम कार्डवर तुम्हाला 5 लाख रुपयांचा विमा मिळतो. भारतात याबाबत फारशी कल्पना नाही.
सार्वजनिक बँक आणि खासगी बँकेच्या एटीएम कार्डसह तुम्हाला Complimentary Insurance Cover देखील मिळतो. बहुतांशी लोक विम्याचा दावा करत नाही. मात्र, जर तुम्ही योग्यवेळी दावा केल्यास तुम्हाला पाच लाखापर्यंतच्या विम्याचा फायदा मिळू शकतो.
कोणत्या ग्राहकांना मिळू शकतो फायदा?
जर, तुम्हाला Complimentary Insurance Cover चा फायदा हवा असेल तुम्ही एटीएम कार्डचा कमीत कमी 45 दिवस वापर करणे आवश्यक आहे. बँकेच्या एटीएम कार्डवर तुम्हाला Accidental Insurance चा फायदा मिळतो. विम्यासाठी तुम्हाला कोणताही प्रीमियम भरावा लागत नाही. हा प्रीमियम बँकेकडून भरला जातो. बहुतांशी जणांना याची माहिती नसते. बँकेकडूनदेखील याची फार माहिती दिली जात नाही. तुमच्याकडे असलेल्या कार्डच्या श्रेणीनुसार तुम्हाला Insurance Cover मिळतो.
>> कोणत्या कार्डवर किती Insurance Cover ?
> पंतप्रधान जनधन खात्यावर मिळणाऱ्या रुपे कार्ड (RuPay Card) - एक ते दोन लाख रुपयांचा विमा
> सामान्य मास्टर कार्ड (Mastercard) - 50 हजार रुपयांचा विमा
> क्लासिक कार्ड (Classic Card) - एक लाख रुपयांचा विमा
> व्हिसा कार्ड (Visa Card) - एक लाख 50 हजार ते दोन लाख रुपयापर्यंतचा विमा
> प्लॅटिनम कार्ड (Platinum Card) - दोन लाख रुपयांचा विमा
> प्लॅटिनम मास्टर कार्ड (Platinum Mastercard) - 5 लाख रुपयांचा विमा
>> अपघाती मृत्यूवर मिळतो विमा
जर, एखाद्या अपघातात एटीएम कार्डधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या बँक खात्याचा वारस एटीएम कार्डवर मिळणारा अपघाती विम्यावर दावा करू शकतो. त्यासाठी कार्डधारकाचा मृत्यू झाल्यास 45 दिवसांच्या आत बँकेत जाऊन विम्यावर दावा करावा लागेल. पॉलिसीवर दावा करण्यासाठी वारसाला संबंधित मृत व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र, एफआयरची प्रत आदींसह इतर कागदपत्रे सादर करून विम्यावर दावा करता येऊ शकतो.