सोने खरेदीची सुवर्णसंधी! अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर आज सोन्या चांदीचा दर काय? सविस्तर माहिती एका क्लिकवर
आज सराफा बाजारात सोन्याचे दर (Gold Price)नेमके काय आहेत? याबाबतची माहिती पाहुयात. बुलियन मार्केट या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार आज 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर हा 71350 रुपये आहे.
Gold Silver Price : आज एक महत्वाचा सण आहे. साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजे अक्षय्य तृतीया (Akshay Tritiya). आजच्या या शुभमुहूर्तावर मोठ्या प्रमाणात सोन्या चांदीची (Gold Silver) खरेदी केली जाते. दरम्यान, आज सराफा बाजारात सोन्याचे दर (Gold Price)नेमके काय आहेत? याबाबतची माहिती पाहुयात. बुलियन मार्केट या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार आज 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर हा 71350 रुपये आहे. कालच्या पेक्षा आज सोन्याच्या दरात थोडी घसरण झाली आहे. त्यामुळं सोन्याची खरेदी करणाऱ्यांना एक प्रकारचा दिलासा मिळाला आहे.
बुलियन मार्केट या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, काल (गुरुवार) 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर हा 71600 रुपयांचा दर होता. यामध्ये आज घसरण दिसून आली आहे. आज सोन्याचा दर हा 10 ग्रॅमसाठी 71350 रुपये आहे. तर चांदीचा दर 83040 रुपये प्रतिकिलो आहे. मागील ट्रेंडमध्ये चांदीची किंमत ही प्रतिकिलो 81030 होती. म्हणजे चांदीच्या दरात थोडी वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर सोन्याच्या दरात थोडीशी घसरण
गेल्या अनेक दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात वाढ होत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र, आज अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर सोन्याच्या दरात थोडीशी घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळं सोनं खरेदी करण्याची ग्राहकांना सुवर्णसंधी आहे. दरम्यान, आज सोन्याचा दर हा 24 कॅरेटला 10 ग्रॅमसाठी 71350 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा दर हा 10 ग्रॅमसाठी 65285 रुपये आहे. दराच्या बाबतची सर्व माहिती ही बुलियन मार्केट वेबसाईटवर दिली आहे.
महाराष्ट्रात कोणत्या शहरात सोन्याला किती दर?
मुंबई - 24 कॅरेट सोने - 71220 तर 22 कॅरेट सोने - 65285
पुणे - 24 कॅरेट सोने - 71220 तर 22 कॅरेट सोने - 65285
नागपूर - 24 कॅरेट सोने - 71220 तर 22 कॅरेट सोने - 65285
नाशिक - 24 कॅरेट सोने - 71220 तर 22 कॅरेट सोने - 65285
महत्वाच्या बातम्या: