अटल पेन्शन योजनेत सहभागी व्हा, महिना मिळवा 5000 रुपयांची पेन्शन; सविस्तर माहिती एका क्लिकवर
केंद्र सरकार (Central Government ) वेळोवेळी देशातील गरीब आणि वंचित घटकांसाठी विविध योजना आणत असते. यापैकीच एक योजना म्हणजे अटल पेन्शन योजना (Atal Pension Yojana).
Atal Pension Yojana: केंद्र सरकार (Central Government ) वेळोवेळी देशातील गरीब आणि वंचित घटकांसाठी विविध योजना आणत असते. यापैकीच एक योजना म्हणजे अटल पेन्शन योजना (Atal Pension Yojana). ही योजना विशेषतः दुर्बल आर्थिक घटकांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी तयार करण्यात आली आहे. मोदी सरकारच्या या योजनेत आतापर्यंत 6 कोटींहून अधिक लाभार्थी सहभागी झाले आहेत. तर चालू आर्थिक वर्षात 79 लाखांहून अधिक लोक या योजनेत सामील झाले आहेत. दरम्यान, तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर नेमकं काय करावं लागेल, पाहुयात याबाबतची माहिती.
अटल पेन्शन योजना काय आहे?
अटल पेन्शन योजना मोदी सरकारने 9 मे 2015 रोजी सुरू केली आहे. देशातील प्रत्येक वर्गाला सामाजिक सुरक्षा म्हणजेच वृद्धापकाळात पेन्शनचा लाभ मिळावा, ही योजना सुरु करण्यामागील सरकारचा उद्देश होता. विशेषत: असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. यामध्ये गुंतवणूक करून तुम्हाला वयाच्या 60 वर्षांनंतर 1,000 ते 5,000 रुपयांपर्यंतचे पेन्शन मिळू शकते. पेन्शनची रक्कम तुमच्या गुंतवणुकीवर अवलंबून असते.
दरमहा 5000 रुपयांपर्यंत निवृत्ती वेतन कसे मिळेल?
18 ते 40 वर्षे वयोगटातील तरुणांना अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक करून एक हजार ते पाच हजार रुपयांपर्यंतची रक्कम मिळू शकते. तुम्हाला वयाच्या 60 व्या वर्षी 5,000 रुपये पेन्शन मिळवायचे असेल तर वयाच्या 18 व्या वर्षी प्रत्येक महिन्याला 210 रुपये गुंतवा. जर तुम्ही वयाच्या 40 व्या वर्षी गुंतवणूक करायला सुरुवात केली तर तुम्हाला दरमहा सुमारे 1454 रुपये द्यावे लागतील. यावर तुम्हाला वयाच्या 60 व्या वर्षी 5,000 रुपये पेन्शन मिळेल.
अटल पेन्शन योजनेत कोण गुंतवणूक करु शकते?
अटल पेन्शन योजनेत केवळ 18 ते 40 वयोगटातील तरुणच गुंतवणूक करू शकतात. ऑक्टोबर 2022 मध्ये योजनेचे नियम बदलून, सरकारने आयकर भरणाऱ्या लोकांना APY चा लाभ घेण्यापासून प्रतिबंधित केले आहे. या योजनेची विशेष बाब म्हणजे पती-पत्नी दोघेही याचा लाभ घेऊ शकतात. पतीचा मृत्यू झाल्यास पत्नीला पेन्शनचा लाभ मिळेल.
योजनेत गुंतवणूक कशी करावी?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचे बँकेत बचत खाते असणे आवश्यक आहे. या योजनेचा लाभ घेण्यााठी बँकेत जाऊन अर्ज करा. तिथे तुम्हाला एक फॉर्म भरावा लागेल. यामध्ये नाव, आधार, मोबाईल नंबर, बँक खाते तपशील इत्यादी सर्व कागदपत्रे भरून सबमिट करावी लागतील. यानंतर फॉर्म बँकेत जमा करा. केवायसी तपशील दिल्यानंतर, तुम्ही अटल पेन्शन खाते उघडाल.
महत्त्वाच्या बातम्या:
LIC ची नवीन योजना, तुम्हाला आयुष्यभर मिळणार हमखास परतावा; सविस्तर माहिती एका क्लिकवर